maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

क्विक हील फाउंडेशनचा सीएसआर उपक्रम

भारत, १७ ऑक्टोबर २०२३: क्विक हील टेक्नोलॉजीजने लिमिटेड आपल्या क्विक हील फाउंडेशन या सीएसआर शाखेमार्फत आज ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा- अर्न अँड लर्न’ हा अभिनव उपक्रम आसाममधील बारपेटा येथे सुरू केला. उद्घाटन सोहळ्याला क्वीक हीलच्या चीफ ऑफ ऑपरेशनल एक्सलन्स तसेच क्विक हील फाउंडेशनच्या चेअरपर्सन श्रीमती अनुपमा काटकर उपस्थित होत्या. त्यांच्याच हस्ते उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. बारपेटामधील सायबरसुरक्षा शिक्षण वाढवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा आहे. सृजन एक सोच’ या स्थानिक स्वयंसेवी संस्थेच्या सहयोगाने राबवला जाणारा हा उपक्रम ४०,०००हून अधिक विद्यार्थ्यांच्या व या भागातील १०,००० हून अधिक गावकऱ्यांच्या आयुष्यांमध्ये बदल घडवून आणले, असे अपेक्षित आहे. याद्वारे सुरक्षित डिजिटल पद्धतींबाबत जागरूकतेचा प्रसार केला जाईल आणि सायबरसुरक्षा सज्जता अधिक भक्कम केली जाईल.

‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा- अर्न अँड लर्न’ हा उपक्रम बारपेटामधील तरुणांच्या सर्वांगीण विकासाला समर्पित आहे. त्यांना सायबरसुरक्षेपलीकडील कौशल्ये विकसित करून सक्षम करण्याचे उद्दिष्ट उपक्रमापुढे आहे. व्यक्तिमत्व विकास, सॉफ्ट स्किल्स व सार्वजनिक संभाषण आदींचा समावेश असलेल्या शिक्षणावर उपक्रमाचा भर आहे. या तरुणांना विविध अनुभव देऊन तसेच त्यांच्या व्यक्तिगत वाढीला चालना देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात मिसळण्यास मदत करणे हा उपक्रमाचा महत्त्वपूर्ण घटक आहे. वंचित भागात राहिल्यामुळे त्यांच्या विकासात येणारे अडथळे या उपक्रमाच्या माध्यमातून दूर केले जाऊ शकतात. शिवाय, हा उपक्रम त्यांना भविष्यातील रोजगार संधींसाठी सुसज्ज करेल, स्थानिक रोजगार बाजारपेठेत तसेच व्यापक समाजात मोलाचे योगदान देण्याची क्षमता त्यांच्यात आणेल आणि अखेरीस डिजिटल युगात प्रगती करू शकणाऱ्या सर्वगुणसंपन्न व्यक्ती यातून घडतील.

या कार्यक्रमाअंतर्गत, स्थानिक समुदायातील आणि कम्प्युटर सायन्सचे शिक्षण देणाऱ्या स्थानिक कॉलेजांमधील सुमारे ४० स्वयंसेवकांची निवड केली जाईल आणि त्यांना बारपेटा जिल्ह्यात आसाम सायबर वॉरियर म्हणून काम करण्याच्या उद्देशाने एकत्र आणले जाईल. त्यामुळे स्थानिक जनतेमधील सायबरसुरक्षेबाबतची जागरूकता वाढेल. या स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिले जाईल. त्यात व्यक्तिमत्व विकास आणि सायबरसुरक्षेबाबत सामान्य जागरूकता यांबाबतच्या चार तासांच्या ऑनलाइन सत्रांचाही समावेश असेल. शिवाय, ऑफलाइन सत्रांमध्ये व्यक्तिमत्व विकास, संघ बांधणी, उद्दिष्ट निश्चिती व सार्वजनिक संभाषण यांचे प्रशिक्षण दिले जाईल.

क्विक हील फाऊंडेशनच्‍या अध्‍यक्षा आणि क्विक हील टेक्‍नोलॉजीज लिमिटेडच्‍या ऑपरेशनल एक्‍सलन्‍सच्‍या प्रमुख श्रीम. अनुपमा काटकरम्‍हणाल्‍या, “बारपेटामध्ये ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा- अर्न अँड लर्न’ उपक्रम सुरू करताना माझे हृदय अभिमानाने भरून आले आहे. आपल्या समुदायांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने तसेच त्यांना डिजिटल युगात सुरक्षितपणे वाटचाल करण्यासाठी आवश्यक त्या ज्ञान व कौशल्यांनी सुसज्ज करण्याच्या दिशेने टाकलेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ‘सत्रांची भूमी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारपेटा जिल्ह्यात आपण सायबर जागरूकतेची बिजे पेरत आहोत, स्थानिक प्रतिभावंतांना सायबर वॉरियर होण्यासाठी जोपासत आहोत. ‘श्रीजन-एक सोच’च्या सहयोगाने आपण स्थानिक समुदायाचे डिजिटल भवितव्य तर सुरक्षित करत आहोतच पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्यांच्यात स्थितीस्थापकत्व आणि. सशक्तीकरणाची भावना वाढवत आहोत . हा उपक्रम काळोख्या सायबरविश्वातील प्रकाशाचा किरण ठरावा आणि त्याने लोकांना अधिक सुरक्षित, अधिक हुशार भवितव्याच्या दिशेने घेऊन जावे अशी आशा मी व्यक्त करते,”.

Related posts

क्‍लीअरट्रिपकडून बस श्रेणीमध्‍ये १५० टक्‍के वाढीची नोंद*

Shivani Shetty

सॅमसंगकडून भारतातील ग्राहकांसाठी १० मोठ्या क्षमतेच्‍या बीस्‍पोक एआय वॉशिंग मशिन्‍स लाँच

Shivani Shetty

बीएलएस ई-सर्विसेसद्वारे अॅडीफिडेलिस सोल्‍यूशन्‍सचे अधिग्रहण

Shivani Shetty

Leave a Comment