maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsInvestmentPublic Interest

बीम्स फिनटेक फंडाची क्रेडजेनिक्समध्ये गुंतवणूक


मुंबई, २८ ऑगस्ट २०२३: बीम्स फिनटेक फंड या भारताच्या पहिल्या ग्रोथ स्टेज फिनटेक फंडने क्रेडजेनिक्स या भारताच्या आघाडीच्या कर्ज वसुली सास प्लॅटफॉर्ममध्ये ५० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या सीरिज बी फेरीत अघोषित रकमेची गुंतवणूक केली आहे. बीम्सने या फेरीत वेस्टब्रिज आणि एक्सेल यांच्यासह गुंतवणूक केली आहे. या कंपनीतील इतर गुंतवणूकदारांमध्ये टँगलिन, टायटल कॅपिटल आणि डीएमआय फायनान्स यांचा समावेश आहे.

बीम्सचे व्यवस्थापकीय भागीदार आणि सह-संस्थापक सागर अग्रवाल म्हणाले की, “आम्ही बँकिंग पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये बराच काळ बँका व वित्तीय संस्थांसाठी महत्त्वाच्या असलेल्या क्षेत्रांची ओळख करून घेण्यासाठी घालवला आहे. जागतिक पातळीवर आर्तिक संस्थांसाठी वसुली हे एक मोठे आव्हान राहिले आहे आणि एफआयना या क्षेत्रात कार्यक्षमता वाढवण्यासाठी खर्च करण्याची तयारी आहे. कर्जाच्या बाजारपेठा पुढील दशकाच्या कालावधीत मोठ्या होतील. त्यामुळे एफआय त्याच वेगाने वसुली करण्यासाठी स्त्रोत आणि  तंत्रज्ञानावर भांडवल खर्च करावे लागेल. कलेक्शन्स प्लग आणि प्ले सास क्षेत्रातील क्रेडजेनिक्स आज बाजारातील आघाडीची कंपनी आहे. ऋषभ, मयंक आणि आनंद यांनी आर्थिक संस्थांसाठी वसुलीची समस्या व्यावसायिक केली आहे आणि प्लॅटफॉर्म उभारणीसाठी तसेच आर्थिक संस्थांना एक विशेष उपाययोजना देण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. आम्हाला क्रेडजेनिक्ससोबत भागीदारी करताना खूप आनंद होत असून कंपनीसाठी आम्हाला मोठी बाजारपेठ आहे, असे वाटते.

बीम्स फिनटेक फंड्सचे वातावरण आणि एलपीजचे नेटवर्क, ज्यात आघाडीच्या बँका आणि एनबीएफसी समाविष्ट आहेत ते क्रेडजेनिक्ससोबत भागीदारी करतील. बीम्सचे मूल्यवर्धन करणारे धोरण म्हणजे एलपी आणि पोर्टफोलिओ कंपन्यांमध्ये संगम घडवून आणणे हे आहे. बीम्स आपल्या बँकिंग नेटवर्कची व्याप्ती उपलब्ध करून देईल आणि त्यांच्या २५० पेक्षा अधिक स्टार्टअप्सच्या पोर्टफोलिओना भागीदारी, सहयोग आणि संभाव्य ताबा संधी क्रेडजेनिक्ससाठी देतील.

Related posts

टाटा मोटर्सकडून चंदिगडमध्‍ये अत्‍याधुनिक रजिस्‍टर्ड वेईकल स्‍क्रॅपिंग फॅसिलिटीचे उद्घाटन

Shivani Shetty

ऑडी इंडियाच्‍या विक्रीमध्‍ये ८८ टक्‍क्‍यांची मोठी वाढ

Shivani Shetty

बहुप्रतिक्षित चित्रपट ‘झिम्मा 2’ चं दसऱ्याचा शुभ मुहूर्तावर पोस्टर आऊट

Shivani Shetty

Leave a Comment