बायनान्स ब्लॉकचेन यात्रा 2025 चे मुंबई सत्र ठरले भारताच्या Web3 विस्तारातील एक महत्वपूर्ण टप्पा ji
मुंबई, 30 ऑक्टोबर 2025: जगातील सर्वात मोठ्या क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजच्या मागे असलेली जागतिक ब्लॉकचेन कंपनी बायनान्सने बायनान्स ब्लॉकचेन यात्रा 2025 च्या मुंबई सत्राचे आयोजन केले. भारतभर ब्लॉकचेन जागरूकता आणि Web3 स्वीकार वाढवण्यासाठी राबविण्यात आलेल्या या राष्ट्रीय उपक्रमाची ही चौथी आणि आतापर्यंतची सर्वात मोठी शहर आवृत्ती ठरली.
सेंट रेगीस मुंबई येथे 400+ हून अधिक उद्योग नेते, नवनिर्माते, स्टार्टअप संस्थापक, गुंतवणूकदार आणि ब्लॉकचेन प्रेमी एकत्र जमले होते. त्यातून भारताच्या डिजिटल आणि आर्थिक नवकल्पनांना चालना देण्यात मुंबईची मध्यवर्ती भूमिका अधोरेखित झाली. देशाची आर्थिक आणि उद्योजकीय राजधानी म्हणून मुंबईने जबाबदारपणे ब्लॉकचेन सोल्यूशन्सचा विस्तार, शिक्षणाला चालना देणे, आणि सहकार्य व अनुपालनाद्वारे दीर्घकालीन मूल्य निर्माण करण्याबाबतच्या महत्त्वपूर्ण चर्चांसाठी व्यासपीठ तयार केले.
दिवसाची चर्चासत्रे दोन प्रमुख विषयांवर केंद्रित होती. पहिल्या “इंडिया ॲट द सेंटर: स्केलिंग Web3 अँड ब्लॉकचेन ॲडोप्शन अँड इनोव्हेशन” या शीर्षकाखाली आयोजित फायरसाइड चर्चेत बायनान्सच्या ग्लोबल चीफ मार्केटिंग ऑफिसर रेचल कॉनलन (Rachel Conlan) आणि बायनान्सच्या हेड ऑफ APAC एस.बी. सेकर यांनी वरिष्ठ पत्रकार भूपेंद्र चौबे यांच्यासोबत संवाद साधला. सुरुवातीच्या जागरूकतेपासून मोठ्या प्रमाणावर नाविन्यपूर्णता आणि वास्तवातील प्रत्यक्ष उपयोग यांकडे झालेल्या बदलावर प्रकाश टाकत जागतिक Web3 इकोसिस्टममध्ये एक प्रमुख प्रेरक शक्ती म्हणून भारताची वाढती भूमिका यावर यावेळी चर्चा करण्यात आली. ब्लॉकचेनचा प्रवास केवळ अंदाजे वापरापासून बदलत्या पायाभूत सुविधांपर्यंत कसा विकसित झाला आणि शिक्षण, सुलभता आणि तंत्रज्ञान विकासाद्वारे बायनान्स सारख्या प्लॅटफॉर्मनी ही परिवर्तन प्रक्रिया कशी सक्षम केली हे वक्त्यांनी अधोरेखित केले.
भारताची ब्लॉकचेन बाजारपेठ 2024 मध्ये 657 दशलक्ष अमेरिकन डॉलर एवढी होती आणि 2033 पर्यंत 61.5 अब्ज अमेरिकन डॉलर पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. या वाढीस 12% जागतिक क्रिप्टो डेव्हलपर आणि 1,000 पेक्षा जास्त Web3 स्टार्टअप्सचा समावेश असलेल्या उत्साही इकोसिस्टमचा आधार आहे.
या चर्चेची पूर्तता करणारे दुसरे सत्र “बिल्डींग महाराष्ट्र ब्लॉकचेन अँड Web3 फ्युचर: पॉलिसी, इनोव्हेशन अँड ॲसेट टोकनायझेशन” हे धोरण-केंद्रित पॅनेल होते. यामध्ये सरकार आणि उद्योगातील अग्रगण्य व्यक्तींनी भाग घेतला. यात मुख्यमंत्री महाराष्ट्र यांचे मुख्य सल्लागार कौस्तुभ धवसे, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते तुहीन सिन्हा आणि बायनान्सचे हेड ऑफ APAC एस.बी. सेकर यांनी भाग घेतला होता. चर्चेचे सूत्रसंचालन भूपेंद्र चौबे यांनी केले. या चर्चेचा संदर्भ जमीन, पायाभूत सुविधा आणि सरकारी मालमत्ता डिजिटाइज करून मालमत्ता टोकनायझेशन चौकटीद्वारे वापरात नसलेल्या भांडवलापैकी जवळपास 50 ट्रीलीयन रु. चे भांडवल खुले केले जाईल या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अलीकडील घोषणेशी जोडलेला होता. जबाबदार नवकल्पना आणि डिजिटल परिवर्तनासाठी महाराष्ट्राची बांधिलकी अधोरेखित करणारा हा उपक्रम आहे.
बायनान्सचे ग्लोबल चीफ मार्केटिंग ऑफिसर रेचल कॉनलन म्हणाल्या, “भारत हा जगातील तंत्रज्ञान, वित्त आणि सर्जनशीलतेचा सर्वात गतिमान मिलाफ आहे. आमचे ध्येय म्हणजे डेव्हलपर, उद्योजक आणि संस्थांना शिक्षण व विश्वासार्ह पायाभूत सुविधांद्वारे पाठबळ देऊन जबाबदार स्वीकार प्रक्रियेचा वेग वाढवणे हे आहे. बायनान्स मध्ये, आम्ही भारताला फक्त एक वाढती बाजारपेठ म्हणून पाहत नाही, तर डिजिटल ओळख, आर्थिक समावेशन यांपासून Web3 टोकनाइज्ड मालमत्ता आणि नवीन क्रिएटर इकॉनॉमी यांसारख्या क्षेत्रांत कशाप्रकारे विस्तार आणि प्रत्यक्ष परिणाम निर्माण करत आहे यादृष्टीने बघतो.”
बायनान्सचे हेड ऑफ APAC एस.बी. सेकर पुढे म्हणाले, “मुंबईचे आर्थिक नेतृत्व आणि महाराष्ट्राच्या धोरणात्मक गतीमुळे हा क्षण भारताच्या Web3 प्रवासासाठी ऐतिहासिक आहे. आशिया-पॅसिफिक प्रदेशात सार्वजनिक–खाजगी सहकार्य वित्तीय क्षेत्राचे भविष्य घडवत असल्याचे आम्ही जाणतो. नियामक दृष्टिकोन, प्रतिभा आणि नवकल्पना यांचे संयोजन करत भारताचे जबाबदारीने नेतृत्व करण्यासाठी एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. केवळ उद्योगाच्या वाढीसाठी नव्हे तर अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसाठी शाश्वत ब्लॉकचेन स्वीकार सक्षम करतील अशा पायाभूत सुविधा आणि ट्रस्ट फ्रेमवर्क तयार करणाऱ्या सरकार आणि बिल्डर्ससोबत भागीदारी करणे हे बायनान्स मध्ये आमचे उद्दिष्ट आहे.”
मुंबईनंतर, बायनान्स ब्लॉकचेन यात्रा 2025 पुढे लखनौ येथे होईल. तिथे डेव्हलपर, विद्यार्थी आणि नवनिर्माते यांना शिकण्यासाठी, सहकार्य करण्यासाठी आणि देशाच्या डिजिटल भविष्यास आकार देण्यासाठी एकत्र आणून भारताच्या Web3 चळवळीला बळकटी देण्याचे ध्येय कायम ठेवले जाईल.

