मुंबई, ७ डिसेंबर २०२३: महत्त्वपूर्ण खुलासा करत टीमलीज डिग्री अॅप्रेन्टिसशीपने २०२३ अॅप्रेन्टिसशीप आऊटलुक रिपोर्ट सादर केला आहे. या अहवालामधून भारतभरातील अॅप्रेन्टिसशीप संधींमध्ये अनपेक्षित ७५ टक्क्यांची वाढ झाल्याचे निदर्शनास येते, तसेच जानेवारी ते मार्च २०२३ या तिमाहीदरम्यान ९ टक्क्यांची वाढ झाल्याचे निदर्शनास येते. नियोक्ताच्या भावनेचा प्रमुख सूचक नेट अॅप्रेन्टिसशीप आऊटलुक (एनएओ) मेट्रिकने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे, जेथे आगामी ऑक्टोबर ते मार्च २०२३-२४ या सहामाहीदरम्यान अॅप्रेन्टिसशीप सहभागासाठी नियोक्ताच्या उद्देशामध्ये ७५ टक्क्यांची मोठी वाढ दिसून येते.
नेट अॅप्रेन्टिसशीप आऊटलुक (एनएओ) मध्ये जानेवारी ते जून २०२१ मधील ४१ टक्क्यांवरून जानेवारी ते जून २०२२ मध्ये ५६ टक्क्यांपर्यंत आणि जानेवारी ते मार्च २०२३ मध्ये ६६ टक्क्यांपर्यंत, तसेच ऑक्टोबर ते मार्च २०२३-२४ साठी ७५ टक्क्यांपर्यंत मोठी वार्षिक वाढ झाली आहे. जवळपास ३० टक्क्यांच्या या कंपाऊंड अॅन्युअल ग्रोथ रेट (सीएजीआर) मधून महत्त्वपूर्ण कौशल्य विकास धोरण, कौशल्यामध्ये वाढ, कर्मचारीवर्ग विकास आणि टॅलेंट पाइपलाइन निर्मिती यांसाठी कंपन्यांचा अॅप्रेन्टिसशीप्सकडे पाहण्याचा दृष्टीकोन दिसून येतो.
एप्रिल ते सप्टेंबर २०२३ पहिली सहामाही आणि ऑक्टोबर २०२३ ते मार्च २०२४ दुसरी सहामाही अॅप्रेन्टिसशीप आऊटलुक रिपोर्टमधून लक्षवेधक स्थिती दिसून येते, जेथे इंजीनिअरिंग व इंडस्ट्रीयल (९६ टक्के), इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स (९४ टक्के), टेलिकॉम (९३ टक्के) आणि ईकॉम व टेक उत्पादने (९० टक्के) ही सर्वाधिक नेट अॅप्रेन्टिसशनी आऊटलूक (एनएओ) सह आघाडीची क्षेत्रे आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे या उद्योगांसह इतर पाच उद्योगांनी ऑक्टोबर ते मार्च २०२४ या सहामाहीदरम्यान गेल्या तिमाहीच्या तुलनेत एनओएमध्ये मोठी वाढ केली. या ट्रेण्डमधून अॅप्रेन्टिसशीपसाठी प्रबळ विकास पैलू दिसून येतात, तसेच भावी कर्मचारीवर्गाला आकार देण्यामध्ये त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेची खात्री मिळते.
अॅप्रेन्टिसशीप आऊटलुक रिपोर्ट महत्त्वपूर्ण माहिती निदर्शनास आणतो – ४१ टक्के नियोक्त्यांचा विश्वास आहे की, डिग्री अॅप्रेन्टिसशीप एकसंधी उद्योग व शैक्षणिक संस्थांच्या सहयोगाच्या माध्यमातून कौशल्यामधील तफावत प्रभावीपणे दूर करण्यासाठी प्रबळ धोरण आहे. या मान्यतेमधून भविष्यासाठी सुसज्ज कर्मचारीवर्गाला आकार देण्यामध्ये अॅप्रेन्टिसशीप्सची परिवर्तनात्मक भूमिका दिसून येते, जेथे प्रतिभा विकास, कौशल्यामध्ये वाढ आणि प्रबळ टॅलेंट पाइपलाइनच्या स्थापनेसाठी धोरणात्मक कटिबद्धतेची गरज आहे. अहवालामधील या माहितीमधून भारतातील कर्मचारीवर्गासाठी कुशल व आशादायी भविष्याला चालना देण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण झेप निदर्शनास येते.
लैंगिक प्राधान्य आणि कर्मचारीवर्गामध्ये अपेक्षित विस्तारीकरण:
४५ टक्के नियोक्त्यांची कोणतीही लैंगिक प्राधान्ये नाहीत, तर इतर नियोक्ते विशेषत: बीएफएसआय (२१ टक्के), रिटेल (१८ टक्के) अशा सर्विसेस् क्षेत्रांमध्ये आणि इंजीनिअरिंग व इंडस्ट्रीयल (२० टक्के), ऑटोमोबाइल व अॅन्किलरीज (१७ टक्के), इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स (१३ टक्के) अशा उत्पादन क्षेत्रांमध्ये महिला उमेदवारांना प्राधान्य देतात. तसेच, ४७ टक्के नियोक्त्यांना ऑक्टोबर ते मार्च २०२३-२४ या दुसऱ्या सहामाहीदरम्यान कर्मचारीवर्गामध्ये जवळपास १० टक्क्यांनी वाढ होण्याची अपेक्षा आहे, ज्यामधून प्रशिक्षणार्थींना सामील करण्याप्रती सकारात्मक गती दिसून येते.
शहरानुसार ट्रेण्ड्स: बेंगळुरू एनएओमध्ये १७ टक्क्यांच्या वाढीसह अग्रस्थानी :
मेट्रो शहरांमध्ये सहापैकी पाच शहरांनी ऑक्टोबर ते मार्च २०२३-२४ या सहामाहीदरम्यान एनएओमध्ये वाढ दाखवली आहे, ज्यामध्ये बेंगळुरू व्यापक ८५ टक्क्यांसह अग्रस्थानी आहे, ज्यानंतर ८२ टक्क्यांसह दिल्लीचा आणि ८० टक्क्यांसह हैदराबादचा क्रमांक आहे. बेंगळुरूमध्ये प्रशिक्षणार्थींना सहभागी करून घेणारे अव्वल तीन उद्योग आहेत इंजीनिअरिंग व इंडस्ट्रीयल (८९ टक्के), बीएफएसआय (८६ टक्के) आणि रिटेल (८२ टक्के).
टीमलीज डिग्री अॅप्रेन्टिसशीपचे उपाध्यक्ष ध्रुती प्रसन्न महंतम्हणाले, “भारतातील विकसित होत असलेल्या रिटेल क्षेत्रात महिला उमेदवारांना अनेक संधी देण्यामध्ये अॅप्रेन्टिसशीप्स महत्त्वाचे ठरले आहे. रिटेल उद्योगामध्ये काम करणाऱ्या महिलांची टक्केवारी २५ ते ३० टक्के आहे, तर यूएस व यूकेमध्ये हे प्रमाण ६० ते ७५ टक्के आहे. यामधून स्पष्टपणे निदर्शनास येते की, अॅप्रेन्टिसशीप्समुळे महिला कामगार सहभागामध्ये वाढ झाली आहे. एचआर प्रमुख निदर्शनास आणतात की भविष्यात अॅप्रेन्टिसशीप्सचा तंत्रज्ञान, सेवा व रिटेलमधील टॅलेंट समूहावर प्रभाव पडेल, तसेच अॅप्रेन्टिसशीप लैंगिक तफावत दूर करण्यासाठी आधारंस्तंभ ठरतील. गेल्या पाच वर्षांमध्ये रोजगार मिळालेल्या प्रशिक्षणार्थींच्या एकूण आकडेवारीमध्ये ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे, तसेच पुढील ३ वर्षांमध्ये रिटेल, बीएफएसआय व लॉजिस्टिक्स उद्योगांमधील वाढ ६७ टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.”