maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interestमहाराष्ट्र

द बॉडी शॉपने महिलांना अधिक सक्षम बनण्यास प्रेरित केले

मुंबई, २५ मार्च २०२४: १९७६ मध्‍ये स्‍थापना झाल्‍यापासून द बॉडी शॉप आपल्‍या मोहिमा, उत्‍पादने व संवादांच्‍या माध्‍यमातून महिलांना स्‍वत:वर प्रेम करण्‍यासह काळजी घेण्‍यास प्रेरित करत आहे. आधुनिक काळातील महिलांच्‍या अतूट उत्‍साहाला साजरे करण्‍यासाठी द बॉडी शॉप इंडियाने प्रख्‍यात मॉडेल व अभिनेत्री डायना पेण्‍टी यांच्‍यासोबत सहयोग केला आहे. या सहयोगांतर्गत लहान, पण प्रबळ नवीन जाहिरातीच्‍या माध्‍यमातून महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्‍यात येईल. हा संदेश महिलांना स्‍वत:ची काळजी घेण्‍याला प्राधान्‍य देण्‍यास आणि स्‍वत:साठी आवाज उठवण्‍यास प्रेरित करतो, ज्‍यामुळे महिला स्‍वत:च्‍या आरोग्‍याची काळजी घेण्‍याकडे अधिक लक्ष देतील.

द बॉडी शॉपच्‍या प्रतिष्ठित ब्रिटीश रोझ कलेक्‍शनमधून प्रेरणा घेत ही जाहिरात संकल्‍पनेला दाखवते की, प्रत्‍येक महिलेमध्‍ये स्‍वत:ची काळजी घेत आणि त्‍यांच्‍या अवतीभोवती असलेल्‍यांना विकसित होण्‍यासाठी मदत करत प्रगती करण्‍याची क्षमता आहे.

द बॉडी शॉप इंडियाच्‍या प्रॉडक्‍ट, मार्केटिंग अँड डिजिटलच्‍या उपाध्‍यक्ष हरमीत सिंग म्‍हणाल्‍या, ”द बॉडी शॉपमध्‍ये आम्‍ही आमच्‍या संस्‍थापक डेम अनिता रॉड्डिक यांच्‍या दूरदर्शी उत्‍साहामध्‍ये सामावलेले तत्त्व महिला सक्षमीकरणाप्रती कटिबद्ध आहोत. आम्‍हाला आमच्‍या स्‍त्रीत्‍व वारसाला साजरा करण्‍याचा अभिमान वाटत आहे. आमच्‍या प्रतिष्ठित ब्रिटीश रोझ बाथ व बॉडी केअर कलेक्‍शनमधून हा उत्‍साह दिसून येतो, जो ब्‍युटी पलीकडे जात सेल्‍फ-केअर व सेल्‍फ-लव्‍ह यांना प्राधान्‍य देतो. या मोहिमेचा चेहरा म्‍हणून डायना पेण्‍टी यांच्‍यासोबत सहयोग करत आम्‍ही आधुनिक महिलांचे तत्त्व – प्रबळ, सुंदर व सक्षम यांचा अंगिकार करतो.”

भारतीय अभिनेत्री डायना पेण्‍टी म्‍हणाल्‍या, ”मला आज आधुनिक काळातील महिलांचे शौर्य व चिकाटीला साजरे करण्‍यासाठी द बॉडी शॉपसोबत सहयोग करण्‍याचा आनंद होत आहे. मोहक ब्रिटीश रोझ कलेक्‍शन मला देखील खूप आवडते. एथिकल ब्‍युटीची समर्थक असल्‍यामुळे या प्रकल्‍पासाठी द बॉडी शॉपसोबतचा सहयोग माझ्यासाठी विशेषाधिकार आहे. चला तर मग महिलांनी त्‍यांची ताकद दाखवण्‍याचे आणि अधिक सुंदर विश्‍व निर्माण करण्‍याच्‍या दिशेने नेतृत्‍व करण्‍याचे महत्त्व निदर्शनास आणण्‍यासाठी एकत्र येऊया. प्रत्‍येक महिलेमधील अंतर्गत क्षमता चमकदार कामगिरी करावी आणि प्रेरणादायी सकारात्‍मक परिवर्तनाला गती मिळावी ही सदिच्छा.”

Related posts

बीम्स फिनटेकने इन्शुरन्सदेखोच्या निधी उभारणी फेरीचे नेतृत्व केले

Shivani Shetty

भारतातील द्राक्ष व अन्य फळांच्या निर्यात वाढीसाठी ‘देहात’चा पुढाकार

Shivani Shetty

रेमंडचा मुंबईतील पहिला प्रकल्प ‘दी ऍड्रेस बाय जीएस, बांद्रा’ लाँच

Shivani Shetty

Leave a Comment