मुंबई, २ नोव्हेंबर २०२३:* भारतीय वस्तूंचे प्रदर्शन व परिषद बाजारपेठेतील एक अग्रगण्य नाव म्हणून ABEC Exhibitions & Conferences Pvt. Ltd. हे नाव परिचित आहे. याच कंपनीतर्फे एसटेक हा अत्यंत आगळावेगळा, आशियातील सर्वात मोठा व जगातील तिसरा असा सर्वात मोठा ‘इन्फ्रास्ट्रक्चर अँड आर्किटेक्चर शो’ (पायाभूत सुविधा आणि स्थापत्यकला सोहळा) आयोजित केला जात आहे. हा सोहळा २ नोव्हेंबर २०२३ ते ५ नोव्हेंबर २०२३ या दरम्यान मुंबईत नेस्को (NESCO) येथे भरवला जात असून एसटेक कडून हा १७ वा मेळावा भरवला जात आहे. या मेळाव्यात डिझायनर किचन्स, बाथ अँड सॅनिटेशन, हार्डवेअर, टाइल अँड सिरॅमिक्स, पाइप्स अँड फिटिंग्ज, डेकोरेटिव्ह, इनडोअर अँड आउटडोअर लाइटिंग, फर्निचर अँड फर्निशिंग, डोअर्स अँड विंडोज, इलेक्ट्रिकल्स, स्वीचेस, वायर्स अँड केबल्स, ऑटोमेशन अँड वूड अँड विनिर्स, लँडस्केप्स व अन्य अशा २२ विविध क्षेत्रातील दिग्गज उद्योजक, या क्षेत्रातील तज्ज्ञ व व्यावसायिक सहभागी होत आहेत.
एसटेक2023 हे मेळाव्याहून अधिक काही आहे. हे देशातील सर्वोत्तम नाविन्यता, उत्पादन आणि तंत्रज्ञानाचे सादरीकरण आहे. हे प्रदर्शन भारतीय वास्तुकला आणि पायाभूत सुविधा क्षेत्रांमधील प्रचंड क्षमता यांचा एक आविष्कार आहे. या मेळाव्यात अनेक महत्त्वाचे इव्हेंटही होत असून त्यात ग्रँड ज्युरी अवॉर्ड, स्टॉप अँड शॉप, द होस्टेड बायर्स प्रोग्रॅम्स, एस स्ट्रीट, एस सिरॅमिक्स व एस सर्फेस अशा नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, यात आर्ट अॅट्रिअम, हे एक कलात्मक ठिकाण असून उपस्थितांचे विचारविश्व अधिक व्यापक करण्यासाठी त्यांना अधिक विचार करायला लावणारे एसटेक डिझाइन डिस्ट्रिक्ट पॅनल चर्चाही आयोजित केली आहे.
एसटेक 2023 हा मेळावा स्थापत्यकलातज्ज्ञ, रचनाकार, उद्योजक यांना एकमेकांशी जोडणारे, त्यांच्यामध्ये संवाद प्रस्थापित करणारे, विविध कला संकल्पनांची देवाणघेवाण करणारे एक व्यासपीठ आहे. यात ६०० हून अधिक प्रदर्शक त्यांची कौशल्ये, उत्पादने आणि तंत्रज्ञानाचे सादरीकरण करणार आहेत. त्याचबरोबर या मेळाव्यात ३५० हून अधिक भारतीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रँड्स आणि चार लाखांहून अधिक व्यावसायिक आणि उद्योगांची उपस्थिती अपेक्षित असून, हा कार्यक्रम नेटवर्किंग, सहयोग आणि व्यवसाय निर्मितीसाठी एक गतिशील व्यासपीठ देत आहे. या मेळाव्याला या क्षेत्रातील दिग्गज समजले जाणाऱे डॉ. निरंजन हिरानंदानी ( हिरानंदानी ग्रुप ऑफ कंपनीज) श्री. आशिष रहेजा (रहेजा युनिव्हर्सल प्रा. लिमिटेड), श्री. धवल अजमेरा (अजमेरा रिअल्टी अँड इन्फ्रा लिमिटेड) यांनी उपस्थिती लावली होती.
या मेळाव्या संदर्भात, ABEC Exhibitions & Conferences Pvt Ltd चे संस्थापक व प्रवर्तक सुमीत गांधी यांनी आपले विचार मांडले. ते म्हणाले की, “एसटेक हे असे एक व्यासपीठ आहे की, ज्यावर वास्तूकला, रचनाकार क्षेत्रातील दिग्गज, कलात्मक दृष्टिकोन असणारे आपला आविष्कार सादर करत असतात. हा मेळावा केवळ व्यापार मेळावा नाही तर हा मेळावा या उद्योगक्षेत्रातील देशभरातील व्यावसायिकांना त्यांचे विविध आविष्कार, त्यांच्या कल्पना, उत्पादने, सेवा व तंत्रज्ञान सादर करण्याची संधी देतो. त्यामुळे या मेळाव्याच्या माध्यमातून भारतातील पायाभूत सुविधा, स्थापत्यकला, रचना उद्योग यांचा एक सुसंवादत्मक समाज जन्मास येतो व त्यातून एकमेकांना जोडणारे मोठे जाळे तयार होते. मला हे सगळे चित्र या मेळाव्यात प्रत्यक्ष उभे राहात असताना दिसत असून त्याचा मनस्वी आनंद होत आहे. एसटेक हा १७ वा मेळावा नक्कीच नेत्रदीपक असून त्याला लोकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळेल अशी मला आशा आहे.”
एसटेक 2023 हा स्थापत्यकला, रचना व पायाभूत सुविधांच्या जगतातील एक मैलाचा दगड असून तो या क्षेत्राच्या यशस्वीतेचा एक पुरावाही आहे. हा वैविध्यपूर्ण संकल्पनांचा स्वरसंघ असून सर्जनशीलता, नाविन्य व गतीशीलता यांचे सामर्थ्य अधोरेखित करतो.