maharashtraprimenews
ठळक बातम्या
Educationठळक बातम्यासार्वजनिक स्वारस्य

महाराष्ट्रातील काबल स्टार शिष्यवृत्ती विजेत्यांची घोषणा

इलेक्ट्रिशियनच्या मुलांनी या वर्षी त्यांची १० वी परीक्षा उत्तीर्ण केली आहे त्यांच्यासाठी काबल स्टार शिष्यवृत्ती कार्यक्रम आहे. सक्षम आणि शिक्षित भारतासाठी प्रयत्न करण्याच्या ब्रँडच्या दृष्टीकोनाचा हा एक भाग आहे. आरआर काबल घरातील वायरच्या प्रत्येक बॉक्सच्या विक्रीतून १ रुपयाचे योगदान देते. याच योगदानातून या शिष्यवृत्ती कार्यक्रमांतर्गत इलेक्ट्रिशियनच्या मुलांच्या उच्च माध्यमिक शिक्षणासाठी १ कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे. संपूर्ण भारतातून १,०१२ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे आणि त्यांना प्रत्येकी १०,००० रुपये शिष्यवृत्ती मिळत आहे. भारतभरातील १०१२ विजेत्यांपैकी मुंबईतील १११ विजेत्यांना मुंबईत आरआर काबल कार्यालयात १६ नोव्हेंबर २०२२ रोजी पुरस्कार सोहळ्याद्वारे सन्मानित करण्यात आले आणि त्यानंतर पुण्यात १९ नोव्हेंबर २०२२ रोजी एका पुरस्कार सोहळ्याद्वारे सन्मानित करण्यात येणार आहे.

या शिष्यवृत्ती कार्यक्रमाबद्दल बोलताना आरआर ग्लोबलच्या संचालिका श्रीमती कीर्ती काबरा म्हणाल्या, “काबल स्टार्स शिष्यवृत्ती कार्यक्रमाच्या सर्व विजेत्यांचे मी त्यांनी त्यांच्या आयुष्यात हा महत्वाचा टप्पा गाठल्याबद्दल अभिनंदन करू इच्छिते. त्यांच्या उद्दिष्टांच्या दिशेने ते एक पाऊल पुढे टाकत आहेत. आरआर काबल मध्ये आम्ही इलेक्ट्रिशियनना आमच्या समुदायाचा एक अविभाज्य भाग मानतो आणि आमचे उपक्रम या समुदायाच्या कल्याणासाठी योगदान देण्याकरता समर्पित आहेत.

Related posts

कच्छची गानकोकिळा, गुजरातची सर्वोत्तम आणि अव्वल लोकगायिका ‘गीता रबारी’ नवरात्रोत्सवामध्ये पहिल्यांदाच मुंबईत…

Shivani Shetty

सोनी सबवरील मािलका ‘पुष्पा इम्पॉिसबल’मधील गिरमा पिरहार वयै िक्तक जीवन व कामामध्येकशापर्कारेसंतलु नराखते?चलाजाणूनघेऊया!

Shivani Shetty

संजय घोडावत यांना अहिंसा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला

Shivani Shetty

Leave a Comment