नवी दिल्ली, भारत, ऑक्टोबर, २०२३ सणासुदीच्या काळात ग्राहकांचा उत्साह वाढवण्यासाठी हिरो मोटोकॉर्प ही जगातील सर्वांत मोठी मोटरसायकल व स्कूटर उत्पादक कंपनी हार्ले-डेव्हिडसन X440 या आपल्या पहिल्या सह-विकसित (को-डेव्हलप्ड) प्रीमियम मोटरसायकलची डिलिव्हरी सुरू करण्यास सज्ज आहे. नवरात्रीच्या मंगल समजल्या जाणाऱ्या पहिल्या दिवशी म्हणजेच १५ ऑक्टोबर २०२३ रोजी डिलिव्हरी सुरू होणार आहे.
हार्ले-डेव्हिडसन X440 सध्या हिरो मोटोकॉर्प्सच्या गार्डन फॅक्टरी नावाने ओखळल्या जाणाऱ्या कारखान्यात उत्पादित केली जात आहे. भारतातील राजस्थानामधील नीमराणा येथे हा कारखाना आहे. पूर्वआरक्षण केलेल्या ग्राहकांसाठी कंपनीने १ सप्टेंबर २०२३ पासून टेस्ट राइड्स सुरू केल्या आहेत.
नवीन बुकिंग विंडो १६ ऑक्टोबरपासून खुली होत असून, ग्राहक देशभरातील हार्ले-डेव्हिडसनच्या सर्व डीलरशिप्सवर किंवा निवडक हिरो मोटोकॉर्प आउटलेट्समध्ये जाऊन बुकिंग करू शकतात. ग्राहक www.Harley-Davidsonx440.com या वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन बुकिंगही करू शकतात.
हिरो मोटोकॉर्पचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) श्री. निरंजन गुप्ता म्हणाले, “हार्ले-डेव्हिडसन X440ने देशभरात उत्साह निर्माण केला आहे. नीमराणा कारखान्यात उत्पादनाचे काम पूर्ण उत्साहात सुरू आहे आणि प्री-बुकिंग केलेल्या आमच्या अनेक ग्राहकांनी मोटरसायकलच्या टेस्ट राइडची संधीही घेतली आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी हार्ले डेव्हिडसन X440च्या डिलिव्हरीज सुरू करून सणासुदीच्या उत्साहात भर घालण्यास आम्ही सर्व सज्ज आहोत. ही आमच्या विलक्षण प्रवासाची केवळ सुरुवात आहे.”
हर्ले-डेव्हिडसन X440 जुलै २०२३ मध्ये सर्वांसमोर आल्यापासून भारतभरातील अव्वल श्रेणीतील ग्राहकांचे लक्ष तिने वेधून घेतले आहे. म्हणूनच केवळ महिनाभरात २५००० बुकिंग्ज झाली आहेत. हिरो मोटोकॉर्पने पहिल्या ग्राहकांच्या समूहाला सेवा देण्यासाठी सध्या ऑनलाइन बुकिंग विंडो तात्पुरती बंद केली आहे.
ही मोटरसायकल डेनिम, विविड आणि एस अशा तीन व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे, तर तिची किंमत २,३९,५००/- रुपये (डेनिम), २,५९,५००/- रुपये (विविड) आणि २,७९,५००/- रुपये (एस) अशा किंमतींना उपलब्ध आहे.