maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

हिरो मोटोकॉर्पने नवीन श्रेणी व भावी कन्‍सेप्‍टमधील प्रॉडक्‍शन-रेडी वेईकल्‍ससह ईआयसीएमए २०२३ येथेसर्वांचे लक्ष वेधून घेतले

बी द फ्यूचर ऑफ मोबिलिटीया आपल्‍या दृष्टिकोनाशी बांधील राहत हिरो मोटोकॉर्प नवकल्‍पना आणि व्‍यापक संशोधनाच्‍या माध्‍यमातून कार्यरत आहे. ब्रॅण्‍ड हिरोवर जगभरातील ११२ दशलक्ष ग्राहकांचा विश्‍वास आहे आणि आता स्‍वत:ला तंत्रज्ञान पॉवरहाऊस म्‍हणून बदलत आहे, जो जगभरातील विकसित होत असलेल्‍या ग्राहकांना सेवा देण्‍यास सज्‍ज आहे. 

 

आमच्‍या पर्यावरणास-अनुकूल, शाश्‍वत हरित निर्माण, इंधन-कार्यक्षम आयसीई उत्‍पादने आणि भारत व जर्मनीमधील आमच्‍या जागतिक दर्जाच्‍या संशोधन व विकास केंद्रांमध्‍ये विकसित केलेल्‍या तंत्रज्ञानदृष्‍ट्या प्रगत इलेक्ट्रिक वाहनांच्‍या माध्‍यमातून आम्‍ही जगभरातील विविध भौगोलिकक्षेत्रांमधील ग्राहकांच्‍या विद्यमान व भावी गतीशीलता गरजांची पूर्तता करण्‍याप्रती कटिबद्ध आहोत. 

आमच्‍या इलेक्ट्रिक वेईकल्‍ससह युरोपमध्‍ये प्रवेश करत मला विश्‍वास आहे की, हिरो मोटोकॉर्प जगातील इतर भागांमध्‍ये केलेल्‍या उत्तमकामगिरीप्रमाणे लवकरच प्रदेशातील प्रमुख बाजारपेठांमध्‍ये विश्‍वसनीय ब्रॅण्‍ड म्‍हणून उदयास येईल. भावी पिढ्यांसाठी शुद्ध, अनुकूल व आदरातिथ्‍य विश्‍व असण्‍याप्रती आमचे तत्त्व आमची उत्‍पादने व सेवांच्‍या माध्‍यमातूनअमलात आणण्‍यात आले आहे. मला खात्री आहे की, हे तत्त्व जगभरातील आमच्‍या सर्व भागधारकांशी संलग्‍न होईल.”  

डॉ. पवन मुंजाळ 

कार्यकारी अध्‍यक्ष, हिरो मोटोकॉर्प 

हिरो मोटोकॉर्प या जगातील मोटरसायकल्‍स व स्‍कूटर्सच्‍या सर्वात मोठ्या उत्‍पादक कंपनीने मंगळवारी ईआयसीएमए २०२३ येथे अनेक धोरणात्‍मक उपक्रमांसह इलेक्ट्रिक मोबिलिटीमधील आपली उपस्थिती वाढवण्‍यासाठी व्‍यापक विकास योजनांची, तसेच नवीन आयसीई वेईकल श्रेणींमध्‍ये व युरोपमध्‍ये प्रवेश करण्‍याची घोषणा केली.

जगभरातील ग्राहकांना जागतिक दर्जाचा अनुभव व उत्‍पादने देण्‍याप्रतीआपल्‍या कटिबद्धतेशी बांधील राहत कंपनीने जगातील सर्वात मोठे दुचाकी एक्‍स्‍पो ईआयसीएमए येथे तीन कन्‍सेप्‍ट वेईकल्‍स आणि तीन प्रॉडक्‍शन-रेडी वेईकल्‍सचे अनावरण केले. तसेच कंपनीने २०२४ च्‍या मध्‍यापर्यंत स्‍पेन,फ्रान्‍स व यूके अशा युरोपियन बाजारपेठांमध्‍ये प्रवेश करण्‍याच्‍या रोड-मॅपची देखील घोषणा केली. 

ईआयसीएमए येथील कंपनीच्‍या स्‍टॉलमध्‍ये जागतिक मीडियाला संबोधितकरताना हिरो मोटोकॉर्पचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी (सीईओ) निरंजन गुप्‍ता म्‍हणाले, ”आम्‍हाला जगभरातील आमच्‍या भागधारकांना आमची नवीन उत्‍पादने व तंत्रज्ञान दाखवताना आनंद होत आहे. आम्‍ही २०२४ च्‍या मध्‍यापर्यंत यूके, स्‍पेन व फ्रान्‍स या प्रत्‍येक बाजारपेठेमध्‍ये व्‍यावसायिककार्यसंचालन सुरू करण्‍यासाठी तेथील अत्‍यंत विश्‍वसनीय भागीदारांसोबत सहयोग करत आहोत. 

आम्‍ही या देशांमध्‍ये प्रथम आमची इलेक्ट्रिक स्‍कूटर व्हिडा व्‍ही१ सादर करणार आहोत आणि त्‍यानंतर येथे प्रदर्शनामध्‍ये दाखवण्‍यात आलेल्‍या उच्‍च क्षमतेच्‍या प्रिमिअम आयसीई मोटरसायसकल्‍स व स्‍कूटर्ससह आमच्‍या ऑफरिंग्‍जचा विस्‍तार करणार आहोत. आकर्षक दरांमध्‍ये उच्‍च दर्जाचेवैयक्तिक गतीशीलता सोल्‍यूशन्‍स प्रदान करण्‍यामधील आमच्‍या कौशल्‍यांसह आम्‍हाला विश्‍वास आहे की, आमच्‍या उत्‍पादनांच्‍या नवीन श्रेणीचे विविध भौगोलिक क्षेत्रांमधील ग्राहक कौतुक करतील. आमचाजगासाठी भारतात नाविन्‍यता आणणे व उत्‍पादन करणेहा संकल्‍प आहे आणि आम्‍ही हे लक्ष्‍य साध्‍य करण्‍याच्‍या दिशेने वाटचाल करत आहोत.” 

उत्‍पादनांचे प्रदर्शन 

कंपनीने प्रदर्शनामध्‍ये दोन नवीन आयसीई स्‍कूटर्स – झूम १२५आर आणिझूम १६० यांचे अनावरण केले. दोन्‍ही स्‍कूटर्स लवकरच विविध भौगोलिक क्षेत्रांमध्‍ये प्रवेश करतील.  

तसेच कंपनीने युरोप व यूके बाजारपेठांसाठी व्हिडा व्‍ही१ प्रो चे देखीलअनावरण केले. व्हिडा व्‍ही१ ही हिरोचे पाठबळ असलेला त्‍यांचा उदयोन्‍मुख मोबिलिटी ब्रॅण्‍ड – व्हिडा अंतर्गत लाँच करण्‍यात आलेली कंपनीची पहिली ई-स्‍कूटर आहे. 

उच्‍च क्षमतेच्‍या प्रिमिअम मोटरसायकल्‍सचा सर्वसमावेशक पोर्टफोलिओनिर्माण करत कंपनीने कन्‍सेप्‍ट २.५आर एक्‍सटण्टचे देखील अनावरण केली, जी कंपनीसाठी नवीन श्रेणी आहे. 

बी द फ्यूचर ऑफ मोबिलिटीया आपल्‍या दृष्टिकोनाशी बांधील राहत हिरो मोटोकॉर्पने दोन ईव्‍ही कन्‍सेप्‍ट्सचे अनावरण केले – लिंक्‍स व अॅक्रो.ही दोन्‍ही उत्‍पादने शहरी गतीशीलतेला नव्‍या उंचीवर घेऊन जातात आणि कंपनीचे म्‍युनिचजवळील युरोपियन आरअॅण्‍डडी हब – टेक सेंटर जर्मनी येथे विकसित करण्‍यात आली आहेत. 

जागतिक विस्‍तारीकरण

प्रमुख युरोपियन बाजारपेठांमध्‍ये प्रवेश करण्‍याप्रती आपल्‍या योजनांना दाखवत हिरो मोटोकॉर्पने त्‍यांचा इलेक्ट्रिक वेईकल ब्रॅण्‍ड व्हिडासहयुरोपमध्‍ये प्रवेश करण्‍याची देखील घोषणा केली. 

व्हिडा व्‍ही१ विविध युरोपियन बाजारपेठांमध्‍ये प्रवेश करणारे पहिले उत्‍पादन असेल, ज्‍याची सुरूवात स्‍पेन व फ्रान्‍ससह होईल. तसेच, कंपनी युनायटेड किंग्‍डममध्‍ये कार्यसंचालनांना देखील सुरूवात करेल.

हिरो मोटोकॉर्प कॅलेंडर वर्ष २०२४ च्‍या मध्‍यापर्यत येथे व्‍यावसायिककार्यसंचालनांना सुरूवात करेल. योग्‍य वेळी कंपनी या देशांमध्‍ये आयसीई मोटरसायकल्‍स व स्‍कूटर्सची प्रिमिअम श्रेणी सादर करण्‍यास देखील सुरूवात करेल. 

कंपनीने या प्रत्‍येक देशासाठी वितरकांना ओळखले आहे आणि व्यावसायिक करारांना अंतिम रूप देण्याची प्रक्रिया सुरू आहे           

  • युनायटेड किंग्‍डम जवळपास ४० वर्ष जुनी मोटोजीबी यूकेमध्‍येहिरो मोटोकॉर्पची वितरक असणार आहे. कंपनी स्‍कूटर्स व मोटरसायकल्‍स आणि संबंधित सहाय्यक: स्‍पेअर पार्टस्, क्‍लोदिंग,अॅक्‍सेसरीज व युज्‍ड बाइक्‍स यांची विक्री व वितरणामध्‍ये सामीलआहे. त्‍यांचे जवळपास १५० हून अधिक डि‍लरशिप्‍सचे स्‍वावलंबी डिलर नेटवर्क आहे.
  • फ्रान्‍स जीडी फ्रान्‍स फ्रान्‍समध्‍ये हिरो मोटोकॉर्पची वितरक असेल. ऑटोमोटिव्‍ह उद्योगामध्‍ये २० वर्षांहून अधिक काळाचा अनुभव असलेली जीडी फ्रान्‍स फ्रेंच बाजारपेठेतील दुचाकी व चारचाकी गतीशीलता क्षेत्रामधील प्रमुख कंपनी आहे, जिचे ३०० हून अधिक व्‍यावसायिक डिलर्स आहेत. ग्रुपने २०२३ मध्‍ये बाजारपेठेतील स्थिती अत्‍यंत आव्‍हानात्‍मक असताना देखील टॉप-१० ब्रॅण्‍ड्समध्‍ये प्रवेश केला आहे. 
  • स्‍पेन ओनेक्‍स ग्रुपची उपकंपनी नोरिया मोटोस स्‍पेनमध्‍ये हिरो मोटोकॉर्पची वितरक असेल. ओनेक्‍स ग्रुप ३५ वर्षांपासून दुचाकीब्रॅण्‍ड्सचे वितरण करत आहे आणि देशामध्‍ये नवीन ब्रॅण्‍ड्स सादर करण्‍यामध्‍ये व स्‍थापित करण्‍यामध्‍ये तज्ञ आहेत.    

ईआयसीएमए येथे हिरोचा जागतिक दर्जाचा स्‍टॉल फियरा मिलानो येथील ए४८, हॉल ११ येथे स्थित आहे. विविध जागतिक भागधारक ग्रुप्‍ससोबत सहयोग करत कंपनी बूथमध्‍ये आपली सर्वसमावेशक उत्‍पादन व तंत्रज्ञान श्रेणी दाखवत आहे. अधिक माहितीसाठी येथे भेट द्या –www.HeroAtEICMA.com

नवीन उत्‍पादनांची सविस्‍तर माहिती 

झूम १२५आर 

नवीन झूम १२५आर फाल्‍कनच्‍या फ्लाइटमधून प्रेरित डिझाइन वैशिष्‍ट्यांसहउत्‍साहित आधुनिक योद्धासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. डिझाइनमध्‍ये नवीन १४ इंच प्‍लॅटफॉर्म आहे, जो अधिक स्थिरता वआकर्षक स्‍टाइलिंगसह परिपूर्ण ऐरोडायनॅमिक्‍स देतो. प्रगत एलईडी लायटिंग पॅकेजसह फर्स्‍ट-इन-सेगमेंट सेक्‍वेन्शियल एलईडी विंकर्स,डिजिटल स्‍पीडोमीटरसह ब्‍ल्‍यूटूथ कनेक्‍टीव्‍हीटी आणि टर्न-बाय-टर्ननेव्हिगेशन ही वैशिष्‍ट्ये झूम १२५आर ला परिपूर्ण पॅकेज बनवतात. सुधारित १२५ सीसी इंजिनची शक्‍ती असलेली ही वेईकल दर्जात्‍मक वेईकल डायनॅमिक्सच्‍या माध्‍यमातून जलद अॅक्‍सेलरेशन देते. 

झूम १६० 

नवीन विभागात प्रवेश करत हिरो मोटोकॉर्प झूम १६० सह झूम ब्रॅण्‍डप्रोफाइल विस्‍तारित करत आहे. झूम १६० कमी प्रवास केलेल्‍या रस्‍त्‍यांवरराइडिंगचा आनंद घेण्‍यासाठी राइडरच्‍या क्षमतांना आव्‍हान करते, तसेच सर्व व्‍यावहारिकता प्रदान करते. 

नवीन स्‍कूटर जीवनात एक्‍स्‍ट्राची भर करते – एक्‍स्‍ट्रा स्‍पेस, एक्‍स्‍ट्रा कम्‍फर्ट,एक्‍स्‍ट्रा सुपरियोरिटी आणि एक्‍स्‍ट्रा रोड प्रेझेन्‍स, ज्‍यामधून कुठेही व कधीही राइडिंगचा आनंद घेण्‍याचा अनुभव मिळतो. सुधारित आय३एस सायलेण्‍ट स्‍टार्ट टेकसह (इडल स्‍टॉप व सायलेण्‍ट स्‍टार्ट सिस्‍टम) १५६ सीसी लिक्विड कूल्‍ड इंजिनची शक्‍ती आणि लक्षवेधक व गतीशील डिझाइनसह गो-एनीव्‍हेअर कार्यक्षमता असलेली झूम १६० सर्वांचे लक्ष वेधून घेते.

नवीन झूम १६० मध्‍ये सर्वोत्तम स्थिरता व आरामदायीपणासाठी १४ इंचमोठ्या व्‍हील्‍ससह ब्‍लॉक पॅटर्न वाइड टायर्स, स्‍मार्ट की सह कीलेस इग्निशन, रिमोट सीट ओपनिंग, स्‍मार्ट फाइण्‍ड आणि आकर्षक बोल्‍ड डिझाइनसह ड्युअल चेम्‍बर एलईडी हेडलॅम्‍प व एलईडी टेल लॅम्‍प आहे. 

कन्‍सेप्‍ट २.५आर एक्‍सटण्‍ट 

सादर करण्‍यात आलेलीकन्‍सेप्‍ट २.५आर एक्‍सटण्‍टआधुनिक काळातील साहसी राइडचा, तसेच शहरातील उत्‍साहपूर्ण राइडचा आनंद घेण्‍याची इच्‍छा असलेल्‍या राइडर्ससाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. ही मोटरसायकल अचूकता, गतीशीलता व अद्वितीय स्‍टाइलची प्रतीक आहे. 

शहरातील रस्‍त्‍यांवरील राइडिंगसाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या एक्‍सटण्‍टमध्‍ये आक्रमक स्‍टान्‍स आहे, जी वळणदार रस्‍त्‍यांवर अचूक रा‍इडिंगचा अनुभव देण्‍यास सज्‍ज आहे. या वेईकलमधील वजनाने हलके चेसिस, शक्तिशाली इंजिन आणि प्रगत तंत्रज्ञान प्रत्‍येक राइड उत्‍साहपूर्ण करतात, तसेच आत्‍मविश्‍वासाने राइडिंगचा अधिक आनंद घेण्‍यास प्रेरित करतात.

एक्‍सटण्‍ट अद्वितीय व आकर्षक डिझाइनसह सर्वांचे लक्ष वेधून घेते. यामोटरसायकलमधून भावी राइडिंगची झलक पाहायला मिळते. ही कार्यक्षमता, स्‍टाइल आणि शहरी फ्रीस्‍टाइलच्‍या रोमांचची मागणी करणाऱ्या राइडर्सच्‍या भावी पिढीसाठी डिझाइन करण्‍यात आलेलीमोटरसायकल आहे.

एक्‍सटण्‍टचे उच्‍च-कार्यक्षम लिक्विड-कूल्‍ड इंजिन ट्रेलिस फ्रेममध्‍ये समाविष्‍ट आहे, तसेच यूएसडी फ्रण्‍ट फोर्क्‍स, अॅडजस्‍टेबल मोनो रिअर सस्‍पेंशन आहे.वेईकलमध्‍ये अॅक्टिव्‍ह-ऐरो तंत्रज्ञान आणि फॉलो मी ड्रोन यांसारखी अत्‍याधुनिक वैशिष्‍ट्ये आहेत. कन्‍सेप्‍ट २.५आर एक्‍सटण्‍टसह नीडर राइडरप्रमाणे साहसी राइडिंगचा आनंद घेण्‍याची वेळ आली आहे. 

व्हिडा व्‍ही१ प्रो  

हिरो मोटोकॉर्पच्‍या इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रातील प्रथम प्रवेशाला सादर करणारी ही इलेक्ट्रिक स्‍कूटर भारतात ऑक्‍टोबर २०२२ मध्‍ये लाँचकरण्‍यात आली. आता युरोप व यूकेमध्‍ये प्रवेश करण्‍यास सज्‍ज असलेल्‍या व्‍ही१ प्रोचा इलेक्ट्रिक स्‍कूटरने २४ तासांमध्‍ये सर्वाधिक कापलेल्‍या अंतराच्‍या विक्रमासाठी गिनीज वर्ल्‍ड रेकॉर्ड बुकमध्‍ये समावेश करण्‍यात आला आहे. या स्‍कूटरने २४ तासांमध्‍ये १,७८० किमी (१,१०६.०४ मैल) अंतर पार केले, ज्‍यामधून व्हिडा व्‍ही१ ची उल्‍लेखनीय अभियांत्रिकी व कार्यक्षमतादिसून येते. 

अत्‍यंत सानुकूल, बिल्‍ट-टू-लास्‍ट व्हिडा व्‍ही१ मध्‍ये सोईस्‍कर दोन रिमूव्‍हेबलबॅटऱ्या आणि स्थिर चार्जिंग पर्याय आहे. या वेईकलमध्‍ये कार्यक्षमता, नो-कॉम्‍प्रोमाइज रेंज व टॉप-स्‍पीडचे दर्जात्‍मक संयोजन आहे. 

व्हिडा व्‍ही१ मध्‍ये सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये आहेत, जसे कस्‍टम मोड (१०० हूनअधिक कॉम्‍बीनेशन्‍स), क्रूझ कंट्रोल, बूस्‍ट मोड, टू-वे थ्रॉटल, की-लेस अॅक्‍सेस आणि ओव्‍हर-द-एअर एनेबल ७ इंच टीएफटी टचस्क्रिन. व्‍हिडाव्‍ही१ इंटेलिजण्‍ट प्‍लॅटफॉर्मवर आधारित आहे, जो मॉड्युलर, स्‍केलेबल आणि फ्लेक्झिबल आहे, ज्‍यामुळे सहजपणे राइडिंगचा आनंद घेता येतो. व्हिडा व्‍ही१ राइडरसह विकसित होते. 

व्हिडा व्‍ही१ कूपे 

अॅक्‍सेसरी व्हिडा व्‍ही१ ला सिंगल सीटरमध्‍ये बदलते आणि राइडरची गरजव स्‍टाइलनुसार पुन्‍हा टू-सीटरमध्‍ये बदलता येते. यामुळे एकट्याने राइडिंगचा आनंद घेता येतो, तसेच कार्यक्षमता कायम राहते. व्हिडा व्‍ही१ कूपे मध्‍ये व्‍यावहारिकता व वैयक्तिक अभिव्‍यक्‍तीचे एकसंधी संयोजन आहे. 

कन्‍सेप्‍ट लिंक्‍स (ऑफ रोड इलेक्ट्रिक मोटरसायकल) 

चढण्‍याच्‍या चपळतेसाठी ओळखली जाणारी मध्‍यम आकाराच्‍या ठिपकेदार जंगली मांजर लिंक्‍समधून प्रेरित या उत्‍पादनाचा मुख्‍य फोकस सर्वात कमीवजनासह सर्वोत्तम राइड व हँडलिंग वैशिष्‍ट्ये प्रदान करण्‍यावर आहे. इलेक्ट्रिक मोटरचे इन्‍स्‍टण्‍ट टॉर्क व शांतमय कार्यसंचालन निसर्ग, तसेच निवासी भागांमध्‍ये कोणतेही अडथळे व व्‍यत्‍ययांशिवाय अनेक क्षमता देते

डिझाइन: 

लिंक्‍समधील डिझाइनमधून लिंक्‍स मांजरीची दृढक्षमता दिसून येते.शक्तिशाली व चपळ फ्रेमसह ही वेईकल सर्वात आव्‍हानात्‍मक प्रदेशांमध्‍ये सहजपणे राइडिंगची खात्री देते. आकर्षकता वेईकलला विशिष्‍ट, साहसी लुक देते, ज्‍यामधून साहसी राइडिंगचा अनुभव मिळतो. ही वेईकल सर्वोत्तम वजन वितरणासाठी पेटण्‍ट पेंडिंग सस्‍पेंशन जीओमेट्रीसह डिझाइन करण्‍यात आली आहे. यामुळे लिंक्‍स खडतर प्रदेशांमध्‍ये सहजपणे राइडिंग करण्‍यास सक्षम आहे, ज्‍यामधून सर्वात आव्‍हानात्‍मक स्थितींमध्‍ये देखील सुलभ व नियंत्रित राइडची खात्री मिळते. नवीन प्रकारच्‍या फ्रेम रचनेमुळे पुढील भागापासून मागील भागापर्यंत दर्जात्‍मक वजन वितरण प्रदान करण्‍यात आले आहे, ज्‍यामुळे हाताळणीसंदर्भात उत्तम वैशिष्‍ट्यांचा अनुभव मिळतो. 

कार्यक्षमता व तंत्रज्ञान: 

लिंक्‍सच्‍या शक्तिशाली एक्‍स्‍टीरिअरमध्‍ये उच्‍च-कार्यक्षम मोटर आहे, जी ० आरपीएममधून उच्‍च शक्‍ती व टॉर्क देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. रस्‍त्‍यावरील तीव्र चढण असो, रस्‍त्‍यांवरील खड्ड्यामधून राइड करायचे असो, वाळूमय प्रदेश किंवा ओलसर रस्‍त्‍यावरून प्रवास करायचा असो ही मोटरसायकल सर्व आव्‍हानांना पार करेल. मोबाइल अॅपच्‍या माध्‍यमातूनरिजनरेटिव्‍ह ब्रेकिंग व ट्रॅक्‍शन कंट्रोल यांसारखे घटक सानुकूल करता येऊ शकतात.

कन्‍सेप्‍ट अॅक्रो (किड्स इलेक्ट्रिक बाइक) 

अॅक्रोनावामधून निपुणतेचे कौतुक होण्‍यासह शक्तिशाली रचना दिसून येते. मुले लवकर मोठी होतात आणि त्‍यांच्‍या गरजा प्रत्‍येक सरत्‍या वर्षासह बदलत जातात. यामध्‍ये अॅक्रो लाभदायी ठरते. ही मोटरसायकल मुलांशी जुळून जाण्‍यासोबत विकसित होते, त्‍यांना आगामी काळासाठी अविरत धमाल व साहसी राइडचा अनुभव देते.

ठळक वैशिष्‍ट्ये: 

३-पॉइण्‍ट अॅडजस्‍टेबल फ्रेम: या मोटरसायकलमध्‍ये नाविन्‍यपूर्ण वैशिष्‍ट्य अॅडजस्‍टेबल अंडर २-मिनिट फ्रेम आहे, जी ३ वर्षांपासून ९ वर्षांपर्यंतच्‍या मुलांसह वाढत जाते, ज्‍याला समायोजित करण्‍यासाठी कोणत्‍याही टूल्‍सची गरज नाही. पेटेण्‍ट पेंडिंग अॅडजस्‍टेबल यंत्रणा वापरकर्त्‍याला आसनाची उंची, बाइकची लांबी व हँडलबार पोझिशन समायोजित करण्‍याची सुविधा देते, ज्‍यामधून प्रत्‍येकी ३ आकारांच्‍या बाइकमध्‍ये एर्गोनॉमिक्‍स व राइडबाबत कोणतीच तडजोड न करण्‍यात आल्याची खात्री मिळते.नियमित होम अप्‍लायन्‍सेससाठी वापरण्‍यात येणाऱ्या बॅटऱ्या सुलभ स्‍वॅप व इंट्रा कॉम्‍पॅटिबिलिटीसाठी वापरता येऊ शकतात. आता अधिक महागड्या बॅटऱ्या खरेदी करण्‍याची गरज नाही. बॅटऱ्यांना चार्ज करत एकाच वेळी वापरा. शेअरिंग इज केअरिंग. 

अॅप व डिजिटल कंट्रोल: 

सुरक्षितता अधिक महत्त्वाची आहे आणि मोटरसायकल आत्‍मविश्‍वासाने राइड करता येण्‍याच्‍या खात्रीसाठी सानुकूल स्‍पीड सेटिंग्‍जचा समावेश करण्‍यात आला आहे, ज्‍यामधून मुलांना आत्‍मविश्‍वास मिळतो आणि ते कुशल होतात. नवशिक्‍यांनी हळू व स्थिर गतीने सुरूवात करा आणि हळूहळू मुलांच्‍या क्षमतेनुसार गती वाढवा. जिओ फेन्सिंग वैशिष्‍ट्य पालकांना ऑपरेशन एरियावर नियंत्रण ठेवण्‍याची सुविधा देते. क्विक डिसेबल बटन कोणत्‍याही दुर्घटनेला प्रतिबंध करते. बाइकच्‍या लो-मेन्‍टेनन्‍स डिझाइनमुळे पालकांना कोणतीही चिंता करण्‍याची गरज नाही. इलेक्ट्रिक मोटरच्‍या शांतमय कार्यसंचालनासह ऑपरेशन पर्यावरणास अनुकूल आहे आणि धमाल राइडिंगचा आनंद देण्‍याबाबत तडजोड न करता शांतमय वातावरणाची खात्री देते.                     

Related posts

राज्यपालांच्या हस्ते पद्मश्री डॉ. मुकेश बत्रा ‘महाराष्ट्र जन गौरव पुरस्कारा’ने सन्मानित

Shivani Shetty

‘यंग शेफ यंग वेटर’ स्पर्धा २०२४ चे आयोजन

Shivani Shetty

द बॉडी शॉपचा एण्‍ड ऑफ सीझन सेल

Shivani Shetty

Leave a Comment