maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

इकोफायची विद्युतसह हातमिळवणी

मुंबई, २५ एप्रिल २०२४: इकोफाय ही भारतातील ग्रीन-ओन्‍ली नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी (एनबीएफसी) आणि विद्युत हा इलेक्ट्रिक तीन-चाकीचे संपादन अधिक किफायतशीर करण्‍यामध्‍ये विशेषीकृत असलेला अग्रगण्‍य ईव्‍ही मालकीहक्‍क प्लॅटफॉर्म यांनी आज धोरणात्‍मक सहयोगाची घोषणा केली. या सहयोगाचा इलेक्ट्रिक वेईकल बाजारपेठेत क्रांतिकारी बदल घडवून आणण्‍याचा आणि शाश्‍वत परिवहन सोल्‍यूशन्‍सना चालना देण्‍याचा मनसुबा आहे. इकोफाय कर्जासाठी आर्थिक साह्य करेल, तर विद्युत किफायतशीर ईव्‍ही सोल्‍यूशन्‍सच्‍या खात्रीसाठी सबस्क्रिप्‍शन-आधारित बॅटरी-अॅज-ए-सर्विस मॉडेल प्रदान करेल.  

हा सहयोग ईव्‍ही मालकीहक्‍क समकालीन आयसीई वाहनांप्रमाणे सुलभ व विनासायास करण्‍याच्‍या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. संपादनाचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी करणाऱ्या, तसेच पे-पर-किलोमीटर बॅटरी लीजिंग मॉडेल सादर करणाऱ्या हायब्रिड फायनान्सिंग मॉडेलसह इकोफाय आणि विद्युतचा ईव्‍हीचे अवलंबन विनासायास व जोखीम-मुक्‍त करण्‍याचा मनसुबा आहे.

इकोफाय येथील पार्टनरशीप्‍स अँड को-लेंडिंगचे प्रमुख कैलाश राठी म्‍हणाले, “या सहयोगामधून शाश्‍वत गतीशीलता सोल्‍यूशन्‍सना चालना देण्‍याप्रती आमची संयुक्‍त कटिबद्धता दिसून येते. इकोफायने आपल्‍या अद्वितीय उत्‍पादनासह तीनचाकी ईव्‍ही क्षेत्रात अर्थपूर्ण परिवर्तन घडवून आणले आहे आणि सर्व अव्‍वल ओईएमसोबत सहयोग केला आहे. समर्पित हरित फायनान्शियर म्‍हणून आम्‍ही देशामध्‍ये हरित परिवर्तनाला गती देण्‍यासाठी नाविन्‍यपूर्ण व सर्वोत्तम सोल्‍यूशन्‍स सादर करण्‍यामध्‍ये अग्रस्‍थानी आहोत. या बाबीशी बांधील राहत तसेच इकोफायचे हरित फायनान्सिंगमधील कौशल्‍य आणि विद्युतचे सबस्क्रिप्‍शन मॉडेल एकत्र करत आमचा देशातील ईव्‍ही मालकीहक्‍काचे लोकशाहीकरण करण्‍याचा मनसुबा आहे. आमचे बॅटरी सबस्क्रिप्‍शन-आधारित वेईकल ओनरशीप मॉडेल ग्राहकांना पारंपारिक आयसीई वेईकल मालकीहक्‍कासाठी ३० ते ४० टक्‍के स्‍वस्‍त पर्याय देते. ”  

विद्युतचे सह-संस्‍थापक क्षितिज कोठी म्‍हणाले, “आम्‍हाला इलेक्ट्रिक वाहनांच्‍या अवलंबतेला गती देण्‍यासाठी आणि हरित भविष्‍याप्रती योगदान देण्‍यासाठी इकोफाय सोबत सहयोग करण्‍याचा आनंद होत आहे. आमचे सबस्क्रिप्‍शन-आधारित सर्वांगीण ओनरशीप मॉडेल शाश्‍वत फायनान्सिंग सोल्‍यूशन्‍सच्‍या माध्‍यमातून पर्यावरणावर सकारात्‍मक प्रभाव निर्माण करण्‍याप्रती इकोफायच्‍या मिशनशी परिपूर्ण संलग्‍न आहे. सहयोगाने, आमचा स्‍वावलंबी उद्योजक व लघु व्‍यवसायांना विनासायास इलेक्ट्रिक वेईकल्‍सप्रती परिवर्तन घडवून आणण्‍यास सक्षम करण्‍याचा मनसुबा आहे.” 

Related posts

यू.एस. मधील आरोग्य सेवा संस्थांसाठी प्रशासकीय, क्लिनिकल आणि आर्थिक सेवांचा सर्वात व्यापक पुरवठादार तयार करण्यासाठी IKS हेल्थने AQuity सोल्यूशन्स ताब्यात घेतले

Shivani Shetty

डिजिकोअर स्टुडिओजद्वारे एंजल इन्व्हेस्टमेन्ट शो ‘इंडियन एंजल्स’ची घोषणा

Shivani Shetty

ग्राहक डिजिटल सुरक्षिततेकरिता क्विक हीलकडून ‘व्‍हर्जन २४’ लाँच

Shivani Shetty

Leave a Comment