maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

रॉयल कॅनिनने भिवंडी येथे अत्याधुनिक पॅकेजिंग केंद्र सुरू केले

मुंबई, २३ एप्रिल २०२४: मांजरी आणि कुत्र्यांसाठीपोषणाच्या माध्यमातूनआरोग्य समाधान देणाऱ्या आणि मार्स इन्कॉर्पोरेटेडचा भाग असलेल्या रॉयलकॅनिन या एका जागतिक स्तरावरील आघाडीच्या कंपनीने आजमहाराष्ट्रातील भिवंडी येथे आपले नवीन पॅकेजिंग केंद्र सुरू केल्याचे जाहीरकेले. रॉयल कॅनिन आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात एप्रिल २०२३ मध्येझालेल्या एमओयूला अनुसरून रॉयल कॅनिनने सुरू केलेले हे पॅकेजिंग केंद्रम्हणजे भारतीय पेट केअर मार्केटप्रती रॉयल कॅनिनची वचनबद्धता आणखीमजबूत करणारा लक्षणीय टप्पा आहे.

पेट्ससाठी अधिक सुंदर जग या कल्पनेने प्रेरित होऊन रॉयल कॅनिननेसुमारे १०० कोटी रुपयांची धोरणात्मक गुंतवणूक केली आहे आणिलक्षावधी मांजरी आणि कुत्रे यांची सेवा करण्यासाठीचे लवचिक उत्पादननेटवर्क अधिक मजबूत बनवण्यासाठी तसेच गुणवत्ता, किफायतशिरताआणि उपलब्धता सुनिश्चित करून पाळीव प्राण्यांच्या मालकांच्या आणिव्यावसायिकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्थानिक रोजगार आणिक्षमतांना वाव दिला आहे.

सदर नवीन पॅकेजिंग केंद्र ही रॉयल कॅनिनची भारतातील पहिली सुविधाआहे. यामध्ये स्वयंचलित पॅकिंग मशीन्स आणि संबंधित साधने असतील, ज्यांच्या मदतीने उत्पादनाच्या मोठ्या साठ्यामधून भारतीय पाळीवप्राण्यांच्या गरजा भागवू शकतील असे किरकोळ (रिटेल) पॅक बनवण्यातयेतील.

रॉयल कॅनिनचे ग्लोबल प्रेसिडेंट सेसिल कूटन्स म्हणाले, “भारत हे अत्यंतझपाट्याने वाढत असलेले पेट केअर मार्केट आहे ज्याचा सीएजीआरजवळजवळ १५% आहे. आजकाल पाळीव प्राण्यांचे मालक आपल्याप्राण्यांच्या आरोग्याविषयी आणि त्यांच्या कल्याणाविषयी फारच जागरूकहोऊ लागले आहेत आणि आपल्या लाडक्या प्राण्याला दर्जेदार पोषण आणिदेखभाल देण्याची त्यांची इच्छा असते. रॉयल कॅनिनमध्ये आमचा हा दृढविश्वास आहे की, पाळीव प्राण्यांचे कल्याण सुनिश्चित करण्यासाठी नेमकेपोषण हा श्रेष्ठ आणि सर्वात सोपा मार्ग आहे. भिवंडी येथे आमच्या नवीनपॅकेजिंग केंद्राचे संचालन सुरू झाल्यामुळे आम्ही भारतातील पाळीवप्राण्यांच्या मालकांना आणखी चांगली मदत करू शकू आणि त्यांना आपल्यालाडक्या प्राण्यासाठीपोषणाच्या माध्यमातून आरोग्य उपाय नेमकेपणानेप्रदान करू शकू. इंडिया पॅकेजिंग सेंटर ही आमच्या उत्पादन नेटवर्कमधली१७ वी सुविधा आहे, जिच्यामुळे देशातील आमची पुरवठा साखळी अधिकमजबूत होईल.

रॉयल कॅनिनचे जनरल मॅनेजर, सतींदर सिंह म्हणाले, “आम्ही सहर्ष जाहीरकरतो की, महाराष्ट्रातील आमची नवीन सुविधा आता संपूर्णपणे कार्यान्वितझाली आहे. रॉयल कॅनिनमध्ये आम्ही जे काही करतो, तेपेट्ससाठी अधिकसुंदर जग या आमच्या उद्देशाला अनुसरून असते. ही नवीन सुविधा आमच्याउपभोक्ता अनुभवाचा एक भाग आहे, जी आम्हाला अधिकाधिक मांजरीआणि कुत्र्यांना दर्जेदार पोषण देण्यास सक्षम करेल. अत्याधुनिक सुविधांनीसज्ज असलेल्या या नवीन पॅकेजिंग केंद्राच्या संचालनातून भारतातीलपेट्सच्या मालकांना त्यांच्या लाडक्या प्राण्यांच्या गरजेनुसार उत्तम उत्पादनेप्रदान करण्याची आमची वचनबद्धता दिसून येते. ही नवीन सुविधा भारतसरकारच्या भारतीय अर्थतंत्राला सहाय्यभूत ठरणाऱ्यामेक इन इंडियाअभियानास देखील अनुसारणारी आहे.

Related posts

पुणेस्थित डिजिकोअर स्टुडिओजने घडवला इतिहास

Shivani Shetty

“कोळी फोर्क-लॉर्स” कार्यक्रमात परंपरा आणि संस्कृतीचे एकत्रीकरण

Shivani Shetty

आर के स्वामी लिमिटेडने प्रमुख गुंतवणूकदारांना ६५ लाख इक्विटी शेअर्सचे वाटप करून १८७ कोटी रुपये उभारले

Shivani Shetty

Leave a Comment