मुंबई, १७ डिसेंबर २०२३: होमियोपॅथिक क्लिनिक्सची जगातील सर्वात मोठी साखळी असणाऱ्या डॉ. बत्राज हेल्थकेअरने रुग्णांसाठी केसांच्या समस्यांवरील उपचारांचे अधिक वेगवान, प्रत्येक व्यक्तीच्या विशिष्ट गरजांनुसार आणि अचूकपणे मोजता येण्याजोगे परिणाम प्राप्त करण्यासाठी एआय तंत्रज्ञानावर आधारित साउथ कोरियातील एआय हेअर प्रो डायग्नोस्टिक टूल भारतात सादर केले आहे.
डॉ. बत्राज हेल्थकेअरचे व्हाइस-चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर तसेच ट्रायकॉलॉजिकल सोसायटी ऑफ लंडनचे पहिले भारतीय अध्यक्ष डॉ. अक्षय बत्रा म्हणाले, “डॉ. बत्राज® तंत्रज्ञानातील प्रगतीच्या बाबतीत नेहमी आघाडीवर राहिले आहे. केसांच्या समस्यांशी झगडणाऱ्या रुग्णांच्या फायद्यासाठी काम करणारे एआय हेअर प्रो हे प्रगत एआय तंत्रज्ञान प्रथमच भारतात दाखल करणे आमच्यासाठी अत्यंत खास बाब आहे. अत्याधुनिक जागतिक तंत्रज्ञान आणि होमियोपॅथीची २५० वर्षांची काळाच्या कसोटीवर उतरलेली पुरातन परंपरा यांचा मेळ साधत आम्ही आमच्या रुग्णांना सुधारित परिणाम पुरवू शकू याची आम्हाला खात्री आहे.”
ही अत्याधुनिक विज्ञानाचा वापर करणारी तसेच समस्येचा अंदाज वर्तवू शकणारी उपचारपद्धती एआयच्या क्षमतांचा फायदा करून घेते, ज्यात टाळूवरील त्वचेच्या समस्यांचे अचूक विश्लेषण करण्यासाठी तसेच रुग्णांना जास्तीत-जास्त चांगले परिणाम मिळतील अशाप्रकारे त्यांच्या समस्येनुसार औषधोपचार सांगण्यासाठी विविध भौगोलिक प्रदेशांतील यशस्वीरित्या उपचार करण्यात आलेल्या १५ लाख रुग्णांच्या विस्तृत डेटाबेसमधून माहिती मिळवली जाते. याखेरीज एखाद्या रुग्णाच्या बाबतीत भविष्यात केस गळतीची समस्या कशाप्रकारे वाढेल याचा अंदाज घेत वेळच्यावेळी त्यात हस्तक्षेप करण्याची क्षमताही एआय हेअर प्रोमध्ये आहे.
हेअर डायग्नोस्टिक टूलमध्ये रुग्णांच्या समस्येचे तपशीलवार आणि प्रमाण पद्धतीने अन्वेषण करण्यासाठी दोन उच्च क्षमतेच्या कॅमेरांचा वापर केला जातो, याला चार प्रकारच्या मेडिकल-ग्रेड लाइट्सची जोड असते, ज्यामुळे नुसत्या डोळ्यांना न दिसणाऱ्या छुप्या समस्याही उघड होतात आणि टाळूवरील त्वचेच्या विविध समस्यांमध्ये फरक करता येतो. प्रतिमा ३०० पट मोठी करून पाहत येत असल्याने केसांची घनता, जाडेपणा आणि केस गळण्याच्या ४० वेगवेगळ्या प्रकारांमध्ये फरक करणे शक्य होते.
प्रत्येक रुग्णाच्या विशिष्ट समस्येनुसार दिल्या जाणाऱ्या उपचारांमध्ये होमियोपॅथीचे विज्ञान आणि केसांच्या वाढीसाठी वापरल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय तंत्रांचा मेळ घातला जातो. केसांच्या अधिक निरोगी वाढीसाठी एआय विश्लेषणाच्या आधारे एआय न्यू हेअर बूस्टर, एआय एसटीएम बूस्टर अशा व्यक्तीविशिष्ट उपचारांचे पर्याय निवडण्यात आले आहेत. एआय हेअर प्रो वेगवान, अधिक नेमक्या आणि व्यक्तीविशिष्ट परिणामांची हमी देते व त्यातून अधिक चांगले परिणाम प्राप्त होतात.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा लाभ घेत ही नाविन्यपूर्ण यंत्रणा प्रत्येक रुग्णाच्या बाबतीत एखादी समस्या पुढे कोणते रूप घेईल याचा अंदाज मांडते, ज्यामुळे अचूकपणे रोगनिदान करता येतेच पण त्याचबरोबर अधिक वेगवान आणि अधिक चांगल्या परिणामांसाठी व्यक्तिविशिष्ट उपचारही देऊ करते. इतकेच नव्हे तर हे साधन रुग्णाच्या प्रगतीचा तक्ता आणि अहवाल वैज्ञानिक पद्धतीने तयार करते, ज्यामुळे मोजता येण्याजोगे परिणाम हाती येतात व त्यातून आरोग्यसेवा पुरविणारे आणि रुग्ण दोघेही अधिक स्वस्थ केस मिळविण्याच्या दिशेने चाललेल्या प्रवासासाठी अधिक सक्षम बनतात.