मुंबई, १८ ऑक्टोबर २०२३: इझमायट्रिप डॉटकॉम या भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाइन ट्रॅव्हल टेक प्लॅटफॉर्मने दसरा ट्रॅव्हल सेल लाँच केला आहे, जो पर्यटकांना फ्लाइट्स, हॉटेल्स, बसेस, कॅब्स व हॉलिडे पॅकेजेसवरील असाधारण सूटचा आनंद घेण्याची खास संधी देतो. हा मर्यादित कालावधीचा सेल १९ ऑक्टोबर २०२३ पर्यंत आहे आणि सर्वोत्तम दरांमध्ये जगभरात पर्यटनाचा आनंद घेण्याची संधी देतो.
दसरा ट्रॅव्हल सेलदरम्यान पर्यटक अनेक विश्वसनीय सूटचा आनंद घेऊ शकतात. तुम्ही फ्लाइट बुकिंग्जवर जवळपास २४ टक्के, हॉटेल स्टेवर जवळपास ५३ टक्के आणि कॅब आरक्षणावर जवळपास १२ टक्के बचत करू शकता. तुम्ही बसने प्रवास करायचे नियोजन करत असाल तर १५ टक्के सूट उपलब्ध आहे. तसेच संस्मरणीय हॉलिडेचा अनुभव घेण्याची इच्छा असलेल्यांसाठी पॅकेजेस फक्त १२,३०० रूपयांपासून सुरू होतात.
या सूटचा लाभ घेण्यासाठी तुमच्या पसंतीचा ट्रॅव्हल पर्याय बुक करताना कूपन कोड ‘फेस्टइएमटी’चा वापर करा. तसेच ग्राहक रूपे क्रेडिट कार्ड, अमेक्स क्रेडिट कार्ड, आयडीएफसी क्रेडिट कार्ड व ईएमआय, बीओबी डेबिट कार्ड, आरबीएल बँक क्रेडिट कार्ड आणि एयू बँक क्रेडिट व डेबिट कार्ड अशा विशिष्ट बँक कार्डससह बुकिंग करत अधिक बचतींचा लाभ घेऊ शकतात.
इझमायट्रिपचे सह-संस्थापक रिकांत पिट्टी म्हणाले, “दसरा सण जवळ येत असताना आम्ही भारतीयांना प्रवासाच्या माध्यमातून स्वत:हून अद्वितीय प्रवासाचा आनंद घेण्यास आमंत्रित करत आहोत. हा दसरा ट्रॅव्हल सेल आपल्या अविश्वसनीय देशामधील विविध अद्भुत स्थळांना प्रशंसित करण्याची आमची पद्धत आहे. हा सेल अद्वितीय इझमायट्रिप सूटमध्ये आपल्या मायभूमीमधील, तसेच जगभरातील भव्य स्थळांचा आनंद घेण्याची संधी देतो, ज्यामुळे तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत सणासुदीच्या काळाचा उत्साहात आनंद घेऊ शकता.”
इझमायट्रिपने प्रतिष्ठित एअरलाइन्स व एक्सक्लुसिव्ह हॉटेल्ससोबत सहयोग केला आहे, जसे ब्रिटीश एअरवेज, वर्जिन अॅटलांटिक, एअर मॉरिशस, सिंगापूर एअरलाइन्स, एतिहाद, अमेरिकन एअरलाइन्स, आयटीए एअरवेज, ब्रिटीश एअरवेज, एथिओपियन एअरलाइन्स, लुफ्थान्सा एअरलाइन्स, एअर कॅनडा, स्पाइसजेट, विस्तारा आणि इतर अनेक. हॉटेल्समध्ये ट्रायडंट, प्राइड हॉटेल्स, फर्न हॉटेल्स, वेलकम हेरिटेज, सुबा हॉटेल्स, जस्टा, ट्रीबो, लॉर्डस् हॉटेल्स, अनंता हॉटेल्स, फॅब हॉटेल्स, ली रॉय हॉटेल्स, समित हॉटेल्स, बाइक, स्टर्लिंग, स्प्री हॉटेल्स, सायट्रस, कायरेड, मास्टिफ, माऊंट हॉटेल ग्रुप, चेवरॉन, स्टारलाइट, लाइम ट्री हॉटेल्स, श्रीगो आणि वन अर्थ यांचा समावेश आहे.
अधिक इन्सेंटिव्ह म्हणून सेल कालावधीदरम्यान प्रत्येक व्यवहार ग्राहकांना नाशेर माइल्स, आयजीपी व फार्मईजी अशा निवडक ब्रॅण्ड सहयोगींकडून अविश्वसनीय गिफ्ट वाऊचर्स जिंकण्याची संधी देतो. इझमायट्रिपच्या सोशल मीडिया चॅनेल्सवर विजेत्यांची घोषणा करण्यात येईल.