maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interestमहाराष्ट्र

उन्‍हाळ्याकरिता द बॉडी शॉपचे व्हिटॅमिन सी कलेक्‍शन

मुंबई, २९ एप्रिल २०२४: उन्हाळ्यामध्ये त्‍वचा निस्‍तेज होणे, डिहायड्रेटेड आणि अकाली वृद्धत्‍व यांसारख्या समस्‍या उद्भवू शकतात. बदलत्‍या हवामानासह आपल्‍या स्किनकेअरमध्‍ये देखील बदल करत दैनंदिन नित्‍यक्रमामध्‍ये व्हिटॅमिन सी घटक समाविष्‍ट असणे गरजेचे आहे. द बॉडी शॉप या ब्रिटीश-निर्मित आंतरराष्‍ट्रीय एथिकल ब्‍युटी ब्रँडचे व्‍यापक व्हिटॅमिन सी कलेक्‍शन आहे. ग्‍लो रिव्‍हीलिंग सीरम ते ग्‍लो बूस्टिंग मॉइश्‍चरायझर आणि आय ग्‍लो सीरमसह इतर उत्‍पादनांपर्यंत द बॉडी शॉपची व्‍यापक व्हिटॅमिन सी श्रेणी प्रत्‍येक प्रकारच्‍या त्‍वचेसाठी अनुकूल असण्‍यास डिझाइन करण्‍यात आली आहे. हे कलेक्शन नैसर्गिकरित्‍या स्रोत मिळवलेल्या सर्वोत्तम घटकांपासून डिझाइन करण्‍यात आले आहे आणि उन्‍हाळ्यामध्‍ये त्‍वचा कोमल व तेजस्‍वी राहण्‍याची खात्री देते.    

मुक्‍त रॅडिकल्‍स आणि अकाली एजिंगसाठी कारणीभूत ठरणाऱ्या घटकांचा सामना करणारे शक्तिशाली अॅण्‍टीऑक्सिडण्‍ट व्हिटॅमिन सी त्‍वचा तेजस्‍वी होण्‍यासोबत त्‍वचेवरील सुरकुत्‍या व बारीक रेषा नाहीसे करण्‍यास मदत करते. लोकप्रिय श्रेणीमधील काही उत्‍पादने व्हिटॅमिन सीचा नैसर्गिक संपन्‍न स्रोत कॅम्‍यू कॅम्‍यू बेरी अर्क, बाकुचोल आणि पपईचा अर्क यांसह संपन्‍न आहेत, तसेच द बॉडी शॉपचे व्हिटॅमिन सी कलेक्‍शन त्‍वचेला कोमल व तेजस्‍वी करण्‍याची खात्री देते.

अस्‍सल मास्‍टरपीस व्हिटॅमिन सी श्रेणी प्रत्‍येक प्रकारच्‍या त्‍वचेला अनुकूल अशा स्‍वरूपात बारकाईने डिझाइन करण्‍यात आली आहे. या व्‍यापक कलेक्‍शनमध्‍ये त्‍वचा तेजस्‍वी होण्‍यास मदत करणारा आमचा रेडियन्‍स-रिव्‍हायव्हिंग सुपरहिरो ग्‍लो रिव्‍हीलिंग सीरम, ग्‍लो बूस्टिंग मॉइश्‍चरायझर, डेअली ग्‍लो क्‍लीन्सिंग पॉलिश, ओव्‍हरनाइट ग्‍लो रिव्‍हीलिंग मास्‍क, ग्‍लो-रिव्‍हीलिंग लिक्विड पील, आय ग्‍लो सीरम आणि ग्‍लो-रिव्‍हीलिंग टॉनिक यांच्‍यासह इतर उत्‍पादनांचा समावेश आहे, जे त्‍वचेचे नैसर्गिक सौंदर्य अधिक आकर्षक करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहेत. या श्रेणीची किंमत ३२५ रूपयांपासून सुरू होते.

द बॉडी शॉपच्‍या व्हि‍टॅमिन सी श्रेणीमधून द बॉडी शॉपची शाश्‍वतता आणि एथिकल पद्धतींप्रती अविरत कटिबद्धता दिसून येते. सर्वोत्तम व एथिकली-ट्रेडेड घटकांपासून स्रोत मिळवेले प्रत्‍येक उत्‍पादन नैसर्गिक उदारता आणि निसर्गाचे संरक्षण करण्‍याप्रती ब्रँडच्‍या संयुक्‍त जबाबदारीला दर्शवते. 

Related posts

इक्सिगोची आंतरराष्‍ट्रीय प्रवासाकरता ‘इक्सिगो अशुअर्ड’ सेवा

Shivani Shetty

सॅमसंग इंडियाकडून तरूणांना भावी टेक डोमेन्‍सबाबत सक्षम करणारा राष्‍ट्रीय कौशल्‍य उपक्रम ‘सॅमसंग इनोव्‍हेशन कॅम्‍पस्’चा दुसरा सीझन लाँच

Shivani Shetty

सुलभ यूपीआय पेमेंट्ससाठी मोबिक्विक पॉकेट यूपीआय कसे वापराल?

Shivani Shetty

Leave a Comment