maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

व्हिएतजेटच्‍या पहिल्‍या तिमाहीमधील कामगिरीने एव्हिएशन विकासासाठी स्‍थापित केले नवीन मानक

(Mumbai, 2nd May 2024) – एव्हिएशन उद्योगामधील आव्‍हानात्‍मक एअरक्राफ्ट तुटवड्यावर मात करत व्हिएतजेट एव्हिएशन जॉइण्‍ट स्‍टॉक कंपनीने (HOSE: VJC) २०२४ च्‍या पहिल्‍या तिमाहीत उल्‍लेखनीय व्‍यवसाय कामगिरी केली आहे, ज्‍यामुळे संपूर्ण वर्षासाठी प्रबळ चालना मिळाली आहे.

२०२४ च्‍या पहिल्‍या तिमाहीत व्हिएतजेटचा एअर परिवहन महसूल १७.७६ ट्रिलियन व्‍हीएनडीवर (अंदाजे ७०१.१३ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) पोहोचला, तर करोत्तर नफा ५२० बिलियन व्‍हीएनडीवर (अंदाजे २०.५ दशक्षल अमेरिकन डॉलर्स) पोहोचला, ज्‍यामध्‍ये अनुक्रमे वार्षिक ३८ टक्‍के आणि २०९ टक्‍क्‍यांची वाढ झाली. एअरलाइनचा एकत्रित महसूल व करोत्तर नफा अनुक्रमे १७.७९ ट्रिलियन व्‍हीएनडी (अंदाजे ७०२.३९ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) आणि ५३९ बिलियन व्‍हीएनडी (अंदाजे २१.२७ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) होते, ज्‍यामध्‍ये अनुक्रमे वार्षिक्‍ ३८ टक्‍के आणि २१२ टक्‍क्‍यांची वाढ झाली.  

वर्षातील पहिल्‍या तीन महिन्‍यांदरम्‍यान व्हिएतजेटने जवळपास ३४,५०० फ्लाइट्सना सुरक्षितपणे ऑपरेट केले, तसेच ६.३ दशलक्षहून अधिक प्रवाशांना ऑनबोर्ड केले. एअरलाइनचा सरासरी लोड फॅक्‍टर दर ८७ टक्‍क्‍यांवर पोहोचला आणि टेक्निकल रिलियॅबिलिटी दर ९९.६ टक्‍के होता.

आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर विस्‍तार करण्‍याच्‍या आपल्‍या धोरणाला अधिक प्रबळ करत २०२४ च्‍या पहिल्‍या तिमाहीत व्हिएतजेटच्‍या आंतरराष्‍ट्रीय प्रवासी परिवहनाने फ्लाइट्स आणि प्रवाशांच्‍या आकडेवारीच्‍या संदर्भात अनुक्रमे वार्षिक ५३ टक्‍के व ६१ टक्‍क्‍यांहून अधिक वाढ केली.    

एअरलाइनने तीन महिन्‍यांच्‍या कालावधीमध्‍ये १५ नवीन आंतररराष्‍ट्रीय व देशांतर्गत मार्ग सुरू केले आहेत, ज्‍यामुळे एकूण ऑपरेटिंग मार्गांची संख्‍या १४० पर्यंत पोहोचली आहे. घोषणा व लाँच करण्‍यात आलेल्‍या नवीन आंतरराष्‍ट्रीय मार्गांमध्‍ये फू क्‍वोक – तैपई (तैवान, चीन), हो चि मिन्‍ह सिटी – चेंगदू / झियान (चीन) व व्हिएन्टिन (लाओस), तसेच हनोई ते हिरोशिमा (जपान) आणि सिडनी/मेलबर्न (ऑस्‍ट्रेलिया) यांचा समावेश आहे.

तसेच, व्हिएतजेट एव्हिएशन जॉइण्‍ट स्‍टॉक कंपनीने (HoSE: VJC) २६ एप्रिल २०२४ रोजी जनरल मीटिंग ऑफ शेअरहोल्‍डर्स (जीएमएस) चे आयोजन केले, जेथे वार्षिक व्‍यवसाय आराखड्याला मान्‍यता देण्‍यात आली. यामागे आंतरराष्‍ट्रीय फ्लाइट मार्गांमध्‍ये वाढ करण्‍यासाठी देशांतर्गत मार्केट शेअर कायम ठेवण्‍याचा, सहकार्य व संयुक्‍त उद्यमांना चालना देण्‍याचा मनसुबा आहे.  

आंतरराष्‍ट्रीय विस्‍तारीकरणामध्‍ये अग्रस्‍थानी

२०२३ साठी आर्थिक विवरणांमधून निदर्शनास आले की, अस्थिर विनियम दर व उच्‍च तेलांच्‍या किमतींसह व्हिएतनाममध्‍ये आणि जगभरात आव्‍हानात्‍मक आर्थिक स्थिती असताना देखील व्हिएतजेटने वाढती व स्थिर व्‍यवसाय कामगिरीची नोंद केली. व्हिएतजेटने १३३,००० फ्लाइट्सना सुरक्षितपणे ऑपरेट केले, तसेच २५.३ दशलक्ष प्रवाशांना ऑनबोर्ड केले, ज्‍यामध्‍ये वार्षिक १८३ टक्‍क्‍यांची वाढ झाली आणि त्‍यापैकी ७.६ दशलक्षहून अधिक प्रवाशांनी आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर विमानप्रवास केला.

२०२३ मध्‍ये व्हिएतजेटने ३३ नवीन देशांतर्गत व आंतरराष्‍ट्रीय मार्ग लाँच केले. कंपनी व्हिएतनाम आणि ऑस्‍ट्रेलियाच्‍या पाच सर्वात मोठ्या शहरांदरम्‍यान ऑपरेट करणारी सर्वात मोठी एअरलाइन बनली, तसेच भारतीय बाजारपेठेसाठी विविध मार्ग सुरू केले, हनोई व जाकार्ता (इंडोनेशिया) यांना कनेक्‍ट करणारी थेट फ्लाइट सुरू केली, जी दशकांपासून कोणत्‍याही एअरलाइन्‍सच्‍या रडारमध्‍ये नव्‍हती. व्हिएतजेटने आपल्‍या फ्लाइटची वारंवारता ईशान्‍य आशियाई देशांपर्यंत देखील वाढवली, ज्‍यामुळे व्हिएतनामपासून जपान व दक्षिण कोरियामधील शहरांपर्यंत सर्वोच्‍च वारंवारता असलेली एअरलाइन बनली.

व्हिएतजेटने आधुनिक, सुरिक्षत व पर्यावरणास अनुकूल ताफ्यामध्‍ये गुंतवणूक करणे सुरू ठेवले आहे. ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत त्‍यांच्‍या ताफ्यामध्‍ये १०५ एअरक्राफ्टसह वाइड-बॉडी ए३३०एसचा समावेश आहे, ज्‍यामुळे संसाधने सानुकूल करण्‍यास, इंधन बचत होण्‍यास आणि दीर्घकालीन शाश्‍वत विकास (ईएसजी) ध्‍येये संपादित करण्‍यास मदत होत आहे.

उल्‍लेखनीय व्‍यावसायिक व आर्थिक कामगिरी

वि़द्यमान फ्लाइट नेटवर्क प्रभावीपणे ऑपरेट करण्‍यासह नवीन आंतरराष्‍ट्रीय मार्गांची सुरूवात केल्याने २०२३ मध्‍ये व्हिएतजेटने प्रभावी व्‍यावसायिक कामगिरीची नोंद केली आहे. स्‍वतंत्र व एकत्रित महसूल अनुक्रमे ५३.७ ट्रिलियन व्‍हीएनडी (अंदाजे २.१६ बिलियन अमेरिकन डॉलर्स) आणि ५८.३ ट्रिलियन व्‍हीएनडी (अंदाजे २.३५ बिलियन अमेरिकन डॉलर्स) राहिला.

व्‍यावसायिक का‍मगिरी देखील उत्तम राहिली, जेथे व्हिएतजेटला २०२३ मध्‍ये जगातील आघाडीचे एअरलाइन मॅगझीन एअरलाइनरेटिंग्‍जकडून विविध पुरस्‍कार मिळाले. कंपनीला टॉप २० सेफेस्‍ट लो-कॉस्‍ट एअरलाइन्‍स, वर्ल्‍ड्स बेस्‍ट लो-कॉस्‍ट एअरलाइन ऑनबोर्ड हॉस्पिटॅलिटी आणि बेस्‍ट अल्‍ट्रा लो-कॉस्‍ट एअरलाइन अशा मान्‍यता मिळाल्‍या.

व्हिएतजेअला प्रतिष्ठित यूके फायनान्शियल मॅगझीन इंटरनॅशनल फायनान्‍सने बेस्‍ट लो-कॉस्‍ट एअरलाइन’ आणि बेस्‍ट फायनान्‍स मॅनेजमेंट एव्हिएशन‘ म्‍हणून देखील सन्‍मानित केले.

जीएमएसने २०२४ नफा वितरण योजनेला देखील मान्‍यता दिली, ज्‍यामध्‍ये लाभांश व प्रगत लाभांश रोख आणि स्‍टॉकमध्‍ये अधिकतम २५ टक्‍के प्रमाणात दिले जातील.

वर्षाच्‍या सुरूवातीपासून विकास गतीला अधिक दृढ करत व्हिएतजेटने आगामी तिमाहींसाठी आणि संपूर्ण २०२४ वर्षासाठी महत्त्वाकांक्षी लक्ष्‍य स्‍थापित केले आहेत. देशांतर्गत बाजारपेठ उपस्थिती कायम राखण्‍यासह एअरलाइनचा आपल्‍या आंतरराट्रीय फ्लाइट नेटवर्कमध्‍ये वाढ करण्‍याचा मनसुबा आहे, तसेच २०२४ मध्‍ये १४२,००० फ्लाइट्सना ऑपरेट करण्‍याची आणि २७.४ दशलक्ष प्रवाशांचे परिवहन करण्‍याची योजना आहे.      

Related posts

श्रीनगर स्‍मार्ट सिटीने टाटा मोटर्स अल्‍ट्रा ईव्‍ही इलेक्ट्रिक बसेससह स्‍वीकारला हरित मार्ग

Shivani Shetty

यामाहाने भारतात ३०० ब्‍ल्‍यू स्‍क्‍वेअर आऊटलेट्ससह गाठला उल्‍लेखनीय टप्‍पा

Shivani Shetty

जीई ऐरोस्‍पेसकडून जीई ऐरोस्‍पेस फाऊंडेशन लाँच नेक्‍स्‍ट इंजीनिअर्सचा विस्‍तार करण्‍यासाठी २० दशलक्ष डॉलर्स, कर्मचारीवर्ग विकासासाठी २ दशलक्ष डॉलर्स आणि आपत्‍कालीन मदतकार्यासाठी २ दशलक्ष डॉलर्स गुंतवणूक करत कंपनीचे तत्त्व ‘टू लिफ्ट पीपल अप’ला अधिक दृढ केले

Shivani Shetty

Leave a Comment