maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

मॅगी अपना फूड बिझनेस’च्या साथीने मॅगी नव्या होम कूक्सच्या हातांना देणार बळ

मॅगी आपल्या ‘मॅगी अपना फूड बिझनेस’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे नवेकोरे पर्व सुरू करण्यास अत्यंत उत्सुक आहे. हे पर्व म्हणजे एका नव्या अध्यायाची सुरुवात असणार आहे, ज्यासाठी देशभरातील उदयोन्मुख होम कूक्सना पाठिंबा देण्याची तयारी मॅगीकडून केली जात आहे. होतकरू कन्टेन्ट क्रिएटर्सना पाककृतींवरील कार्यक्रम बनविणारे यशस्वी कन्टेन्ट क्रिएटर्स बनण्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य आणि ज्ञान पुरवून त्यांना सक्षम बनविण्याचे मॅगीचे लक्ष्य आहे. याखेरीज या उपक्रमाच्या विजेत्यांना आपला स्वत:चे ऑनलाइन फूड चॅनल सुरू करण्यासाठी बीजभांडवल म्हणून रु. ५ लाखांचे बक्षिस दिले जाणार आहे.
गेल्या चार दशकांपासून मॅगी हा होतकरू शेफ्सच्या पाककलेतील कुतुहलाला खतपाणी घालणारा विश्वासू साथीदार बनून राहिला आहे. मॅगीच्या विविध उत्पादनांच्या साथीने लक्षावधी होममेकर्स आणि आपल्या पाककलेतून व्यावसायिक बनू पाहणारे फूडप्रेन्योअर्स दर दिवशी नवनव्या अप्रतिम पाककृती बनवून लोकांना आनंद देत आहेत. पाककौशल्य आणि नवसंकल्पनांना खतपाणी घालण्याप्रती आपली बांधिलकी जपत मॅगी अपना फूड बिझनेस लोकांना फूड कन्टेन्ट क्रिएटर्स बनण्याचा आपला प्रवास सुरू करण्यासाठी एक सुयोग्य मंच पुरवित आहे. इतकेच नव्हे, तर या स्पर्धेसाठी नावनोंदणी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अत्यंत विचारपूर्वक तयार करण्यात आलेले एक स्टार्टर किट मिळणार आहे. या किटमध्ये फूड कन्टेन्ट निर्मितीच्या जगामध्ये प्रवेश करण्यासाठी लागणारी सर्व साधने आणि मार्गदर्शक सूचनांचा समावेश असणार आहे.
या उपक्रमाविषयी बोलताना नेस्ले इंडियाच्या फूड बिझनेस विभागाचे डिरेक्टर रजत जैन म्हणाले, “गेल्या अनेक वर्षांच्या आपल्या वाटचालीमध्ये मॅगी हे नाव सक्षमता, नवसंकल्पना आणि पाककौशल्याच्या उत्सवाचे चिन्ह म्हणून उदयास आले आहे. ‘मॅगी अपना फूड बिझनेस’ हेही शेफ मंडळींचे कसब वाखाणण्याशी आणि त्यांचे साथीदार बनण्याप्रती आमच्या भक्कम बांधिलकीचे प्रतीक आहे. या प्रयत्नांत आमची साथ देणारे आमचे सर्व सहयोगी: इंडिया फूड नेटवर्क आणि कबिता सिंग (Kabitaskitchen), मधुरा बाचल (MadhurasRecipe), तेजा पारुचुरी (Vismai Foods) आणि तनिष्का मुखर्जी (Tanhir Paakshala) यांचे आम्ही आभारी आहोत.
आपल्या देशामध्ये लक्षणीय पाककौशल्याची देणगी लाभलेल्या अनेक लोकांना कन्टेन्ट क्रिएशनच्या क्षेत्रामध्ये येण्याची आकांक्षा असते. मात्र, स्वत:चे ऑनलाइन फूड चॅनल बनविण्यासाठी त्यांना एका योग्य दिशेची, कुशलतेची आणि संसाधनांची गरज असते. त्यांचे हे स्वप्न वास्तवात उतरावे यासाठी आवश्यक असलेली सर्व प्रारंभिक मदत त्यांना पुरविण्याच्या दृष्टीने मॅगी अपना फूड बिझनेसची रचना करण्यात आली आहे.”
‘मॅगी अपना फूड बिझनेस’साठी नावनोंदणी सुरू झाली आहे आणि सर्व होतकरू फूड कन्टेन्ट क्रिएटर्ससाठी ही विलक्षण संधी प्राप्त करण्यासाठी आणि केवळ अधिक भव्य व अधिक धाडसीच नव्हे तर सर्व बाबतीत सर्वोत्तम असलेल्या अशा एका उपक्रमाचा भाग होण्यासाठी हे खुले निमंत्रण आहे. नावनोंदणीसाठी सर्वांना आमच्यापर्यंत सहज पोहोचता यावे याची काळजी आम्ही घेतली आहे. मॅगी अपना फूड बिझनेस उपक्रमात आपले नाव नोंदविण्यासाठी तुम्ही फक्त 9289722997 या नंबरवर एक मिस्ड कॉल द्यायचा आहे. आपल्याला कोणत्या भाषेतून नावनोंदणी करायची आहे आणि आपला कन्टेन्ट इंग्रजी, हिंदी, मराठी, कन्नड व तेलुगू यापैकी कोणत्या भाषेतून हवा आहे याची निवडही ते करू शकतात. आपल्या पहिल्या पर्वाप्रमाणेच पाककलेवर प्रेम करणाऱ्यांना आपले हे वेड जपता यावे, तोंडाला पाणी येईल असा रुचकर कन्टेन्ट तयार करता यावा आणि देशभरातील प्रेक्षकांशी नाते जोडता यावे यासाठी पायरी-पायरीने मार्गदर्शन पुरविण्याचा हेतू आहे.

Related posts

MobilTM प्रथमच साजरा करत आहे MotoGP™️ भारत पॉवरिंगद्वारे रेड बुल केटीएम फॅक्टरी रेसिंग टीम

Shivani Shetty

फिजिक्‍सवाला मुंबईमध्‍ये ३ ऑफलाइन विद्यापीठ केंद्र उघडणार

Shivani Shetty

नवीन वर्ष, आरोग्‍यदायी वर्ष: २०२४ मध्‍ये मधुमेहाचे व्‍यवस्‍थापन करण्‍यासाठी ५ संकल्‍प

Shivani Shetty

Leave a Comment