नवी मुंबई, २ में २०२४:- मुंबई एमएमआरः नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सने आज जाहीर केले आहे की, आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ज्येष्ठ ऑन्कोलॉजिस्ट डॉ. ज्योती बाजपेयी अपोलो कॅन्सर सेंटरमध्ये मेडिकल अँड प्रिसिजन ऑन्कोलॉजी (मुंबई आणि महाराष्ट्र क्षेत्र) च्या प्रमुख म्हणून कॅन्सरविरुद्धच्या लढ्यात सहभागी झाल्या आहेत. डॉ. बाजपेयी यांनी इम्युनो-ऑन्कोलॉजी, प्रिसिजन मेडिसिन, दुर्मिळ आणि आव्हानात्मक कर्करोग (सारकोमा, गर्भधारणा-संबंधित कर्करोग, किशोरवयीन आणि तरुण प्रौढांमधील कर्करोग, एलजीबीटीक्यू+कर्करोग, वृद्धापकाळातील कर्करोग) आणि स्त्रियांचे कर्करोग (स्तन आणि स्त्रीरोग) या क्षेत्रातील केलेल्या कार्यासाठी त्या एक प्रसिद्ध चिकित्सक म्हणून ओळख.
डॉ. बाजपेयी यांचा टाटा मेमोरिअल सेंटर, मुंबई येथे प्राध्यापक आणि ब्रेस्ट डीएमजी कन्व्हेनर म्हणून १५ वर्षांचा अनुभव तसेच कर्करोगाच्या क्षेत्रातील १९ वर्षांचा अनुभव लाभदायक ठरणार आहे. त्यांना न्यूयॉर्क, यूएसए मधील प्रख्यात मेमोरियल स्लोन केटरिंग कॅन्सर सेंटर (एमएसकेसीसी) कडून इम्युनो-ऑन्कोलॉजी आणि मेलेनोमामधील विशेष प्रशिक्षण आणि बाल्टिमोर, यूएसए मधील जॉन्स हॉपकिन्स येथील प्रतिष्ठित सिडनी किमेल कॉम्प्रेहेन्सिव्ह कॅन्सर सेंटरमधून हाडे आणि सॉफ्ट टिश्यू सारकोमामधील अनुभव. शिवाय, त्यांनी दिल्लीतील प्रतिष्ठित ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एआयआयएमएस) येथे प्रशिक्षण घेतले आहे आणि त्या ईएसएमओ लीडरशिप ग्रॅज्युएट आहेत.
डॉ.ज्योती बाजपेयी, मेडिकल अँड प्रिसिजन ऑन्कोलॉजी प्रमुख, अपोलो कॅन्सर सेंटर्स म्हणाल्या,“अपोलो कॅन्सर सेंटर्समध्ये सहभागी होताना मला खूप आनंद होत आहे. हे रुग्णालय जागतिक स्तरावरील सर्वोत्कृष्ट संस्थांच्या बरोबरीने वैद्यकीय सेवा प्रदान करते. प्रोटॉन बीम थेरपी, ब्रेन ट्यूमरसाठी झेडएपी-एक्स थेरपी आणि ट्यूमर बोर्ड बेस्ड ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स यांसारख्या प्रगत सुविधांमुळे मी माझ्या रुग्णांना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार देऊ शकते. माझ्या प्रशिक्षण आणि अनुभवाने, मी अपोलो कॅन्सर सेंटरमधील कार्यक्रम मजबूत करण्यास उत्सुक आहे.”
युरोपियन सोसायटी ऑफ मेडिकल ऑन्कोलॉजी (ईएसएमओ) लीडर्स जनरेशन प्रोग्रामच्या पदवीधर असलेल्या डॉ. ज्योती बाजपेयी आज ईएसएमओ-डब्ल्यू40 (वुमन इन ऑन्कोलॉजी) च्या कोअर कमिटी सदस्य आहेत. डॉ. बाजपेयी यांनी प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय युरोपियन सोसायटी ऑफ मेडिकल ऑन्कोलॉजी (ईएसएमओ) आणि सोसायटी फॉर इम्युनोथेरपी ऑफ कॅन्सर (एसआयटीसी) आणि सारकोमा, स्त्रीरोगविषयक कर्करोग आणि स्तनाच्या कर्करोगाच्या इम्युनोथेरपीसाठी ऍडव्हान्स्ड ब्रेस्ट कॅन्सर (एबीसी) ची मार्गदर्शक तत्त्वे विकसित करण्यासाठी देखील त्यांनी योगदान दिले आहे. सारकोमा, गर्भधारणेशी संबंधित कर्करोग, स्तन आणि स्त्रीरोगविषयक कर्करोग, इम्युनो-ऑन्कोलॉजी आणि प्रिसिजन ऑन्कोलॉजी यांसारख्या दुर्मिळ कर्करोगांसारख्या त्यांचे संशोधनात्मक कार्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रकाशनांमध्ये प्रकाशित झाले आहे.
श्री.संतोष मराठे, पश्चिमी विभाग-प्रादेशिक सीईओ, अपोलो हॉस्पिटल्स म्हणाले,“आमच्या कुशल ऑन्कोलॉजी टीममध्ये डॉ.ज्योती बाजपेयी यांचे स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे, कारण त्यांच्या येण्यामुळे केवळ नवी मुंबईतील अपोलो कॅन्सर सेंटर्स मध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतातील कर्करोगाच्या रुग्णांना फायदा होणार. डॉ. बाजपेयी यांनी दुर्मिळ कर्करोगासह विविध प्रकारच्या कर्करोगाचे प्रशिक्षण घेतल्यामुळे कर्करोगाच्या उपचारासाठी सर्वसमावेशक आणि प्रगत उपचार देण्यात मदत होईल. यामुळे प्रदेशातील कर्करोग रुग्णांसाठी उपचारात्मक पर्याय वाढणार आहेत.”