मुंबई, ३ मे २०२४ – सवाई फ्रॅग्रन्स या आघाडीच्या सुवासिक कंपनीने अतुल्य इंडिया अंतर्गत इझे परफ्यूम्स लाँच केले. थेट डायरेक्ट-टू-कंझ्युमर (डीटूसि) असलेल्या या परफ्यूमने वर्षभरातच जागतिक स्तरावर जाण्यासाठी यूएस मार्केटमध्ये आपल्या विस्तार योजना सुरू केल्या आहेत. विस्ताराचे हे पाऊल म्हणजे जगभरातील ग्राहकांची गरज पूर्तता करण्याची तिची महत्त्वाकांक्षाच दर्शवत नाही तर भारतीय सुगंधाचा वारसा आणि प्रगती जागतिक स्तरावर नेत भारताला एक प्रमुख सुगंधी केंद्र म्हणून जागतिक पटलावर प्रस्थापित करते.
‘इझे’ हे नाव नायजेरियातील इग्बो शब्दापासून निर्माण होते. याचा अर्थ ‘राजा’ असा आहे. नावातील ‘e’ अक्षराचा समावेश या रंगीत बाटल्यांच्या गोलाकार रचनेत दिसतो. काचेच्या या बाटलीला क्लिक-ऑन कॅप आहे. ‘इझे’ परफ्यूम्स यूएस मधील सुगंधी बाजारात क्रांती घडवून आणण्याच्या तयारीत आहे. उत्कृष्टतेशी बांधिलकी आणि उत्कृष्ट सुगंध तयार करण्याचा समृद्ध वारसा घेऊन, इझे परफ्यूम्सने तयार केलेल्या 8 सुगंधांच्या संग्रहाचे नुकतेच अनावरण केले. यातील 3 पुरुषांसाठी आहेत-इझे नॉर्मल, इझे सर्ज आणि इझे इलाशन, आणि 3 महिलांसाठी-इझे जॉय, इझे फ्लोव, इझे अवे आणि 2 परफ्युम्स युनिसेक्स श्रेणीमध्ये-इझे वाईब, आणि इझे आयडी आहेत. भारतातील समृद्ध परफ्युमच्या वारशाची झलक दाखवतानाच त्याला आधुनिकतेची जोड देत मेड इन इंडिया असे हे परफ्युम्स तयार करण्यात आले आहेत.
पुष्कर जैन, सीईओ-सवाई फ्रॅग्रन्स इंडिया, संस्थापक-इझे परफ्यूम्स म्हणाले,”इझे परफ्यूम्सला जागतिक स्तरावर नेणे म्हणजे केवळ बाजारपेठेतील उपस्थिती वाढवणे नव्हे. तर भारताची शतकानुशतके जुनी सुगंधाची परंपरा प्रदर्शित करणे आहे. यामुळे आम्हाला आमच्या ध्येयाजवळ पोहोचणे सोपे होते आहे. भारतीय सुगंधांना जागतिक नकाशावर ठेवण्याचा आमचा प्रवास वारसा आणि नाविन्याचा मिलाफ दर्शवितो. उत्कृष्ट सुगंधाच्या आमच्या वचनबद्धतेचा हा पुरावा आहे.”
ऑनलाइन उपस्थिती व्यतिरिक्त, इझे परफ्यूम्स ने यूएस मध्ये एक मजबूत नेटवर्क स्थापित केले आहे. या अंतर्गत ४०० फ्रॅगरेन्स आउटलेट तसेच २०० ड्युटी फ्री स्टोर मध्ये उत्पादने उपलब्ध आहेत. ज्यामुळे देशभरातील ग्राहकांसाठी व्यापक पर्याय निर्माण झाले आहेत. जागतिक स्तरावर मिळालेल्या यशावर आधारित, इझे परफ्यूम्सने पनामा, कोलंबिया आणि मेक्सिको सह जगभरातील ग्राहकांसह अनेक ठिकाणी आपला विस्तार केला आहे. ब्रँड लाँच केल्याच्या पहिल्या वर्षातच एवढी मोठी झेप हा भारतीय परफ्यूमसाठी एक मोठा टप्पा आहे.