maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

एफएमसीजी क्षेत्र: मेट्रो शहरांत मोठ्या प्रमाणावर होतेय नियुक्ती



मुंबई, २५ मार्च २०२४:
टीमलीज सर्विसेस (एनएसई: टीमलीज) या रोजगार, रोजगारक्षमता व सुलभपणे व्‍यवसाय करण्‍यामध्‍ये क्रांतिकारी बदल घडवून आणत असलेल्‍या भारतातील आघाडीच्‍या स्‍टाफिंग समूहाने देशातील फास्‍ट-मूव्हिंग कंझ्युमर गुड्स (एफएमसीजी) क्षेत्रावर अहवाल जारी केला आहे. या अहवालामधून उद्योगक्षेत्राला नवीन आकार देण्‍यास स्थित असलेली परिवर्तनात्‍मक माहिती निदर्शनास येते. या अहवालानुसार मुंबई, बेंगळुरू, चेन्‍नई, दिल्‍ली व हैदराबाद ही भारतातील पाच अव्‍वल शहरे आहेत, जेथे एफएमसीजी क्षेत्रात नियुक्‍तीचा मोठा हेतू दिसून येतो. या अहवालामधून विक्री, विपणन व माहिती तंत्रज्ञानसह ऑफिस सर्विसेस, मानवी संसाधने व ब्‍ल्‍यू-कॉलर नोकऱ्यांसाठी नवीन नियुक्‍तीमध्‍ये मोठी वाढ निदर्शनास येते.  

या अहवालानुसार, मेट्रो शहरांमध्‍ये नोकरी सोडण्‍याच्‍या वृत्तीचे प्रमाण सर्वाधिक (२७ टक्‍के) आहे, ज्‍यानंतर प्रथम व द्वितीय श्रेणीच्‍या शहरांचा (२६ टक्‍के) क्रमांक आहे. मेट्रो शहरांच्‍या तुलनेत तृतीय व चतुर्थ श्रेणीच्‍या शहरांमधील कर्मचाऱ्यांमध्‍ये नोकरी सोडण्‍याचे प्रमाण सर्वात कमी आहे, ज्‍यामुळे ग्रामीण बाजारपेठांमध्‍ये मागणीचा स्‍तर कमी असल्‍याचे दिसून येते. या अहवालामधून निदर्शनास येते की, सक्रिय सहयोगींचे सरासरी वय ३६ वर्षांहून अधिक आहे आणि नोकरी सोडणाऱ्या सहयोगींचे सरासरी वय जवळपास ३४ वर्ष आहे. यामधून नोकरी सोडण्‍यासंदर्भात तरूण कर्मचाऱ्यांचे प्रमाण जास्‍त असल्‍याचे दिसून येते. त्‍या अनुषंगाने सक्रिय व नोकरी सोडणाऱ्या सहयोगींचा कार्यकाळ अनुक्रमे १.७ वर्ष व १.१ वर्ष आहे.

या अहवालामधून एफएमसीजी कर्मचारीवर्गामधील मोठी लैंगिक तफावत दिसून येते, जेथे ९० टक्‍क्‍यांहून अधिक आऊटसोर्स कर्मचारीवर्गामध्‍ये पुरूषांचे प्रमाण सर्वाधिक आहे. कंपनीचे असोसिएट्स डेटाबेस आणि दुय्यम संशोधनामधील अंतर्गत डेटाचा वापर करत हा अहवाल भागधारकांना नियुक्‍ती व नोकरी सोडण्‍याच्‍या ट्रेण्‍ड्सबाबत बहुमूल्‍य धोरणात्‍मक मार्गदर्शन करतो. अहवाल पीपल सप्‍लाय चेनला ऑप्टिमाइज करण्‍यासाठी तीन प्रमुख घटक म्‍हणून हायरिंग, अॅट्रिशन व प्रॉडक्टिव्‍हीटी (एचएपी) यांना निदर्शनास आणतो. यामधून प्रमाणित धोरणे प्रकाशझोतात येतात, ज्‍यामुळे कंपन्‍यांना जलदपणे नियुक्‍ती करण्‍यास, नोकरी सोडण्‍याच्‍या वृत्तीला आळा घालण्‍यास आणि उत्‍पादकता सुधारण्‍यास मदत होऊ शकते. काही शिफारशींमध्‍ये नवीन नियुक्‍तींचा शोध, पात्र उमेदवार मिळण्‍यासाठी सायकोमेटिंग मूल्‍यांकनांची अंमलबजावणी, तसेच एलअँडडीसाठी कोपे मॉडेल्‍समध्‍ये गुंतवणूका यांचा समावेश आहे, ज्‍यामुळे प्रशिक्षणार्थींना त्‍यांच्‍या करिअर विकासाच्‍या दिशेने झपाट्याने वाटचाल करण्‍यास मदत होऊ शकते.

टीमएलीज सर्विसेस लिमिटेडच्‍या स्‍टाफिंगचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कार्तिक नारायणन म्‍हणाले, ”या अहवालामधून भारतातील एफएमसीजी क्षेत्राच्‍या बदलत्‍या स्थितीबाबत महत्त्वाची माहिती मिळते, ज्‍यामुळे भागधारकांना संधींचा फायदा घेण्‍यासोबत आव्‍हानांचा सामना करण्‍यासंदर्भात धोरणात्‍मक मार्गदर्शन मिळते. तंत्रज्ञान व नाविन्‍यतेचा फायदा घेण्‍यापासून कर्मचारीवर्गाच्‍या गरजांची पूर्तता करण्‍यापर्यंत कंपन्‍यांनी या डायनॅमिक बाजारपेठ स्थितीत प्रगती करण्‍यासाठी गतीशीलता व दूरदृष्‍टीचा अवलंब केला पाहिजे.”

टीमलीज सर्विसेस लिमिटेडचे उपाध्‍यक्ष व व्‍यवसाय प्रमुख बालसुब्रमण्‍यम ए. म्‍हणाले, ”मुंबई, बेंगळुरू, चेन्‍नई, दिल्‍ली व हैदराबाद यांसारख्‍या अव्‍वल शहरांमध्‍ये नियुक्‍तीच्‍या हेतूमध्‍ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना एफएमसीजी क्षेत्र प्रबळ कर्मचारीवर्ग विस्‍तारीकरण आणि टॅलेंट संपादनासाठी सज्‍ज आहे. या ट्रेण्‍डमधून उदयास येणाऱ्या संधींचा फायदा घेण्‍यास आणि प्रभावीपणे कार्यसंचालने वाढवण्‍यास उत्‍सुक असलेल्‍या उद्योगामधील कंपन्‍यांसाठी सकारात्‍मक दृष्टिकोन दिसून येतो.”    

ते पुढे म्‍हणाले, ”पुरूष सहयोगींचे प्रमाण ९० टक्‍क्‍यांहून अधिक असण्‍यासह एफएमसीजी कर्मचारीवर्गामधील लैंगिक तफावतेमधून उद्योगामध्‍ये लैंगिक विविधता व सर्वसमावेशकतेचा प्रचार करण्‍यासाठी एकत्रित प्रयत्‍नांची गरज दिसून येते. विविधतेचा अवलंब केल्‍याने नाविन्‍यतेला गती मिळते, तसेच अधिक समान कार्यस्‍थळ निर्माण होण्‍याप्रती कटिबद्धता देखील दिसून येते.”

भारत सरकारकडून मोठ्या पाठिंब्‍यासह तिसरी सर्वात मोठी अर्थव्‍यवस्‍था बनण्‍यास स्थित असताना एफएमसीजी क्षेत्र आगामी वर्षांमध्‍ये लक्षणीय महसूल टप्‍पा गाठण्‍याचा अंदाज आहे. सरकारचे उपक्रम जसे एफडीआय भत्ते आणि पीएलआय योजना उद्योग विकास आणि निर्यात क्षमतेला गती देत आहेत. ई-कॉमर्स विस्‍तारीकरण आणि डायरेक्‍ट-टू-कंझ्युमर मॉडेल्‍स बाजारपेठेतील, विशेषत: ग्रामीण भागांमधील प्रवेश सोपा करत आहेत. सतत नाविन्‍यता आणि उत्‍पादन वैविध्‍यतेच्‍या माध्‍यमातून ग्राहकांच्‍या बदलत्‍या पसंतीची पूर्तता करणे अत्‍यंत महत्त्वाचे आहे, जेथे भारतातील वाढत असलेल्‍या मध्‍यमवर्गीय व तरूण व्‍यक्‍ती शाश्‍वत बाजारपेठ विस्‍तारीकरणाची खात्री देतात. अशा स्थितीमध्‍ये कार्यरत कार्यक्षमता, डेटा-सचांलित निर्णय-आखणीसाठी तंत्रज्ञानाचा फायदा घेणे आणि पुरवठा साखळ्या सानुकूल करणे महत्त्वाचे आहे. सुधारित डिजिटल कनेक्‍टीव्‍हीटीच्‍या माध्‍यमातून पारंपारिक किराणा स्‍टोअर्ससोबतचा सहयोग परस्‍पर विकास व बाजारपेठ विस्‍तारीकरणासाठी संधी देतो, असे या अहवालामधून निदर्शनास येते.

Related posts

मॅगी अपना फूड बिझनेस’च्या साथीने मॅगी नव्या होम कूक्सच्या हातांना देणार बळ

Shivani Shetty

एसटेक 2023 मुंबई: भारताच्या वास्तूकला, रचना आणि पायाभूत सुविधात क्रांतीकारी बदल करणारे भविष्य

Shivani Shetty

सॅमसंग आरअँडडी इन्स्टिट्यूट, नोएडाचा आयआयटी कानपूरशी सामंजस्य करार: विद्यार्थी आणि शिक्षक सॅमसंगच्या साथीने व्हिज्युअल, आरोग्य, एआय आणि इतर उदयोन्मुख तंत्रज्ञानांवर संयुक्त संशोधन हाती घेणार

Shivani Shetty

Leave a Comment