maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

बीएलएस इंटरनॅशनल स्‍लोवाकियासाठी व्हिसा सेवा देणार

मुंबई, १८ ऑक्टोबर २०२३: बीएलएस इंटरनॅशनल सर्विसेस लि. या सरकारी व राजनयिक मिशन्‍ससाठी आऊटसोर्सिंग सेवांमध्‍ये जागतिक अग्रणी कंपनीने १८ देशांमधील स्‍लोवाकियासाठी ५४ हून अधिक कार्यालयांसह विशेष ग्‍लोबल व्हिसा आऊटसोर्सिंग करारावर स्‍वाक्षरी केली आहे. इंडस्‍ट्री डेटानुसार २०२१ मध्‍ये २.६४ दशलक्ष पर्यटकांनी स्‍लोवाकियाला भेट दिली आणि ही आकडेवारी ट्रॅव्‍हल ट्रेण्‍ड्सनुसार वाढवण्‍याची अपेक्षा आहे.

बीएलएस इंटरनॅशनलच्‍या अपवादात्‍मक व्हिसा सेवा प्रदान करण्‍यामधील व्‍यापक अनुभवाने कंपनीला शेंगेन सदस्‍य देशांसोबत काम करण्‍याचा सन्‍मान मिळवून दिला आहे. या नवीन करारासह बीएलएस इंटरनॅशनलला टूरिस्‍ट व्हिसा सेवा व बिझनेस व्हिसा सेवा यांच्‍यासह राष्‍ट्रीय व्हिसा सेवा प्रदान करण्‍याची देखील जबाबदारी देण्‍यात येईल, ज्‍यामागे एकसंधी प्रवास व इमिग्रेन प्रक्रियेची सुविधा देण्‍याचा मनसुबा आहे.

बीएलएस इंटरनॅशनल सर्विसेस लि.चे संयुक्‍त व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. शिखर अग्रवाल म्‍हणाले, “आम्‍ही बीएलएस इंटरनॅशनलवर व्हिसा आऊटसोर्सिंग सहयोगी म्‍हणून विश्‍वास दाखवण्‍यासाठी स्‍लोवाकिया सरकारचे मन:पूर्वक आभार व्‍यक्‍त करतो. या सहयोगामधून सर्वोत्तमता आणि कार्यक्षम, विश्‍वसनीय व्हिसा सेवा प्रदान करण्‍यासाठी अविरत समर्पिततेप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. मुलभूत शेंगेन तत्त्वांशी बांधील राहत आम्‍ही सर्वांसाठी व्हिसा अर्जप्रक्रिया अनुभव सुधारित करण्‍यास उत्‍सुक आहोत, ज्‍यामधून नाविन्‍यता व ग्राहक-केंद्रित सोल्‍यूशन्सच्‍या माध्‍यमातून नवीन उद्योग बेंचमार्क्‍स स्‍थापित करण्‍यात येत आहेत. स्‍लोवाकिया लक्षवेधक व संपन्‍न नवीन पर्यटन स्‍थळ म्‍हणून उदयास येत असताना, तसेच पर्यटन क्षेत्राच्‍या विकासाला मोठ्या प्रमाणात योगदान देत असताना आम्‍ही आमचे योगदान देण्‍यास उत्‍सुक आहोत. हे प्रयत्‍न सर्वोत्तमता, कार्यक्षमता व सुरक्षितता या आमच्‍या मुलभूत मूल्‍यांशी परिपूर्णपणे सुसंगत आहेत.”

उल्‍लेखनीय बाब म्‍हणजे ही उपलब्‍धी बीएसएल इंटरनॅशनलच्‍या शेंगेन देशांच्‍या पोर्टफोलिओमधील लक्षणीय भर आहे. कंपनीने शेंगेन सदस्‍य राज्‍ये जसे हंगेरी, पोर्तुगाल, पोलंड, स्‍पेन, जर्मनी व इटली यांच्‍यासोबत सहयोग केला असून व्हिसा व कॉन्‍सुलर सेवांची व्‍यापक श्रेणी देत आहे. या उच्‍चभ्रू समूहामध्‍ये स्‍लोवाकियाचा समावेश सरकार व व्हिसा अर्जदारांसाठी विश्‍वसनीय सहयोगी म्‍हणून बीएलएस इंटरनॅशनलची उपस्थिती अधिक दृढ करतो.

 

Related posts

जी-शॉक ने व्हीएच1 द्वारा समर्थित शॉक द वर्ल्ड सह 40 वा वर्धापन दिन साजरा

Shivani Shetty

मेन्स ग्रूमिंग क्षेत्रातील अभिनव कल्पनांचे शिखर गाठणारा ब्रॅण्ड ब्रवाडो भारतात दाखल

Shivani Shetty

टाटा मोटर्सकडून आपल्‍या इलेक्ट्रिक लास्‍ट-माइल गतीशीलता ऑफरिंगमध्‍ये वाढ; नवीन टाटा एस ईव्‍ही १००० लाँच

Shivani Shetty

Leave a Comment