maharashtraprimenews
ठळक बातम्या
महाराष्ट्र

बीएलएस ई-सर्व्हिसेसने दुस-या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले

मुंबई, १२ नोव्हेंबर २०२४:* बीएलएस-ई सर्व्हिसेस लिमिटेड या टेक्नॉलॉजी सक्षम डिजिटल सेवा प्रदाता कंपनीने ३० सप्टेंबर २०२४ रोजी समाप्त झालेल्या दुसऱ्या तिमाहीचे आणि पहिल्या सहामाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीचे एकूण उत्पन्न ८४.५ कोटी रु. आहे, जे आर्थिक वर्ष २४च्या दुस-या तिमाहीत ८१.८ कोटी रु. होते.

 

ऑपरेटिंग ईबीआयटीडीए १३.५ कोटी रु. आहे जे गतवर्षीच्या दुस-या तिमाहीत १२.० कोटी रु. होते. आर्थिक वर्ष २५ च्या दुस-या तिमाहीत ऑपरेटिंग ईबीआयटीडीए मार्जिन २६२ बीपीएसने वाढून १७.५% झाले आहे. गतवर्षीच्या दुस-या तिमाहीत ते १४.९% होते. ईबीआयटीडीए २०.८ कोटी रु. आहे जे गेल्या आर्थिक वर्षात १३.१ कोटी रु. होते. गेल्या वर्षाच्या तुलनेत ही वाढ ५९.६% आहे. या आर्थिक वर्षाच्या दुस-या तिमाहीत ईबीआयटीडीए मार्जिन ८७१ बीपीएसने वाढून २४.७% झाले आहे जे गतवर्षीच्या दुस-या तिमाहीत १५.९% होते. यावर्षीच्या दुस-या तिमाहीत करोत्तर नफा ६३.० % वाढून १४.९ कोटी रु. वर पोहोचला जो आर्थिक वर्ष २०२४ च्या दुस-या तिमाहीत ९.१ कोटी रु. होता. करोत्तर नफा मार्जिन २४ मध्ये ११.३% होते, जे ७९८ बीपीएसने वाढून यावर्षीच्या दुस-या तिमाहीत १९.३% झाले.

 

*बीएलएस-सर्व्हिसेस लिमिटेडचे अध्यक्ष श्री. शिखर अग्रवाल* म्हणाले, “२०२५ च्या पहिल्या सहामाहीत कंपनीची आर्थिक कामगिरी जोरदार असल्याचे जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. अर्थिवर्ष २०२४ च्या पहिल्या सहामाहीच्या तुलनेत ईबीआयटीडीए ७५.५% वाढला आहे आणि करानंतरचा नफा ८७.३% वाढला आहे. या कालावधीत बिझनेस कॉरसपॉन्डन्ट सेगमेन्टचे मोठे योगदान आणि ऑपरेशनल कार्यक्षमता साध्य करण्याचे निरंतर प्रयत्न यामुळे कामगिरीवर सकारात्मक परिणाम झाला आहे.

 

कंपनीचे अॅसेट-लाइट बिझनेस मॉडेल तसेच २९,७०० हून अधिक चॅनल सर्व्हिस पार्टनर्सचे विस्तृत नेटवर्क आणि १२१,००० हून अधिक टचपॉईंट्स ही कंपनीच्या आर्थिक यशाची आधारशीला आहे. विस्तार करण्यासाठी नवीन संधी शोधण्याचे आमचे निरंतर प्रयत्न आणि आमच्या ऑपरेशन्सच्या सर्व पैलूंमध्ये उत्कृष्टता साधण्यासाठी आणि क्रॉस सेलिंग संधी प्राप्त करण्यासाठीची आमची दृढ वचनबद्धता यांनी प्रेरित होऊन बीएलएसe भविष्यातही शाश्वत परिणाम देण्यासाठी योग्य स्थितीत आहे.”

Related posts

करेरा आयवेअरने ‘करेरा एक्‍स प्रोल’ आयवेअर कलेक्‍शन लॉन्‍च करण्‍यासाठी टायगर श्रॉफचा सक्रिय लाइफस्‍टाइल ब्रॅण्‍ड प्रोलसोबत केला सहयोग

Shivani Shetty

भारतात ग्रीन हायड्रोजन निर्माण करण्यासाठी थरमॅक्सची सेरेसशी भागीदारी

Shivani Shetty

ऑडी इंडियाकडून आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्‍ये ३३ टक्‍के वाढीची नोंद

Shivani Shetty

Leave a Comment