maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

नेस्‍ले इंडियाच्‍या ‘बायोडायजेस्‍टर प्रोजेक्‍ट’ने दुग्‍ध उत्‍पादक शेतकऱ्यांच्‍या शाश्‍वत भविष्‍याचा मार्ग सुकर केला

नेस्ले इंडिया बायोडायजेस्टर प्रोजेक्टद्वारे जबाबदार सोर्सिंग आणि डेअरी फार्ममधून उत्सर्जन कमी करण्याप्रती आपली अविरत कटिबद्धता दाखवत आहे. बायोडायजेस्टर तंत्रज्ञान गुरांच्या खताचे रूपांतर स्वच्छ बायोगॅसमध्ये करते, ज्यामुळे डेअरी फार्ममधून होणारे कार्बन उत्‍सर्जन कमी होते. उर्वरित स्लरी पुनरुत्पादक कृषी पद्धतींमध्ये नैसर्गिक खत म्हणून वापरली जाते. या उपक्रमाचा एक भाग म्हणून नेस्ले इंडिया पंजाब आणि हरियाणामधील २४ जिल्‍ह्यांमध्‍ये जवळपास ७० मोठे बायोडायजेस्टर आणि ३,०००हून अधिक लहान बायोडायजेस्टर्स स्थापित करण्याच्या प्रक्रियेत आहे.

गुरांचे खत उघड्यावर सोडले जाणारे लहान डेअरी फार्म्स जीएचजी उत्सर्जनाचे महत्त्वपूर्ण स्त्रोत आहेत. बायोडायजेस्टरमध्ये टाकल्‍यानंतर खत सूक्ष्मजीवांच्या विघटनातून जाते आणि बायोगॅस तयार करते. लहान बायोडायजेस्टर बायोगॅस तयार करू शकतात, जे एलपीजी आणि जळाऊ लाकडासाठी उत्तम पर्याय आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांसाठी धूर संबंधित आरोग्य धोका कमी होतो आणि त्‍वरित आर्थिक लाभ होतो. या फायद्यांव्‍यतिरिक्‍त मोठ्या बायोडायजेस्टरमध्‍ये वीज निर्माण करण्याची क्षमता देखील आहे, जी १०० टक्‍के नूतनीकरणक्षम आहे आणि पर्यावरणावर सकारात्‍मक परिणाम होतो. बायोडायजेस्टरमधील अवशिष्ट खताचे जैव खतामध्ये रूपांतर होते, जे शेतात व किचन गार्डनमध्ये वापरले जाते.

या उपक्रमाबाबत मत व्‍यक्‍त करत नेस्‍ले इंडियाच्‍या कॉर्पोरेट अफेअर्स व सस्‍टेनेबिलिटीचे संचालक श्री. संजय खजुरिया म्‍हणाले, ”नेस्‍ले इंडियाचा बायोडायजेस्‍टर प्रकल्‍प आमचे प्रयत्‍न शाश्‍वतता, संसाधनांचा सानुकूल वापर आणि पुनरूत्‍पादक कृषीबाबत भारताच्‍या धोरणात्‍मक प्राधान्‍यक्रमांशी कशाप्रकारे संलग्‍न आहेत याचे उत्तम उदाहरण आहे. बायोडायजेस्टर्सपासून तयार होणारा बायोगॅस शेतकऱ्यांचे जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करत, तर जैव-खते रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करतात. या बचतीमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात आणि आरोग्याप्रती अधिक गुंतवणूक करण्यास मदत होते.” 

पंजाबमधील मोगा जिल्‍ह्यातील जलालाबाद गावामधील दुग्‍ध व्‍यवसायीमनदीप कौर यांनी मत व्‍यक्‍त केले, ”आमच्‍या शेतामध्‍ये बायोडायजेस्‍टरचा वापर करणारे आम्‍ही आमच्‍या गावांमधील पहिले कुटुंब आहोत. आमचा विश्‍वास आहे की, यामुळे आम्‍हाला आमच्‍या शेतातील बहुतांश गरजांसाठी स्‍वावलंबी होण्‍यास मदत झाली आहे आणि आमचा बराच पैसा व मेहनत वाचली आहे. आमच्‍या शेतामध्‍ये निर्माण करण्‍यात आलेल्‍या बायो-गॅसने मला माझ्या कूकिंग इंधनासाठी आवश्‍यक बाबींसंदर्भात पूर्णत: स्‍वावलंबी केले आहे. जळाऊ लाकडांप्रमाणे यामधून धूर निर्माण होत नाही आणि माझ्या फुफ्फुसांना त्रास होत नाही किंवा डोळ्यांमध्ये जळजळ होत नाही.

नेस्‍ले इंडियाचा संपन्‍न दुग्‍ध समुदाय व आरोग्‍यदायी पर्यावरण एकमेकांशी संलग्‍न असतील असे भविष्‍य निर्माण करण्‍यावर विश्‍वास आहे. कंपनीने दुग्‍ध अर्थव्‍यवस्‍थेला चालना देण्‍यासाठी भारतभरातील जवळपास ८०,००० हून अधिक दुग्‍ध उत्‍पादक शेतकऱ्यांसोबत सहयोग केला आहे. नेस्ले इंडियाने दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना कार्बन उत्‍सर्जन कमी होण्‍याकरिता झाडे लावण्यास प्रेरित केले आहे आणि कमी उत्सर्जनयुक्त खाद्य उपलब्ध करून दिले आहे. या प्रयत्‍नांमुळे शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षित उपजीविका मिळण्‍यासह डेअरी फार्ममधून जीएचजी उत्सर्जन कमी होण्यास देखील मदत होते.

Related posts

आयएचसीएल – सीजी हॉस्पिटॅलिटी भागिदारी

Shivani Shetty

ILT20 सीझन 2 च्या यशानंतर ब्लॉकबस्टर सीझन 3 ची तयारी सुरू

Shivani Shetty

गेम्‍सक्राफ्टकडून रम्‍मीकल्‍चरसाठी ट्रस्‍ट रिपोर्ट जारी, ज्‍यामधून निष्‍पक्ष व जबाबदार गेमिंगप्रती त्‍यांची कटिबद्धता दिसून येते

Shivani Shetty

Leave a Comment