maharashtraprimenews
ठळक बातम्या
महाराष्ट्र

ऑनलाइन मालमत्ता शोध घेणा-यांच्या संख्येत ऑगस्टमध्ये १० टक्क्यांची वाढ

मुंबई, २६ सप्टेंबर २०२४: हाऊसिंग डॉट कॉम ही भारतातील अग्रगण्य फुल-स्टॅक प्रोपटेक प्लॅटफॉर्मने नुकत्याच त्याच्या आयआरआयएस (ऑनलाइन शोधासाठी भारतीय निवासी निर्देशांक) निर्देशांकाचे निष्कर्ष प्रकाशित केले, सणासुदीचा हंगाम जवळ आल्याने घर खरेदीदारांच्या स्वारस्यात लक्षणीय वाढ दर्शवत असल्याचे दिसते.

 

नवीनतम आयआरआयएस निर्देशांक अहवाल ऑगस्ट २०२४ मध्ये ऑनलाइन मालमत्ता शोध घेणाऱ्यांची संख्या महिन्या-दर-महिना १०% वाढ दर्शवत आहे, डिसेंबर २०२३ नंतर हा निर्देशांक ९९ अंकांवर जाऊन पोहोचला आहे. असे असले तरी ही वाढ आश्चर्यकारक नाही. सणासुदीच्या हंगामामुळे भारतात रिअल इस्टेट व्यवहार पारंपारिकपणे चालतात, असे या क्षेत्रातील तज्ञ सांगतात.

 

हाऊसिंग डॉट कॉमचे मुख्य महसूल अधिकारी श्री. अमित मसालदान म्हणाले, “सणांचा हंगाम हा रिअल इस्टेट मार्केटसाठी नेहमीच हंगामी चांगला ठरला आहे. यंदा गुंतवणूक करणारे हे मोठ्या संख्येने समोर आले आहेत. सणासुदीचा काळ सुरू होत आहे, हे स्पष्ट संकेत आहे की, येत्या सणाच्या हंगामात, नवरात्रीपासून डिसेंबरच्या अखेरपर्यंत बाजार लक्षणीय वाढीसाठी तयार आहे.”

 

हाऊसिंग डॉट कॉमचा ‘सप्टेंबर २०२४ आयआरआयएस इंडेक्स अहवाल भारताच्या रिअल इस्टेट बाजारात अनेक प्रमुख ट्रेंड दाखवून देतो. या प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन मालमत्ता शोधांमध्ये दिल्ली-एनसीआर आघाडीवर आहे, ५० लाख आणि २कोटी रुपयांच्या दरम्यानच्या ३ बीएचके मालमत्तेसाठी उल्लेखनीय आहे. याउलट, मुंबईच्या मालमत्ता बाजारात १ बीएचके घरांना जास्त मागणी आहे, विशेषत: ₹५० लाख ते ₹१ कोटी किंमतीच्या श्रेणीमध्ये पाहणी अधिक आहे.

 

रेडी-टू-मूव्ह-इन घरे खरेदीदारांसाठी सर्वोच्च प्राधान्य असल्याचे हा अहवाल दर्शवतो, ५०% शोध हा तात्काळ ताबा देणाऱ्या उपलब्ध मालमत्तांवर केंद्रित आहेत. सर्वात लोकप्रिय किंमत श्रेणी ५० लाख आणि ₹१ कोटीदरम्यान आहे, तर टूबीएचके अपार्टमेंट्स ३७% वर सर्वात जास्त शोधले गेलेले आहेत. त्यानंतर ३२% वर ३ बीएचकडे अधिक पाहणी झाले आहेत.

 

टायर २ शहरांमध्ये, इंदूरमध्येही अनेकांची घरे शोधण्यात पसंती दर्शवली आहे. महिन्याकाठी घर शोधणाऱ्यांत ४ टक्के वाढ होत आहे. यामुळे या श्रेणीतील सर्वात जास्त मागणी आहे. एकदम सुसज्य तयार असलेली घरे खरेदी करण्यास अनेकांचे सर्वोच्च प्राधान्य आहे. ५०% लोकांचा शोध हा त्वरित ताबा मिळणाऱ्या घरांकडे आहे. ५० लाख ते १ कोटीदरम्यान अनेक लोकांना घरे हवे आहे, तर २ बीएचके घरे शोधणाऱ्यांची संख्या ३७ टक्के आहे, तर ३२ टक्के लोकांना ३ बीएचके घरे हवी आहेत.

 

सणासुदीच्या हंगामाला सुरुवात होताच, हाऊसिंग डॉट कॉमला बाजारातील क्रियाकलाप आणखी गतीमान होण्याची अपेक्षा आहे. देशभरातील विकसक आकर्षक सणासुदीच्या ऑफर्स, लवचिक कर्ज योजना आणि मागणीच्या या हंगामी वाढीचा फायदा घेण्यासाठी नवीन प्रोजेक्ट लॉन्चसह तयारी करत आहेत.

 

श्री. मसालदान पुढे पुढे म्हणाले, “खूप मागणी, सणासुदीचे शुभ दिवस आणि धोरणात्मक विकासक ऑफर यांचे संयोजन निवासी रिअल इस्टेट बाजारात संधीचे एक उत्तम पर्याय निर्माण करत आहे. जसेजसे सण उत्सव जवळ येतील तसे शोध क्रियाकलापातील वाढीचा अंदाज मजबूत विक्री आकडेवारीमध्ये दिसेल, होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे.

 

एकूणच, निर्देशांकाचे निष्कर्ष असे दर्शवतात की, सणासुदीच्या काळात मोठी विक्री आणि नवीन प्रकल्प सुरू होणार असल्याने वाढत्या किमती असूनही, भारताच्या गृहनिर्माण बाजाराचा २०२४ मजबूत व्यवसाय करून संपेल असा अंदाज आहे.

Related posts

विद्यार्थ्यांना शिकवून घरी जाताना शिक्षिकेला रस्त्यातच मृत्यूने गाठलं; डंपरखाली चिरडून गमावले प्राण

cradmin

बिटकॉइनच्या किंमती कशामुळे प्रभावित होत आहेत?

Shivani Shetty

YRF लाँच करणार पुढचा मोठा सिंगिग सुपरस्टार – भजन कुमार!

Shivani Shetty

Leave a Comment