नोव्हेंबर* : “कुलस्वामिनी” या चित्रपटातून प्रेक्षकांना “देवी माता महालक्ष्मी” चे दिव्य स्वरुप आणि तिच्या विविध रूपांचे दर्शन घडणार आहे. हा चित्रपट कल्याणी आणि बाळासाहेब देशमुख या मुख्य पात्रांच्या आयुष्यात बदल घडवणाऱ्या विविध घटनांचा प्रवास असून देवीची दैवी शक्ती त्यांची विचारसरणी आणि त्यांचे जीवन कसे पूर्णपणे बदलते हे दाखवते. या चित्रपटात सुप्रसिद्ध अभिनेते डॉ. विलास उजवणे, चित्रा देशमुख, सागर कोराडे, योगिनी पोफले, प्रसन्न काळे आदींच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन जागेश्वर ढोबळे यांनी केले असून अल्ट्रा मीडिया आणि एंटरटेनमेंट ग्रुप निर्मित आहे. यात अनुराधा पौडवाल, प्रवीण कुवर, गौरव चाटी आणि अभिजित जोशी यांसारख्या प्रसिद्ध गायकांनी गायलेली 5 भावपूर्ण आणि भक्तिगीते आहेत. सुप्रसिद्ध संगीतकार आणि गीतकार अभिजित जोशी यांनी संगीत आणि गीते दिली आहेत. हा चित्रपट 11 नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
अनुराधा पौडवाल यांचे मराठी चित्रपटात पार्श्वगायिका म्हणून पुनरागमन करणाऱ्या “कुलस्वामिनी’चे चित्रीकरण महाराष्ट्राच्या विविध भागातील सुंदर ठिकाणी झाले आहे. 28 ऑक्टोबर रोजी ट्रेलर लाँच झाल्यापासून या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटातील प्रमुख कलाकार बाळासाहेब देशमुख यांची भूमिका साकारणारे डॉ. विलास उजवणे असून ही कथा ज्या गावातली आहे त्या गावातील एक अतिशय प्रभावी व्यक्तिरेखा आहे. ते कल्याणी देशमुख यांचे पती आहेत, देवी महालक्ष्मीची ती निस्सीम भक्त आहे. डॉ. विलास उजवणे हे मराठी आणि हिंदी अशा दोन्ही चित्रपटांतील दमदार अभिनयासाठी ओळखले जातात. त्याचबरोबर कल्याणीची भूमिका अभिनेत्री चित्रा देशमुख हिने साकारली आहे. १९९२ साली प्रदर्शित झालेला ‘दौलत की जंग’ या चित्रपटातून अभिनयाची कारकीर्द असलेली अभिनेत्री चित्रा देशमुख यांना अल्ट्रा प्रस्तूत ‘ढ लेकाचा’ या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे मोठ्या पडद्यावरील आणि OTT प्लॅटफॉर्मसाठी विविध वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट दिग्दर्शित करण्याचा अनुभव गाठीशी असलेले जागेश्वर ढोबळे यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.