मुंबई, १६ एप्रिल २०२४: झेल एज्युकेशन या विद्यार्थी व श्रमजीवीव्यावसायिकांना फायनान्स व अकाऊंट्स क्षेत्रातील कोर्सेस प्रदान करणाऱ्याआघाडीच्या एडटेक प्लॅटफॉर्मने नुकतेच यूपीईएस डेहराडूनसोबत सामंजस्यकरारावर (एमओयू) स्वाक्षरी केली आहे. या करारामधून महत्त्वपूर्ण सहयोगनिदर्शनास येतो, ज्याचा विद्यार्थ्यांना व श्रमजीवी व्यावसायिकांना फायनान्सव अकाऊंटिंगमध्ये करिअर घडवण्यासाठी एकीकृत पाथवे प्रदान करण्याचामनसुबा आहे.
या धोरणात्मक सहयोगाचा यूपीईएस येथील बीबीए विद्यार्थ्यांसाठी प्रबळशैक्षणिक पाथवे स्थापित करण्याचा मुख्य उद्देश आहे, ज्यामुळे त्यांनात्यांच्या पदवी शिक्षणासोबत प्रतिष्ठित एससीए (असोसिएशन ऑफ चार्टर्डसर्टिफाईड अकाऊंटण्ट्स) प्रमाणन प्राप्त करता येईल. हा अद्वितीय सहयोगविद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षण प्रदान करण्यासह फायनान्स व अकाऊंटिंगच्याडायनॅमिक क्षेत्रातील स्पर्धेमध्ये अग्रस्थानी राहण्याची संधी देतो.
या सामंजस्य कराराच्या अटींअंतर्गत या सहयोगात्मक प्रोग्राममध्ये नोंदणीकरणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठे फायदे मिळवण्याची संधी आहे. झेल एज्युकेशनयूपीईएससोबत सहयोगाने विद्यार्थ्यांना त्यांच्या एसीसीए पात्रतेमध्येजवळपास ८ सूट मिळण्याची संधी देईल. हे प्रमाणन शैक्षणिक प्रवासामध्येएकप्रवाह आणण्यासाठी डिझाइन करण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थ्यांचाबहुमूल्य वेळ व प्रयत्न कमी होतील आणि ते सहजपणे त्यांच्या व्यावसायिकअकाऊंटिंग ध्येयांच्या दिशेने वाटचाल करू शकतील.
झेल एज्युकेशनचे संचालक आणि सहसंस्थापक श्री. अनंत बेंगानीम्हणाले, ”आम्हाला यूपीईएससोबतच्या सहयोगाबाबत आनंद होत आहे, ज्यामुळे आम्हाला फायनान्स व अकाऊंटिंगमध्ये यशस्वी करिअर घडवण्याचीमहत्त्वाकांक्षा असलेल्या विद्यार्थ्यांना अद्वितीय शैक्षणिक अनुभव देता येऊशकतो. या सहयोगाच्या माध्यमातून प्रदान करण्यात आलेला एकीकृतपाथवे आणि सवलतीचे फायदे त्यांना आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये टिकूनराहण्याकरिता आवश्यक असलेली कौशल्ये व क्रेडेन्शियल्ससह सुसज्जकरतील.”