मुंबई, १७ मार्च २०२४: होमियोपॅथिक क्लिनिक्सची जगातील सर्वात मोठी साखळी असणाऱ्या डॉ. बत्राज हेल्थकेअरने केसांच्या समस्यांवरील उत्पादने सादर केली आहेत. यात प्रो+ हेअरफॉल कंट्रोल शॅम्पू, प्रो+ कंडिशनर, प्रो+ हेअरफॉल कंट्रोल सीरम आदी उत्पादनांचा समावेश आहे.
डॉ. बत्राज प्रो+ हेअर फॉल कंट्रोल शॅम्पू हे सल्फेट, सिलिकॉन आणि पॅराबिन यांचा समावेश नसलेले मिश्रण असून, ते टाळू आतपर्यंत स्वच्छ करते, केसगळती आटोक्यात आणते आणि दरवेळी धुतल्यानंतर तुमचे केस मुलायम करून त्यातील गुंताही सोडवते. हा सौम्य शॅम्पू रासायनिक हानी पोहोचलेल्या आणि पुनरुज्जीवनाची आवश्यकता असलेल्या केसासाठी उत्तम आहे. मोरक्कन अर्गन तेल, थुजा आणि ऑलिव्ह तेलाचा समावेश असलेला डॉ. बत्राज प्रो+ हेअर फॉल कंट्रोल शॅम्पू केवळ तुमच्या केसाचे पोषण करत नाही, तर त्यांच्या वाढीलाही उत्तेजन देतो. डॉ. बत्राज प्रो+ हेअर फॉल कंट्रोल शॅम्पू केस तुटण्यास प्रतिबंध करणाऱ्या नैसर्गिक घटकांनी समृद्ध आहे. हा सौम्य शॅम्पू केस व टाळू स्वच्छ करतो, मोरक्कन अर्गन तेल टाळू व केस आर्द्र राखते, दररोज होणाऱ्या हानीपासून केसाचे रक्षण करते, केसामधील कुपांची (फॉलिकल) हानी भरून काढते, केसाची दुभंगलेली टोके सांधते आणि केस कुपांच्या वाढीला उत्तेजन देते.
डॉ. बत्राज प्रो+ हेअर केअर उत्पादनांची श्रेणी, केसांचे खोलवर पोषण करणाऱ्या सौम्य घटकांपासून तयार करण्यात आली आहे. डॉ. बत्राज प्रो+ कंडिशनरमध्ये केस निरोगी व गुंतामुक्त ठेवण्यासाठी नैसर्गिक घटकांचा समावेश करण्यात आला आहे. मोरोक्कम अर्गन तेलामुळे केसातील आर्द्रता टिकून राहते आणि दररोजच्या हानीपासून केसाचे संरक्षण होते. ग्रीन टीमुळे केस चमकदार व मुलायम होतात. एरंडेल तेलामुळे (कॅस्टर ऑइल) प्रज्वलन कमी होऊन केस तुटण्याचे प्रमाण आटोक्यात येते. हॉर्सटेल वनस्पतीच्या अर्कामुळे केसांची शुष्कता कमी होते आणि मजबूती वाढते. थुजामुळे केसगळती कमी होते आणि केसाच्या वाढीला चालना मिळते.
डॉ. बत्राज प्रो+ हेअर फॉल नॅचरल सीरम हे एक हेअर केअर उत्पादन आहे. ते लॅरिक्स युरोपीया अर्काने तसेच कॅमेलिया सिनेन्सिस अर्काने समृद्ध आहे. लॅरिक्स युरोपीया अर्कामध्ये नैसर्गिक वनस्पतीजन्य वाढीचे घटक असतात. त्यामुळे केसांच्या वाढीला उत्तेजन मिळण्यात तसेच केसगळती रोखण्यात मदत होऊ शकते. कॅमेलिया सिनेन्सिस अर्क हा अँटिऑक्सिडण्ट्सने समृद्ध आहे आणि त्यामध्ये प्रज्वलनाचा प्रतिकार करणारे गुणधर्म असतात. त्यामुळे टाळू थंड राहते आणि निरोगी केसांच्या वाढीला उत्तेजन मिळते.हे सीरम नैसर्गिक घटकांपासून तयार झालेले आहे आणि सल्फेट्स, पॅराबिन्स यांसारख्या तीव्र रसायनांचा तसेच कृत्रिम सुगंधांचा वापर यात करण्यात आलेला नाही. हे सीरम सर्व प्रकारच्या केसांसाठी अनुकूल आहे आणि केसांच्या निरोगी वाढीला चालना देण्यासाठी तसेच केसगळती कमी करण्यासाठी नियमितपणे वापरले जाऊ शकते.