maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interestमहाराष्ट्र

नेस्‍ले इंडियाकडून बहुप्रतिक्षित नेस्‍प्रेसो लाँच

विशेष कॉफींची श्रेणी असलेल्‍या प्रीमियम कॉफीमधील अग्रणी बहुप्रतिक्षित नेस्‍प्रेसो २०२४ च्‍या अखेरपर्यंत भारतात लाँच करण्‍यात येईल. नेस्‍प्रेसो कॉफी व मशिन्‍स देशांतर्गत आणि व्‍यावसायिक ग्राहकांना सर्व्‍ह करण्‍यासाठी ओरिजिनल व व्‍यावसायिक सिस्‍टम्‍समध्‍ये उपलब्‍ध असतील. इतर प्रमुख शहरांमध्‍ये विस्‍तार करण्‍यापूर्वी पहिले नेस्‍प्रेसो बुटिक दिल्‍लीमध्‍ये लाँच करण्‍यात येईल. ई-कॉमर्स प्‍लॅटफॉर्म्‍सच्‍या माध्‍यमातून ऑनलाइन देखील नेस्‍प्रेसोची विक्री करण्‍यात येईल. हे लाँच नेस्‍ले इंडिया प्रीमियम कॉफी ऑफरिंग्‍जना चालना देईल.
नेस्‍प्रेसो – प्रमाणित बी कॉर्प™️ – कॉफी नाविन्‍यतेला चालना देण्‍यामध्‍ये, अद्वितीय कॉफी मिश्रणांचा शोध घेण्‍यामध्‍ये, नवीन रेसिपीज तयार करण्‍यामध्‍ये आणि ग्राहकांना प्रीमियम कॉफी अनुभव देण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावते. सर्व नेस्‍प्रेसो कॉफीज स्वित्‍झर्लंडमधील उच्‍च दर्जाच्‍या, अत्‍याधुनिक उत्‍पादन कारखान्‍यांमध्‍ये उत्‍पादित केल्‍या जातात आणि जगभरातील नेस्‍ले बाजारपेठांमध्‍ये निर्यात केल्‍या जातात.
नेस्‍ले इंडियाचे अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक सुरेश नारायणन म्‍हणाले, ”मला आनंद होत आहे की, नेस्प्रेसो नवीन अनुभवांना अनलॉक करण्‍यासाठी आणि असाधारण कॉफीचा शोध घेण्‍यासाठी लवकरच भारतातील ग्राहक, कॉफी प्रशंसक व कॉफीप्रेमींसाठी उपलब्‍ध असणार आहे. अलिकडील वर्षांमध्‍ये भारतात कॉफीचे सेवन करण्‍याच्‍या प्रमाणात वाढ दिसण्‍यात आली आहे, तसेच घरामध्‍ये कॉफीचा आस्‍वाद घेण्‍याचे ट्रेण्‍ड वाढले आहे. वाढती तरूण संख्‍या, जागतिक ट्रेण्‍ड्स आणि नवीन अनुभवांमुळे भारत नेस्‍लेसाठी झपाट्याने विकसित होणारी कॉफी बाजारपेठ ठरली आहे.”
नेस्‍ले नेस्‍प्रेसो एस. ए.चे मुख्‍य कार्यकारी अधिकारी (सीईओ) गिलॉम ली कंफ म्‍हणाले, ”मला आनंद होत आहे की, आम्‍ही भारतातील कॉफीप्रेमींसाठी नेस्‍प्रेसो लाँच करणार आहोत. जवळपास ४० वर्षांपासून नेस्‍प्रेसो आमच्‍या सिग्‍नेचर स्‍वादाच्‍या माध्‍यमातून कॉफी अनुभवाला अधिक उत्‍साहित करण्‍याप्रती कटिबद्ध आहे. शाश्‍वततेप्रती आमच्‍या कटिबद्धतेमध्‍ये दृढ विश्‍वास सामावलेला आहे की, कॉफी चांगल्‍यासाठी उत्तम प्रेरकशक्‍ती ठरू शकते. २०११ पासून भारतातून ग्रीन कॉफीचा स्रोत मिळवल्‍यानंतर मला या आश्‍वासक कॉफी बाजारपेठेत ब्रँडचा विकास होत असल्‍याचे पाहून आनंद होत आहे.”
नेस्‍प्रेसो २००३ मध्‍ये रेनफॉरेस्‍ट अलायन्‍ससोबत सहयोगाने सह-निर्मिती करण्‍यात आलेल्‍या नेस्‍प्रेसो एएए सस्‍टेनेबल क्‍वॉलिटी™️ प्रोग्रामच्‍या माध्‍यमातून उच्‍च दर्जाच्‍या बीन्‍सवर लक्ष केंद्रित करते. या प्रोग्राममध्‍ये आता १८ देशांमधील १५०,००० हून अधिक कॉफी उत्‍पादक शेतकऱ्यांचा समावेश आहे. जवळपास ६०० नेस्‍प्रेसो कृषीशास्‍त्रज्ञ प्रत्‍यक्ष शेतकऱ्यांसोबत काम करतात, त्‍यांना कॉफीचा दर्जा, कृषी उत्‍पादकता व स्थिरता सुधारण्‍यासाठी प्रशिक्षण व संसाधने प्रदान करतात. नेस्‍प्रेसोला उच्‍च दर्जाच्‍या कॉफीची विक्री करत शेतकऱ्यांना प्रीमियम मिळते, ज्‍यामुळे त्‍यांच्‍या उत्‍पन्‍नामध्‍ये वाढ होण्‍यासोबत अधिक सुरक्षित उदरनिर्वाहाची खात्री मिळते. ९३ टक्‍क्‍यांहून अधिक काफी नेस्‍प्रेसो एएए सस्‍टेनेबल क्‍वॉलिटी™️ प्रोग्रामच्‍या माध्‍यमातून मिळवली जाते. नेस्‍प्रेसो २०११ पासून भारतातून उच्‍च दर्जाची ग्रीन कॉफी मिळवत आहे आणि देशातील जवळपास २,००० कॉफी उत्‍पादक शेतकऱ्यांसोबत काम करते.
स्वित्‍झर्लंडमधील लॉसेन येथे मुख्‍यालय असलेली नेस्‍प्रेसो ९० हून अधिक बाजारपेठांमध्‍ये कार्यरत आहे आणि जवळपास ५०० शहरांमध्‍ये त्‍यांचे ८०० हून अधिक बुटिक्‍सचे नेटवर्क आहे.

Related posts

भारतातील स्‍पोर्टस् हायड्रेशनमध्‍ये क्रांतिकारी बदल घडवून आणत लिम्‍काकडून लिम्‍का स्‍पोर्टझ आयन४ (ION4) लाँच

Shivani Shetty

इझमायट्रिपची अयोध्‍यासाठी हॉलिडे पॅकेजेस आणि थेट बसेस सेवा

Shivani Shetty

वेदात मराठे वीर दौडले सात’ या आगामी मराठी चित्रपटासाठी दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि अक्षय कुमार एकत्र

Shivani Shetty

Leave a Comment