मुंबई, २२ एप्रिल २०२४: प्रख्यात होमियोपथीतज्ज्ञ, पद्मश्री पुरस्कारप्राप्तआणि डॉ. बत्राज हेल्थकेअर या सर्वात मोठ्या होमियोपथी क्लिनिकच्याशृंखलेचे संस्थापक डॉ. मुकेश बत्रा यांनी ‘फील गुड, हील गुड. स्टेइंग हॅप्पीविथ होमियोपथी‘ या त्यांच्या १०व्या पुस्तकाचे प्रकाशन केले. ब्लूम्सबरीनेप्रकाशित केलेल्या या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात मानसिक व भावनिकआरोग्यावर अत्यंत उपयुक्त चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. याचर्चासत्रात मंदिरा बेदी, राजीव बजाज, मधू, झायेद खान आणि डॉ. आशीषकॉन्ट्रॅक्टर सहभागी झाले होते. या चर्चासत्राचे संचालन तारा देशपांडे यांनीकेले.
या प्रसंगी पद्मश्री डॉ. मुकेश बत्रा म्हणाले, “भावनिक आणि मानसिकआरोग्याने त्रस्त असलेल्या लोकांवर उपचार करतानाचे गेल्या ५० वर्षांतीलअनुभव मी या पुस्तकात मांडले आहेत. या पुस्तकात प्रतिबंध, व्यसन नजडणारे आणि सुरक्षित उपचार पद्धत आणि चिंतातुरता, नैराश्य, एडीएचडी, तणाव, एकटेपणा इत्यादी समस्यांची चर्चा केली आहे. या पुस्तकाच्यामाध्यमातून या फारशा चर्चा होत नसलेल्या समस्यांना हातळण्यासाठीजागरुकता निर्माण करणे, लोकांमध्ये चर्चा घडवून आणणे आणि उपचारदेण्याचा मी प्रयत्न केला आहे.”
सहा कोटींहून अधिक भारतीयांना गंभीर स्वरुपाच्या मानसिक आजारांनीग्रासलेले आहे. दुर्दैवाने भारताला आत्महत्येची राजधानी म्हटले जाते. भारतातदर वर्षी २.६ लाखांहून अधिक आत्महत्येची प्रकरणे घडतात. ‘फील गुड, हीलगुड. स्टेइंग हॅप्पी विथ होमियोपथी‘ या पुस्तकाच्या माध्यमातून मानसिक वभावनिक आरोग्याच्या वाढत्या समस्याबद्दल जागरुकता निर्माण करण्यातआली आहे आणि उपायही देण्यात आले आहेत. या पुस्तकाच्याप्रकाशनाआधीच ॲमेझॉनवरील आरोग्य, फिटनेस आणि न्यूट्रिशनकॅटेगरीमधील पहिल्या दहा पुस्तकांमध्ये या पुस्तकाची वर्णी लागली आहे.