maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

सॅमसंग आरअँडडी इन्स्टिट्यूट, नोएडाचा आयआयटी कानपूरशी सामंजस्य करार: विद्यार्थी आणि शिक्षक सॅमसंगच्या साथीने व्हिज्युअल, आरोग्य, एआय आणि इतर उदयोन्मुख तंत्रज्ञानांवर संयुक्त संशोधन हाती घेणार

गुरुग्राम, २५ जानेवारी २०२४: सॅमसंग आरअँडडी इन्स्टिट्यूट, नॉयडा (SRI – Noida) ने विकासाच्या महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी कानपूर (IITK) सोबत पाच वर्षांच्या कालावधीसाठी एक सामंजस्य करार केला असून त्यात IIT कानपूरचे विद्यार्थी, शिक्षकवर्ग आणि सॅमसंग इंजीनिअर्स यांच्या संयुक्त संशोधनप्रकल्पांचा समावेश असणार आहे, ज्यातून विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्रासाठी तयार होण्यास मदत होणार आहे. या संशोधन प्रकल्पांमध्ये आरोग्य, व्हिज्युअल, फ्रेमवर्क आणि बी2बी सिक्युरिटी तसेच जनरेटिव्ह AI आणि क्लाउडसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानांच्या क्षेत्रांचा समावेश असेल.  

संशोधन प्रकल्पांव्यतिरिक्त सॅमसंग इंजीनिअर्सना AI, क्लाउड आणि इतर उदयोन्मुख तंत्रज्ञानांसारख्या प्रमुख तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये अधिक कौशल्य प्राप्त करण्याची संधी पुरविणे हा सुद्धा या सामंजस्य कराराचा एक हेतू आहे.

SRI-Noida चे मॅनेजिंग डायरेक्टर क्युन्ग्युन रू आणि IIT कानपूरच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागाचे डीन प्रा. तरुण गुप्ता यांनी IIT कानपूरचे डिरेक्टरप्रा. एस. गणेश; IIT कानपूरच्या डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्रीचे प्रा. संदीप वर्मा;IIT कानपूरच्या डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रिकल इंजीनिअरिंगचे प्रा. तुषार संधान; आणि सॅमसंगच्या इतर वरीष्ठ प्रतिनिधींच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

SRI-Noida चे मॅनेजिंग डायरेक्टर क्युन्ग्युन रू म्‍हणाले, ”आम्‍हाला IIT कानपूरसोबत हा सहयोगात्‍मक प्रवास सुरू करण्‍याचा आनंद होत आहे. या सहयोगामधून शैक्षणिक सर्वोत्तमतेला औद्योगिक नाविन्‍यतेशी एकत्र करत विद्यार्थ्‍यांना उद्योगासाठी सुसज्‍ज करण्‍याप्रती आमची समर्पितता दिसून येते. आम्‍ही विचार, माहिती व टॅलेंटची देवाणघेवाण करण्‍यास उत्‍सुक आहोत, जे उल्‍लेखनीय प्रकल्‍पांच्‍या यशामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावतील आणि सॅमसंग व IIT कानपूरच्‍या विकासाप्रती योगदान देतील.

प्रा. IIT कानपूरचे डिरेक्टर प्रा. एस. गणेश म्हणाले, “IIT कानपूरची शैक्षणिक सर्वोत्कृष्टता व सॅमसंग इंडियाचे उद्योगक्षेत्रातील तज्ज्ञत्व यांना मिलाफ घडवून आणत अत्याधुनिक प्रकल्पांसाठी एक गतीशील वातावरण तयार करणे आणि आमच्या विद्यार्थ्यांना तसेच संशोधकांना अनमोल संधी पुरविणे हे आमचे लक्ष्य आहे. सैद्धांतिक ज्ञान आणि उद्योगक्षेत्रासाठीच्या व्यवहार्य उपाययोजना यांच्यातील दुवा सांधत शिक्षणक्षेत्र व उद्योगक्षेत्र यांच्यातील दरी भरून काढण्याच्या IIT कानपूरच्या अथक प्रयत्नांशी हा सामंजस्य करार सुसंगत आहे.”

IIT कानपूरच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागाचे डीन प्रा. तरुण गुप्ता म्हणाले, आमच्या विद्यार्थ्यांना आणि संशोधकांना अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाणाऱ्या संधी पुरवित, आमच्या संस्थेच्या तंत्रज्ञानात्मक प्रगतीमध्ये व शैक्षणिक पटलाच्या विकासामध्ये लक्षणीय योगदान देण्याप्रती आमची बांधिलकी या सामंजस्य करारामध्ये प्रतिबिंबित झाली आहे

या संयुक्त संशोधन प्रकल्पांचा एक भाग म्हणून IIT कानपूरचे विद्यार्थी आणि शिक्षकवर्ग प्रत्यक्ष उद्योगक्षेत्रासमोरील आव्हानांवर काम करतील व बाजारपेठेच्या खऱ्याखुऱ्या गरजांशी आपले ज्ञान संरेखित करतील. त्याचबरोबर ते सॅमसंग इंजीनिअर्सच्या साथीने डिजिटल इंडियाशी निगडित उपाययोजनांवरही काम करतील.

IIT कानपूरचे विद्यार्थी आणि शिक्षक यांना सॅमसंग इंजिनीअर्सच्या साथीने संयुक्त संशोधन शोधनिबंध प्रकाशित करण्यासही प्रोत्साहन दिले जाईल. 

सॅमसंग इंजीनिअर्ससाठीच्या कौशल्यवृद्धीसाठीच्या संधींअंतर्गत IIT कानपूरकडून विविध क्षेत्रांसाठी विशेषीकृत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातील, ज्यातून त्यांना संस्थेच वाखाणल जाणारी कुशलता उपलब्ध होऊ शकेल व त्याची परिणती सॅमसंग इंजीनिअर्सचे कौशल्य आणि ज्ञान वाढविणारे पदवी कार्यक्रम, प्रमाणपत्र व विशेषीकृत अभ्यासक्रमांमध्ये होईल. 

Samsung Newsroom India

Samsung R&D Institute, Noida Signs MoU with IIT Kanpur; Students & Faculty to Conduct Joint Research with Samsung on Visual, Health, AI and Other Emerging Technologies

About Samsung Electronics Co., Ltd.

Samsung inspires the world and shapes the future with transformative ideas and technologies. The company is redefining the worlds of TVs, smartphones, wearable devices, tablets, home appliances, network systems, and memory, system LSI, foundry and LED solutions, and delivering a seamless connected experience through its SmartThings ecosystem and open collaboration with partners. For latest news on Samsung India, please visit Samsung India Newsroom at http://news.samsung.com/inFor Hindi, log on to Samsung Newsroom Bharat at https://news.samsung.com/bharatYou can also follow us on Twitter @SamsungNewsIN.

About IIT Kanpur:

Indian Institute of Technology Kanpur was established in 1959 and declared to be to be an Institute of National Importance by the Government of India through an Act of Parliament. IIT Kanpur is best known for the highest standard of its education in science and engineering and seminal R&D contributions over the years. The institute has a sprawling lush green campus spread over 1055 acres with large pool of academic and research resources spanning across 19 departments, 25 centers and 3 interdisciplinary programs in engineering, science, design, humanities, and management disciplines with more than 570 full-time faculty members and approximately 9000 students.

For more information, please visit www.iitk.ac.in

Related posts

पद्मश्री डॉ. मुकेश बत्रा यांनी होमिओपॅथी सर्वोत्तमतेची५० वर्षे साजरी केली

Shivani Shetty

PURE EV ने 201 KM रेंजसह ePluto 7G MAX लाँन्च

Shivani Shetty

कबड्डीची गरज परत येते: दबंग दिल्ली क.सी. ने ४ वर्षांनंतर राजधानीत उत्साह फुंकलंय

Shivani Shetty

Leave a Comment