मुंबई – एप्रिल २५, २०२४, हेंकेल अॅधेसिव्ह्ज टेक्नॉलॉजीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (हेंकेल इंडिया) ने ग्लोबल मिशन अॅस्ट्रॉनॉमी, इंडियासोबत सहयोगाने आर. एफ. नाईक विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज, कोपरखैरणे येथे आर्यभट्ट अॅस्ट्रॉनॉमी लॅब नावाची अॅस्ट्रॉनॉमी लॅब व वेधशाळेची स्थापना केली आहे. हेंकेल इंडियाच्या आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी सीएसआर योजनेअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या या अॅस्ट्रॉनॉमी लॅब व वेधशाळेचे फायनान्स हेंकेल आयएमईएचे प्रादेशिक प्रमुख बुलेंट पेहलिवान, हेंकेले इंडियाचे कंट्री प्रेसिडण्ट एस. सुनिल कुमार, हेंकेल इंडिया व पाकिस्तानचे फायनान्स प्रमुख कृष्णा प्रसाद, श्रमिक शिक्षण मंडळचे अध्यक्ष श्री. संदीपजी नाईक, श्रमिक शिक्षण मंडळचे सचिव श्री. सागरजी नाईक आणि श्रमिक शिक्षण मंडळाचे प्रमुख विश्वस्त डॉ. संजीवजी नाईक यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी मत व्यक्त करत फायनान्स हेंकेल आयएमईएचे प्रादेशिक प्रमुख बुलेंट पेहलिवान म्हणाले, “हेंकेल इंडियाचा अॅस्ट्रॉनॉमी लॅब व वेधशाळा सीएसआर उपक्रम शालेय स्तरापासून विद्यार्थ्यांमध्ये खगोलशास्त्र आणि अंतराळाबाबत रूची निर्माण करेल. ज्यामुळे भारतातील व प्रांतामधील भावी शास्त्रज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञांसाठी प्रबळ पाया रचला जाईल.”
हेंकेलने पुणे जिल्ह्यातील दहा ठिकाणी अॅस्ट्रॉनॉमी लॅब व प्रयोगशाळा स्थापित केल्या आहेत. कोपरखैरणे येथील आर्यभट्ट अॅस्ट्रॉनॉमी लॅब अशाप्रकारची अकरावी प्रयोगशाळा आहे. या अॅस्ट्रॉनॉमी लॅब व वेधशाळा विद्यार्थ्यांना लघुग्रह शोध, ग्रहांचा शोध यामध्ये सहभाग घेण्याची संधी देतात आणि त्यांच्यामध्ये अंतराळाबाबत कुतूहलता निर्माण करतात, तसेच त्यांना अंतराळापलीकडील विश्वाबाबत प्रश्न विचारण्यास प्रेरित करतात. या प्रयोगशाळांमधून दहा हजार विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधन करण्यास सक्षम करण्याचा मनसुबा आहे.
हेंकेल इंडियाचे कंट्री प्रेसिडण्ट एस. सुनिल कुमार म्हणाले, “आमचा उद्देश ‘पायोनिअर्स अॅट हार्ट फॉर द गुड ऑफ जनरेशन्स’शी बांधील राहत हेंकेल इंडियामध्ये आम्ही आमच्या सीएसआर उपक्रमांच्या माध्यमातून समाजाला भविष्यासाठी सुसज्ज करण्याचा प्रयत्न करतो. समान व सर्वसमावेशक दर्जेदार शिक्षण देण्याच्या मनसुब्यासह आम्हाला या सीएसआर हस्तक्षेपाच्या माध्यमातून सरकारी शाळेमधील विद्यार्थ्यांना खगोलशास्त्र व अंतराळाचे ज्ञान देण्याचा आनंद होत आहे. आम्ही आशा करतो की, यामुळे काही विद्यार्थ्यांना भविष्यात या क्षेत्रात करिअर घडवण्यास स्फूर्ती मिळेल.”
आम्ही या सीएसआर उपक्रमांतर्गत ‘ट्रेन द ट्रेनर’ प्रोग्रामच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील ३०० हून अधिक शिक्षकांना प्रशिक्षित केले आहे. आमच्या अॅस्ट्रॉनॉमी लॅब व प्रयोगशाळांच्या मदतीने विद्यार्थी ग्रहण आणि ग्रह, तारे, लघुग्रह यांचे निरीक्षण अशा विविध क्रियाकलापांमध्ये सहभाग घेऊ शकतील.