maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

रणवीर ब्रार यांची ‘मास्टरचाउ’च्या ब्रॅंड अम्बॅसडरपदी नियुक्ती


मुंबई
, २४ एप्रिल २०२४: रेडीटूकुक एशियन खाद्यपदार्थांमध्ये विशेष नैपुण्यअसलेल्या मास्टरचाउ या भारतात नावारूपाला आलेल्या ब्रॅंडने आपला ब्रॅंडअम्बॅसडर म्हणून सेलिब्रिटी शेफ रणवीर ब्रारशी भागीदारी केल्याचे सहर्षजाहीर केले आहे. ‘असली चायनीज पदार्थांसाठी मास्टरचाउला ग्राहकांचेसर्वात लाडके स्थान बनवणे आणि लोकांचा विश्वास जिंकून त्यांना आपलेसेकरण्याचा या धोरणात्मक भागीदारीचा उद्देश आहे.

रणवीर ब्रारशी भागीदारी करण्याचा निर्णय मास्टरचाउने घेण्यामागचेकारण म्हणजे हे दोन्ही ब्रॅंड अस्सलता आणि गुणवत्तेच्या बाबतीत समर्पितआहेत. मास्टरचाउची टॅगलाइन आहेअसली चायनीज आणि शेफ रणवीरब्रार त्याच्या अस्सल फ्लेवर्सविषयीच्या पॅशनबद्दल आणि पाककलेतीलनैपुण्याबद्दल ओळखला जातो. रणवीर ब्रारच्या पाककलेच्या तत्वज्ञानाशीसहमत असलेल्या मास्टरचाउचा हेतू बाजारपेठेत अस्सल चायनीजपाककृतींचा विश्वसनीय प्रदाता म्हणून आपले स्थान मजबूत करण्याचाआहे. लोकप्रिय शेफ रणवीर ब्रारमध्ये देखील मास्टरचाउची ती भावनादिसते, जी आपल्या प्रामाणिक रुचकर चायनीज शैलीच्या पदार्थांसहआपल्या वाढत चाललेल्या आणि निष्ठावान ग्राहकांसाठी स्वादाची पातळीआणखी उंच घेऊन जाण्यासाठी वचनबद्ध आहे.

मास्टरचाउचे संस्थापक श्री. विदुर काटारिया म्हणाले, “रणवीर ब्रार म्हणजेअस्सलता, इनोव्हेशन आणि पाककलेत उत्कृष्टतेचा निरंतर ध्यास यांचेप्रतीक आहे. उत्तम पदार्थ बनवण्यातील त्याचे नैपुण्य आणि त्याचे पॅशनमास्टरचाउ ब्रॅंडची वृत्ती दर्शवितो आणि आम्ही दोघे एकत्र मिळून आता याउद्योगात धमाल उडवून देण्यास सज्ज आहोत. आम्ही केवळ एक असाअनुभव देऊ करत आहोत जो ग्राहकाला प्रत्येक घासातून अजोड चव आणिगुणवत्ता देण्याची हमी देत आहे. रणवीरला आमच्या सोबत घेऊन आम्हीघरच्या घरीच बसून लोक चायनीज फूडचा आस्वाद कसा घेतात याच्यापद्धतीत क्रांती करण्यास तयार आहोत.”

शेफ रणवीर ब्रार म्हणाला, “एक शेफ म्हणून अविस्मरणीय खाद्यानुभवदेण्यासाठी अस्सल फ्लेवर्स आणि घटक पदार्थ वापरण्याचे महत्त्व मीजाणतो. मास्टरचाउशी हातमिळवणी करून त्यांच्या अद्भुत उत्पादनशृंखलेद्वारे अस्सल एशियन क्युझीनचा पुरस्कार करताना मला खूप आनंदहोत आहे. मास्टरचाउसह भारतातील घराघरातअसली चायनीज फ्लेवर्सघेऊन जाण्यास मी उत्सुक आहे.”

Related posts

डेन्‍वरची शाहरूख खानसोबत नवीन मोहीम

Shivani Shetty

वंचित मुलांच्या सक्षमीकरणासाठी ‘द राईट पिच’ टूर्नामेंटचे आयोजन

Shivani Shetty

७१ व्या मिस वर्ल्ड टीमचे ‘सेव्ह द टायगर’ मोहिमेला समर्थन

Shivani Shetty

Leave a Comment