maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

सॅमसंग इंडियाकडून तरूणांना भावी टेक डोमेन्‍सबाबत सक्षम करणारा राष्‍ट्रीय कौशल्‍य उपक्रम ‘सॅमसंग इनोव्‍हेशन कॅम्‍पस्’चा दुसरा सीझन लाँच

नवी दिल्‍ली, भारत – एप्रिल २, २०२४ – सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने त्‍यांचा राष्‍ट्रीय कौशल्‍य उपक्रम ‘सॅमसंग इनोव्‍हेशन कॅम्‍पस्’च्‍या दुसऱ्या सीझनला लाच केले आहे. हा उपक्रम तरूणांना एआय, आयओटी, बिग डेटा आणि कोडिंग अँड प्रोग्रामिंग अशा भावी टेक डोमन्‍समध्‍ये अपस्किल करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे. सॅमसंग इनोव्‍हेशन कॅम्‍पसचा १८ ते २५ वर्ष वयोगटातील तरूणांना भावी तंत्रज्ञानांमध्‍ये अपस्किल करण्‍याचा आणि त्‍यांची रोजगारक्षमता वाढवण्‍याचा मनसुबा आहे.

हा उपक्रम भारताच्‍या विकासगाथेप्रती प्रबळ सहयोगी व योगदानकर्ता असण्‍याप्रती सॅमसंगच्‍या कटिबद्धतेला अधिक दृढ करतो. हा उपक्रम तरूणांसाठी योग्‍य संधी निर्माण करण्‍याकरिता स्किल इंडिया आणि डिजिटल इंडिया यासारख्‍या भारत सरकारच्‍या उपक्रमांना पाठिंबा देण्‍यासाठी देखील डिझाइन करण्‍यात आला आहे.

भारतभरातील ३,५०० विद्यार्थ्‍यांना प्रशिक्षित करण्‍यासाठी या आठवड्याच्‍या सुरूवातीला सॅमसंग आणि इलेक्‍ट्रॉनिक्‍स सेक्‍टर स्किल्‍स कौन्सिल ऑफ इंडिया (ईएसएससीआय) यांनी सामंजस्‍य करारावर स्‍वाक्षऱ्या केल्‍या आहेत.

यंदा हा उपक्रम विद्यार्थ्‍यांना अधिक उत्‍साहवर्धक संधी देण्‍यासाठी स्किलिंगपलीकडे गेला आहे. प्रत्‍येक डोमेनमधील राष्‍ट्रीय टॉपर्सना १ लाख रूपयांचे रोख पारितोषिक, तसेच दिल्‍ली/एनसीआरमधील सॅमसंग सुविधांना भेट देण्‍याची संधी मिळते. सॅमसंग सुविधांना या भेटी विद्यार्थ्‍यांना सॅमसंगमधील लीडरशीप टीमसोबत परस्‍परसंवाद साधण्‍याची आणि मार्गदर्शन मिळण्‍याची संधी देतील. राष्‍ट्रीय कोर्स टॉपर्सना सॅमसंग गॅलॅक्‍सी बड्स आणि सॅमसंग गॅलॅक्‍सी स्‍मार्टवॉचेस् यासारखी उत्‍साहवर्धक सॅमसंग उत्‍पादने देखील मिळतील.

”सॅमसंग भारतातील गेल्‍या २८ वर्षांच्‍या कार्यकाळादरम्‍यान देशाच्‍या विकासाप्रती समर्पित सहयोगी राहिली आहे. आमचा दृष्टीकोन नेहमी भारत सरकारच्‍या तरूणांना कुशल करण्‍याच्‍या, तसेच व्‍यावसायिक विकास संधींसह सक्षम करण्‍याच्‍या उद्दीष्‍टांशी संलग्‍न राहिला आहे. सॅमसंग इनोव्‍हेशन कॅम्‍पसच्‍या माध्‍यमातून आम्‍ही कौशल्‍य-आधारित शिक्षणाचे व्‍यासपीठ डिझाइन करत आहोत, जे तरूणांना अपस्किल करेल, भावी टेक डोमेन्‍समध्‍ये रोजगार संधी निर्माण करेल आणि अर्थपूर्ण परिवर्तनाला चालना देईल,” असे सॅमसंग साऊथवेस्‍ट एशियाचे अध्‍यक्ष आणि मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. जेबी पार्क म्‍हणाले.

ईएसएससीआय मिनिस्‍ट्री ऑफ स्किल डेव्‍हलपमेंटच्‍या (कौशल्‍य विकास मंत्रालय) आश्रयांतर्गत उद्योग संस्‍थांचे पाठबळ असलेली राष्‍ट्रीय स्‍तरीय कौशल्‍य संस्‍था आहे आणि नॅशनल स्किल डेव्‍हलपमेंट कॉर्पोरेशन (एनएसडीसी) अंतर्गत सेक्‍टर स्किल कौन्सिल म्‍हणून कार्य करते. ही संस्‍था मान्‍यताकृत प्रशिक्षण व शिक्षण सहयोगींच्‍या आपल्‍या देशव्‍यापी नेटवर्कच्‍या माध्‍यमातून ऑन-बोर्ड स्‍थानिक प्रशिक्षण देईल. ईएसएससीआय भारतातील विद्यार्थ्‍यांसाठी भावी सर्वोत्तम तंत्रज्ञान शिक्षण उपलब्‍ध नसलेल्‍या लहान नगरांमधील लाभार्थींना कोर्सेस् प्रदान करण्‍याच्‍या संधींचा देखील फायदा घेईल.

”ईएसएससीआयला देशातील कौशल्‍य इकोसिस्‍टम प्रबळ करणाऱ्या सीएसआर उपक्रमासाठी सॅमसंगसोबत सहयोग करण्‍याचा आनंद होत आहे. सॅमसंग इनोव्‍हेशन कॅम्‍पस देशातील तरूणांना, विशेषत: वंचितांना भावी टेक डोमेन्‍सबाबत कौशल्य व आवश्‍यक ज्ञान प्रदान करण्‍याच्‍या आमच्‍याउद्दीष्‍टांशी परिपूर्ण संलग्‍न असण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे. आम्‍हाला आशा आहे की, हा उपक्रम विद्यार्थ्‍यांना टेक्निकल ज्ञानासह सुसज्‍ज करेल आणि त्‍यांना रोजगारासाठी सक्षम करेल,” असे ईएसएससीआयच्‍या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (कार्यकारी सीईओ) डॉ. अभिलाष गौर म्‍हणाल्‍या.

उपक्रमादरम्‍यान सहभागींना मान्‍यताप्राप्‍त प्रशिक्षणाच्‍या माध्‍यमातून आणि देशरातील ईएसएससीआयच्‍या शिक्षण सहयोगींकडून मार्गदर्शन-केंद्रित संयोजित क्‍लासरूम व ऑनलाइन प्रशिक्षण मिळेल.

या उपक्रमासाठी नोंदणी केलेल्‍या तरूणांना क्‍लासरूम व ऑनलाइन प्रशिक्षण मिळेल आणि ते एआय, आयओटी, बिग डेटा व कोडिंग अँड प्रोग्रामिंग यामधील त्‍यांच्‍या निवडक तंत्रज्ञान क्षेत्रांमधील प्रत्‍यक्ष कॅपस्‍टोन प्रकल्‍प कार्य पूर्ण करू शकतील.

त्‍यांना त्‍यांची रोजगारक्षमता वाढवण्‍यासाठी सॉफ्ट स्किल्‍स प्रशिक्षण देखील देण्‍यात येईल. सहभागींना भारतभरातील ईएसएससीआयचे प्रशिक्षण व शिक्षण सहयोगींच्‍या माध्‍यमातून प्रेरित करण्‍यात येईल. या दृष्टिकोनामध्‍ये ऑफलाइन व ऑनलाइन शिक्षण, सर्वोत्तम हॅकेथॉन्‍स व कॅपस्‍टोन प्रकल्‍प, तसेच सॅमसंग कर्मचाऱ्यांकडून प्रदान करण्‍यात येणारे तज्ञ मार्गदर्शन यांचा समावेश आहे.

अभ्‍यासक्रम संरचना निवडलेल्‍या कोर्सनुसार विभिन्‍न आहे. उदाहरर्थ, एआय कोर्सची निवड करणाऱ्या सहभागींना २७० तासांचे सैद्धांतिक प्रशिक्षण मिळेल, तसेच त्‍यांना ८० तासांचे प्रकल्‍प कार्य पूर्ण करावे लागेल. दरम्‍यान, आयओटी किंवा बिग डेटा कोर्सची निवड करणाऱ्या सहभागींना १६० तासांचे प्रशिक्षण मिळेल, तसेच त्‍यांना ८० तासांचा व्‍यावहारिक प्रकल्‍प कार्य पूर्ण करावे लागेल. कोडिंग अँड प्रोग्रामिंग कोर्समधील सहभागी ८० तासांचे प्रशिक्षण घेणसोबत ३-दिवसीय हॅकेथॉन इव्‍हेण्‍टमध्‍ये सहभाग घेतील.

हा उपक्रम आठ शैक्षणिक संस्‍थांमध्‍ये चार टप्‍प्‍यांत राबवण्‍यात येईल. उत्तरेकडील प्रदेशांमध्‍ये लखनौ व गोरखपूर येथे प्रशिक्षण केंद्रे स्‍थापित करण्‍यात येतील, तसेच दिल्‍ली एनसीआर येथे दोन प्रशिक्षण केंद्रे स्‍थापित करण्‍यात येतील. दक्षिणेकडील प्रदेशामध्‍ये तामिळनाडू व कर्नाटक या राज्‍यांना कव्‍हर करत प्रशिक्षण केंद्रे चेन्‍नई व श्रीपेरंबुदुर येथे स्‍थापित करण्‍यात येतील, तसेच बेंगळुरूमध्‍ये दोन प्रशिक्षण केंद्रे स्‍थापित करण्‍यात येतील.

हा उपक्रम एप्रिल २०२४ दरम्‍यान सुरू होणार आहे आणि विशेषरित्‍या डिझाइन करण्‍यात आलेला सहा-महिन्‍यांचा कोर्स ऑक्‍टोबर २०२४ दरम्‍यान समाप्‍त होईल. कोर्समधील टॉपर्सची घोषणा नोव्‍हेंबर २०२४ मध्‍ये करण्‍यात येईल.  

२०२३ दरम्‍यान, सॅमसंग इनोव्‍हेशन कॅम्‍पसने ३००० विद्यार्थ्‍यांना भावी तंत्रज्ञान कोर्सेसमध्‍ये यशस्‍वीरित्‍या प्रशिक्षित केले. या उपक्रमामध्‍ये सॅमसंगच्‍या सहभागामधून भारतातील कॉर्पोरेट सोशल रिस्‍पॉन्सिबिलिटी (सीएसआर) क्रियाकलापांच्‍या माध्‍यमातून राष्‍ट्रनिर्मितीप्रती त्‍यांची कटिबद्धता दिसून येते. या उपक्रमाला पूरक सॅमसंगचे इतर सीएसआर उपक्रम देखील आहेत, जसे सॅमसंग सॉल्‍व्‍ह फॉर टूमारो. या उपक्रमांच्‍या माध्‍यमातून सॅमसंगचा भारतातील भावी लीडर्सना अर्थपूर्ण परिवर्तनाला चालना देण्‍याकरिता आवश्‍यक शिक्षण व कौशल्‍ये प्रदान करत सक्षम करण्‍याचा मनसुबा आहे.  

About Samsung Electronics Co., Ltd.

Samsung inspires the world and shapes the future with transformative ideas and technologies. The company is redefining the worlds of TVs, smartphones, wearable devices, tablets, home appliances, network systems, and memory, system LSI, foundry and LED solutions, and delivering a seamless connected experience through its SmartThings ecosystem and open collaboration with partners. For latest news on Samsung India, please visit Samsung India Newsroom at http://news.samsung.com/in. For Hindi, log on to Samsung Newsroom Bharat at https://news.samsung.com/bharat. You can also follow us on Twitter @SamsungNewsIN.

Related posts

चेतना जोशी मिसेस वर्ल्ड २०२४ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार

Shivani Shetty

इटफिट (EatFit) आणि एचआरएक्‍स बाय ऋतिक रोशन (HRX by Hrithik Roshan) यांनी एचआरएक्‍स कॅफे सुरू करण्‍यासाठी केला सहयोग; आरोग्‍यदायी आहार सेवन करण्‍याच्‍या सवयीमध्‍ये बदल घडवून आणणार

Shivani Shetty

आर के स्वामी लिमिटेडने प्रमुख गुंतवणूकदारांना ६५ लाख इक्विटी शेअर्सचे वाटप करून १८७ कोटी रुपये उभारले

Shivani Shetty

Leave a Comment