मुंबई, २५ जानेवारी २०२३: भारतातील एक सर्वात विश्वसनीय आणि आघाडीचा ज्वेलरी ब्रँड कल्याण ज्वेलर्स महाराष्ट्र राज्यासाठी आपल्या क्षेत्रीय ब्रँड ॲम्बेसॅडर पूजा सावंत यांचा वाढदिवस अतिशय अनोख्या पद्धतीने साजरा करत आहे. ब्रँडने आधी केलेल्या कॅम्पेनमधील अभिनेत्री पूजा सावंत यांचे सर्वात आकर्षक व शानदार लूक्स दाखवणारा विशेष व्हिडिओ कल्याण ज्वेलर्सने प्रकाशित केला आहे. पूजा सावंत यांचा वाढदिवस त्यांच्यासाठी व त्यांच्या चाहत्यांसाठी जास्तीत जास्त खास व आनंददायी बनावा हा ब्रँडचा प्रयत्न आहे.
अनेक ब्लॉकबस्टर सिनेमांमध्ये प्रमुख भूमिका साकारून, सिनेप्रेमींच्या मनात विशेष स्थान मिळवलेल्या पूजा सावंत या देशभरातील चाहत्यांच्या सर्वात आवडत्या मराठी अभिनेत्रींपैकी एक आहेत. पूजा सावंत गुणी अभिनेत्री तर आहेतच, त्याबरोबरीनेच त्यांचे मनमोहक लूक्स व नितळ सौंदर्य चाहत्यांना आकर्षित करते. पूजा सावंत यांचा स्टाईल सेन्स अनेकांसाठी प्रेरणा बनला आहे. सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर पूजा सावंत आपले उत्तमोत्तम फोटो नियमितपणे पोस्ट करत असतात, त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना वेगवेगळ्या स्टाईल ट्रेंड्सबाबत अद्ययावत माहिती मिळत राहते.
१) हिरवीगार पारंपरिक नऊवार आणि त्यावर कल्याण ज्वेलर्सच्या मुहूरत कलेक्शनमधील अतिशय शानदार ब्रायडल सेट परिधान करून सजलेल्या पूजा सावंत यांचे रूप अतिशय लोभसवाणे दिसत आहे. एक चोकर आणि हारांचे दोन सेट्स एकत्र करून तयार करण्यात आलेले लेयर्स आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहेत. ४ लेयर्सचा मण्यांचा हार पूजाच्या लूकला पूर्णत्व प्रदान करतो. पारंपरिक पेशवाई नथीतील मोती लक्ष वेधून घेत आहेत, मुंडावळ्या या लूकचा अस्सलपणा दर्शवत आहेत. या संपूर्ण लूकला अतिशय साजेशा अशा सोन्याच्या बांगड्या पाहताक्षणी नजर खिळवून ठेवणाऱ्या आणि कायमच्या लक्षात राहतील अशा आहेत.
२) पूजा सावंत यांच्या अद्भुत सौंदर्याला साजेशी सुंदर गुलाबी साडी, त्यावर मोठा सोन्याचा हार, त्याला मॅचिंग झुमके आणि बांगड्या असा हा लूक चित्ताकर्षक आहे. हाराला लटकवलेले सफेद मणी, कानातले सोनेरी व गुलाबी रंगाच्या साडीवर खूप छान कॉन्ट्रास्ट निर्माण करतात आणि त्यामुळे दागिने उठून दिसतात. हातातील कड्याचे डिझाईन खूप अनोखे आहे, साडीच्या रंगाला मॅचिंग अंगठ्या त्यांच्या लूकला पूर्णत्व प्रदान करतात.
३) कल्याण ज्वेलर्सच्या क्षेत्रीय ब्रँड ॲम्बेसॅडर पूजा सावंत यांचा हा मिनिमलिस्ट आणि तरीही अतिशय आकर्षक असा लूक नाजूकपणे घडवण्यात आलेल्या हिऱ्यांच्या कानातल्यांमुळे मनात कायमचे घर करून राहतो. कल्याण ज्वेलर्सचे हे कानातले सेमी-ट्रॅडिशनल तसेच पारंपरिक लूकसाठी देखील खूप साजेसे आहेत.
४) केशरी रंगाची सुंदर साडी, त्यावर अतिशय शानदार हिऱ्यांचा सेट परिधान केलेल्या पूजा सावंत खूप छान दिसत आहेत. अतिशय नाजूक हारामध्ये संपूर्ण नक्षीभर हिरे जडवण्यात आले आहेत. हाराच्या मध्यभागी एक रुबी आहे जो हाराचे सौंदर्य खुलवतो. कानातले व मांग-टिक्का देखील नेकलेसच्या नाजूक तरीही क्लासिक डिझाईनला साजेसे आहेत.