maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

इझमायट्रिपचा झूमकारसोबत सहयोग

मुंबई, २६ मार्च २०२४: इझमायट्रिप डॉटकॉम हा भारतातील सर्वात मोठा ऑनलाइन ट्रॅव्‍हल टेक प्‍लॅटफॉर्म आणि झूमकार हे कार शेअरिंगसाठी एनएएसडीएक्‍यू-सूचीबद्ध आघाडीचे मार्केटप्‍लेस यांनी ग्राहकांना त्‍यांच्‍या प्रवास नियोजनामध्‍ये अद्वितीय सोयीसुविधा प्रदान करण्‍यासाठी धोरणात्‍मक सहयोगाची घोषणा केली. या सहयोगासह झूमकारच्‍या सेल्‍फ-ड्राइव्‍ह कारची व्‍यापक श्रेणी इझमायट्रिप प्‍लॅटफॉर्ममध्‍ये एकसंधीमध्‍ये समाविष्‍ट करण्‍यात आली आहे, यासह वापरकर्ते प्रत्‍यक्ष इझमायट्रिप अॅपमधून त्‍यांच्‍या पसंतीच्‍या झूमकार बुक करू शकतात, यामुळे प्रवाशांना त्‍यांच्‍या प्रवासाच्‍या नियोजनामध्‍ये सुविधा व स्थिरता मिळते.

इझमायट्रिपच्‍या वापरकर्त्‍यांना झूमकारच्‍या २५,००० हून अधिक कारच्‍या व्‍यापक ताफ्याची सुविधा मिळेल, ज्‍यामध्‍ये हॅचबॅक्‍स, सेदान्‍स ते एसयूव्‍हींपर्यंतच्‍या मॉडेल्‍सची वैविध्‍यपूर्ण श्रेणी समाविष्‍ट आहे. हा सहयोग प्रवाशांना त्‍यांच्‍या फ्लाइट्स, हॉटेल्‍स आणि इतर प्रवास नियोजनांव्‍यतिरिक्‍त सेल्‍फ-ड्राइव्‍ह झूमकार प्री-बुक व ऑन-डिमांड करण्‍यास सक्षम करतो आणि या सर्व सुविधा एकाच युजर-अनुकूल प्‍लॅटफॉर्मवर उपलब्‍ध आहेत. 

इझमायट्रिपचे सह-संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी निशांत पिट्टी म्‍हणाले, ”हा धोरणात्‍मक सहयोग करत इझमायट्रिपने झूमकारसोबत परिवर्तनात्‍मक प्रवासाच्‍या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. हा सहयोग महत्त्वाचा टप्‍पा असून आमच्‍या बहुमूल्‍य ग्राहकांना देशभरातील विविध मॉडेल्‍सचा समावेश असलेला झूमकारचा विस्‍तृत ताफा उपलब्‍ध करून देतो. या सहयोगामधून प्रवास सोयीसुविधेचे नवीन युग दिसून येते, जेथे प्रवासी त्‍यांचे फ्लाइट्स व निवास सुविधांसोबत सेल्‍फ-ड्राइव्‍ह वेईकल्‍स विनासायास रिझर्व्‍ह करू शकतात आणि या सर्व सुविधा आमच्या सर्वोत्तम प्‍लॅटफॉर्मच्‍या माध्‍यमातून उपलब्‍ध आहेत. हा सहयोग प्रवास अनुभव अधिक उत्‍साहित करण्‍याप्रती, तसेच प्रवाशांना अद्वितीय स्थिरता व कार्यक्षमतेसह सक्षम करण्‍याप्रती कटिबद्ध आहे.”

झूमकारचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी ग्रेग मोरान म्‍हणाले, ”इझमायट्रिपसोबतचा आमचा सहयोग भारतातील शहरी गतीशीलतेला नव्‍या उंचीवर नेण्‍यामधील महत्त्वाचा टप्‍पा आहे. आमचा नवीन दर्जात्‍मक सोयीसुविधा व स्थिरता प्रदान करत प्रवाशांना सुलभपणे व आत्‍मविश्‍वासासह भारतात एक्‍स्‍प्‍लोअरचा आनंद घेण्‍यास सक्षम करण्‍याचा मनसुबा आहे. इझमायट्रिपच्‍या व्‍यापक प्रवास सेवांमध्‍ये आमच्‍या स्‍केलेबल सेल्‍फ-ड्राइव्‍ह सोल्‍यूशन्‍सचा समावेश करत आम्‍ही प्रवास सुलभ करण्‍यासोबत त्‍यामध्‍ये आनंद व उत्‍साहाची भर करत आहोत.”

इझमायट्रिप आणि झूमकार यांच्‍यामधील सहयोग भारतात उपलब्‍ध असलेल्‍या प्रवास सेवांच्‍या क्रांतीमधील महत्त्वाचा टप्‍पा आहे. या दोन्‍ही कंपन्‍यांचे कौशल्‍य व संसाधनांना एकत्र करत हा सहयोग ग्राहकांना विनासायास, एकीकृत व्‍यासपीठ प्रदान करेल, ज्‍यामुळे प्रवासाच्‍या प्रत्‍येक टप्‍प्‍यावरील गरजांची पूर्तता होईल. भारत सरकार देशभरात रस्‍ते कनेक्‍टीव्‍हटी आणि पायाभूत सुविधा वाढवण्‍याप्रती काम करत असताना हा सहयोग अधिक महत्त्वाचा बनला आहे, यामुळे ग्राहकांना इझमायट्रिप प्‍लॅटफॉर्मअंतर्गत प्रत्‍यक्षपणे सेल्‍फ-ड्राइव्ह वेईकल्‍स सहजपणे व किफायतशीर दरांमध्‍ये भाड्याने मिळतील. एकाच व्‍यासपीठावर व्‍यापक सेवा प्रदान करत हा सहयोग प्रवास अनुभवाला उत्‍साहित करण्‍याच्‍या आणि भारतातील पर्यटनाला चालना देण्‍याच्‍या व्‍यापक दृष्टिकोनाप्रती योगदान देतो.

Related posts

इंडियास्किल स्पर्धा नोंदणीची तारीख १५ जानेवारीपर्यंतवाढवली

Shivani Shetty

टाटा मोटर्सकडून सुरतमध्‍ये अत्‍याधुनिक नोंदणीकृत वेईकल स्‍क्रॅपिंग केंद्राचे उद्घाटन

Shivani Shetty

मेलोराकडून नवीन लाइटवेट ज्‍वेलरीचे अनावरण

Shivani Shetty

Leave a Comment