maharashtraprimenews
ठळक बातम्या
तंत्रज्ञानसार्वजनिक स्वारस्य

सिग्निफायकडून नवीन पोर्टेबल स्‍मार्ट लॅम्‍प्‍ससह फिलिप्‍स स्‍मार्ट वाय-फाय लायटिंग श्रेणीचा विस्‍तार

नवी दिल्‍ली, भारत सिग्निफाय (Signify) (युरोनेक्‍स्‍ट: LIGHT) या लायटिंगमधील जागतिक अग्रणी कंपनीने दोन नवीन पोर्टेबल स्‍मार्ट लॅम्‍प्‍स फिलिप्‍स स्‍मार्ट एलईडी स्‍क्‍वेयर व फिलिप्‍स स्‍मार्ट एलईडी हिरो (Philips Smart LED Squire and Philips Smart LED Hero) यांच्‍या लॉन्‍चसह भारतात त्‍यांची फिलिप्‍स स्‍मार्ट वाय-फाय लायटिंग श्रेणी विस्‍तारित केली आहे. हे सुरेखरित्‍या डिझाइन केलेले लॅम्‍प्‍स वापरकर्त्‍यांना त्‍यांच्‍या लिव्हिंग रूमच्‍या कानाकोपऱ्यापर्यंत आकर्षक स्‍मार्ट लाइटचा अनुभव देतात. तुम्‍ही या लॅम्‍प्‍सना बेडच्‍या बाजूला, कॉफी टेबलवर किंवा बुकशेल्‍फमध्‍ये ठेवत भिंतीवर आकर्षक चमक निर्माण करू शकता आणि घरामध्‍येच वाचन, व्‍यायाम किंवा विश्रांतीसाठी आल्‍हाददायक वातावरणाची निर्मिती करू शकता.

या वापरण्‍यास सुलभ पोर्टेबल लॅम्‍प्‍ससह तुम्‍ही तुमच्‍या घराला कोणत्‍याही रंगासह प्रकाशमय करू शकता किंवा तुमच्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या डायनॅमिक लाइट मोडचा वापर करू शकता. तुम्‍ही उत्‍साहवर्धक व्‍हाइट ते सॉफ्ट वॉर्म व्‍हाइट लाइट्स अशा अनेक रंगांची निवड करू शकता किंवा तुमच्‍या कृतींसाठी सर्वोत्तम वातावरण निर्माण करण्‍याकरिता फोकस व रिलॅक्‍स अशा प्रीसेट मोड्समधून निवड करू शकता.

फिलिप्‍स स्‍मार्ट एलईडी स्‍क्‍वेयर व फिलिप्‍स स्‍मार्ट एलईडी हिरोमध्‍ये आकर्षक वक्राकार-आकाराची डिझाइन आणि साधे प्‍लग-अॅण्‍ड-प्‍ले कार्यसंचालन आहे, ज्‍यामुळे ते वापरण्‍यास सुलभ असण्‍यासोबत घरामध्‍ये कुठेही वापरणे व वाहून नेणे सोपे आहे. फिलिप्‍स स्‍मार्ट एलईडी स्‍क्‍वेयरटेबल लॅम्‍प ड्युअल-टोन लाइट इफेक्‍टसह येतो, तर फिलिप्‍स स्‍मार्ट एलईडी हिरो टेबल लॅम्‍प टॅप सेन्‍सर कंट्रोलसह सुसज्‍ज आहे, तसेच अॅप व वॉईस कंट्रोल्‍स देखील आहेत.

फिलिप्‍स विझ अॅपचा वापर करत किंवा वॉईस कंट्रोलच्‍या माध्‍यमातून कुठूनही हे स्‍मार्ट पोर्टेबल टेबल लॅम्‍प्‍स दूरून ऑपरेट करता येऊ शकतात. ते विद्यमान वाय-फाय नेटवर्क्‍सच्‍या माध्‍यमातून कार्य करणाऱ्या सर्व स्‍मार्ट होम सिस्टिम्‍सशी सुसंगत देखील आहेत. तुमची दैनंदिन किंवा साप्ताहिकदिनचर्या फॉलो करण्यासाठी तुम्ही हे स्मार्ट लॅम्‍प स्वयंचलित देखीलकरू शकता. लॅम्‍प्‍स सकाळी किंवा तुम्ही घरी पोहोचण्यापूर्वी चालूकरण्यासाठी आणि आवश्यक नसताना वीज बचत करण्‍याकरिता ते बंदठेवण्यासाठी शेड्यूल करा.

या लॉन्‍चबाबत बोलताना सिग्निफाय साऊथ एशियाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी व व्‍यवस्‍थापकीय संचालक सुमित जोशी म्‍हणाले, भारतात इंटरनेटचे वाढते प्रमाण आणि स्‍मार्ट व सोईस्‍कर असलेल्‍या लायटिंगला प्राधान्‍य देणाऱ्या तरूण ग्राहकांच्‍या वाढत्‍या संख्‍येमुळे स्‍मार्ट लायटिंगसाठी मागणी स्थिरगतीने वाढत आहे, आम्‍हाला आमचे नवीनच लॉन्‍च केलेले पोर्टेबल टेबल लॅम्‍प्‍स फिलिप्‍स स्‍मार्ट एलईडी स्‍क्‍वेयर व फिलिप्‍स स्‍मार्ट एलईडी हिरोसह भारतात आमची फिलिप्‍स स्‍मार्ट वाय-फाय लायटिंग श्रेणीच्‍या विस्‍तारीकरणाची घोषणा करताना आनंद होत आहे. आम्‍हाला विश्‍वास आहे की, वापरकर्ते या प्‍लग-अॅण्‍ड-प्‍ले पोर्टेबल लॅम्‍प्‍सचा आनंद घेतील.’’

फिलिप्‍स स्‍मार्ट एलईडी स्‍क्‍वेयर (Philips Smart LED Squire) व फिलिप्‍स स्‍मार्ट एलईडी हिरो (Philips Smart LED Hero) भारतातील आघाडीच्‍या ई-कॉमर्स व्‍यासपीठांवर सफेद रंग व ९ वॅट पर्यायामध्‍ये उपलब्‍ध आहेत.

समाप्‍त

अधिक माहितीसाठी कृपया संपर्क साधा:

सिग्निफाय

नताशा वाधवा

ई-मेल: natasha.tandon@signify.com

वेबर शँडविक

नंदिनी गंगोपाध्‍याय

टेलि.: +919999411204

ई-मेल: NGangopadhyay@webershandwick.com

सिग्निफाय विषयी

सिग्निफाय (Signify) (युरोनेक्स्ट: LIGHT) ही व्यावसायिक ग्राहकोपयोगी लायटिंग आणि इंटरनेट ऑफ थिंग्जसाठीचे लायटिंग याक्षेत्रातील जागतिक स्तरावरील आघाडीची कंपनी आहे. आमची फिलिप्स(Philips) उत्पादने, इंटरअॅक्ट (Interact) कनेक्टेड लायटिंग सिस्टम्सआणि डेटाएनेबल्ड सेवा, व्यावसायिक मूल्यनिर्मिती करतात आणि घरे, इमारती सार्वजनिक स्थळांवरील आयुष्य बदलून टाकतात. २०२१ मध्येकंपनीने . अब्ज विक्रीचा टप्पा साध्य केला, आमच्याकडे सुमारे३७,००० कर्मचारी आहेत आणि ७० देशांत आमचे कार्यक्षेत्र आहे. आम्हीअधिक चमकदार आयुष्य अधिक चांगल्या जगासाठी प्रकाशाचीअसामान्य संभाव्यता खुली करतो. आम्ही २०२० मध्ये कार्बन न्यूट्रॅलिटीसाध्य (achieved) केली आहे आणि डोव जोन्स सस्टेनिबिलिटी वर्ल्डइंडेक्समध्ये (Dow Jones Sustainability World Index) गेल्या सलगपाच वर्षांपासून स्थान प्राप्त करत आहोत (been). २०१७ (2017), २०१८(2018) २०१९ (2019) मध्ये आम्ही उद्योगक्षेत्रात आघाडीच्या स्थानावर(Industry Leader) होतो. सिग्निफायबद्दलच्या बातम्या न्यूजरूम(Newsroom), ट्विटर (Twitter), लिंक्डइन (LinkedIn) इन्स्टाग्रामवर(Instagram) बघता येतात. गुंतवणूकदारांची माहिती इन्व्हेस्टर रिलेशन्स(Investor Relations) पेजवर बघता येऊ शकते.

Related posts

अपग्रॅड चार शहरांमध्ये विस्तार करणार

Shivani Shetty

गोल्ड मेडल इलेक्ट्रिकलस् ने मेट्रो रेल्वे मध्ये खास ब्रँडिंग चालू केले

Shivani Shetty

IMDb द्वारे 2022 च्या सर्वाधिक हिट भारतीय चित्रपट व वेब सिरीजची घोषणा

Shivani Shetty

Leave a Comment