– रेट्रोफिट एमिशन कंट्रोल डिव्हाइससाठी (आरईसीडी) क्लास 1 सर्टिफिकेशन मिळणारी पहिलीच कंपनी
पीआय ग्रीन इनोव्हेशन्स प्रा. लि. या भारतातील आघाडीच्या क्लीनटेक स्टार्ट अप कंपनीला सेंट्रल पोल्यूशन कंट्रोल बोर्डाकडून (सीपीसीबी) त्यांच्या कार्बन कटर मशिन – रेट्रोफिट एमिशन कंट्रोल डिव्हाइससाठी (आरईसीडी) टाइप अप्रुव्हल सर्टिफिकेशन मिळाले आहे. माननीय राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) २०१९ मध्ये डीजी सेट्समधून विशिष्ट मॅटर त्याच्या तेव्हाच्या पातळीवरून ७० टक्क्यांनी कमी करण्याचा आदेश काढला होता. त्यावर आधारित सीपीसीबीने ८००केडब्ल्यू विभागापेक्षा कमी क्षमतेच्या डीजी सेट्ससाठी आपले मापदंड आणि नियमांत सुधारणा केल्या. पीआय ग्रीन इनोव्हेशन्सतर्फे प्रमाणित आरईसीडी हे अशाप्रकारचे महत्त्वाकांक्षी ध्येय साध्य करण्याच्या दिशेने उचललेले मोठे पाऊल आहे. या प्रमाणपत्रामुळे पीआय ग्रीनच्या कार्बन कटर तंत्रज्ञानाचे प्रमाणीकरण झाले असून