पुणे – हेंकेल अॅधेसिव्ह्ज टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड (हेंकेल इंडिया)ने शिरगाव, पुणे येथील शारदाश्रम स्कूलमध्ये त्यांच्या रिसर्चर्स वर्ल्ड लॅबच्या उद्घाटनाची घोषणा केली आहे. रिसर्चर्स वर्ल्ड हा हेंकेला सिग्नेचर जागतिक शिक्षण उपक्रम आहे, जो विद्यार्थ्यांना विज्ञान विश्वाची ओळख करून देतो, ज्यामागे त्यांच्यामध्ये एसटीईएम विषयांबाबत उत्सुकता निर्माण करण्याचा मनसुबा आहे. हेंकेल इंडियाच्या २०२४-२५ साठी सीएसआर योजनेअंतर्गत स्थापित करण्यात आलेल्या या लॅबचे उद्घाटन हेंकेल इंडियाचे अध्यक्ष एस. सुनिल कुमार आणि शारदाश्रम स्कूलचे संस्थापक प्रकाश देवळे यांच्या हस्ते करण्यात आले. मावलचे शिक्षण अधिकारी श्री. संजय नाइकडे यांनी उपस्थिती दाखवून या कार्यक्रमाची शोभा वाढवली.
हेंकेल रिसर्चर्स वर्ल्ड ८ ते १० वर्ष वयोगटातील मुलांमध्ये कुतूहल जागृत करण्यावर लक्ष केंद्रित करते आणि मुलांना प्रत्यक्ष संशोधकांच्या भूमिकेत आणत अध्यापन व अध्ययनाप्रती सर्वांगीण दृष्टिकोनाचा अवंलब करते. शारदाश्रम स्कूलमधील रिसर्चर्स वर्ल्ड लॅबमध्ये एका वेळी २० विद्यार्थी सामावू शकतात. ही लॅब आसपासच्या जवळपास ४० शाळांना साह्य करेल. प्रत्येक सत्रामध्ये प्रयोगामध्ये सविस्तर स्पष्टीकरण, उपकरणाचा वापर आणि सुरक्षितता उपायांचा समावेश आहे, ज्यानंतर प्रत्यक्ष कृती करण्याची सुविधा दिली जाते, जेथे विद्यार्थी त्यांच्या निरीक्षणांची नोंद करू शकतात आणि फॅसिलिटेटर्ससोबत त्याबाबत चर्चा करू शकतात. वर्षभरात विद्यार्थी १२ प्रयोग पूर्ण करतील, जेथे पुण्यातील हेंकेल कर्मचाऱ्यांकडून मार्गदर्शन केले जाईल, जे रिसर्चर्स वर्ल्ड लॅबमध्ये शिक्षक म्हणून सेवा देतात.
या उद्घाटनाबाबत मत व्यक्त करत एस. सुनिल कुमार म्हणाले, “हेंकेल इंडियामध्ये आम्हाला शारदाश्रम स्कूलमध्ये लॅबचे उद्घाटन करण्याचा आनंद होत आहे. समुदायांच्या प्रगतीला चालना देण्याप्रती आमच्या कटिबद्धतेचा भाग म्हणून हेंकेल रिसर्चर्स वर्ल्डचा सर्व मुलांना एसटीईएम शिक्षण उपलब्ध करून देत त्यासंदर्भातील तफावत दूर करण्याचा मनसुबा आहे. व्यावहारिक ज्ञान व प्रात्यक्षिकाशिवाय विज्ञानाचे खरे पैलू अनुभवता येऊ शकत नाही किंवा घडवून आणले जाऊ शकत नाही. मुलांना त्यांच्या जिज्ञासू विचारसरणीला प्रकाशझोतात आणण्यासोबत त्यांच्यामधील वैज्ञानिक / संशोधक-सारख्या वृत्तीला चालना देण्याची संधी देण्याकरिता हेंकेलने रिसर्चर्स वर्ल्ड लाँच केले. हा उपक्रम दीर्घकाळापर्यंत तरूण विचारवंतांमध्ये विज्ञानाप्रती आवड निर्माण करेल, तसेच त्यांना जिज्ञासू होण्यास प्रेरित करेल आणि शोध घेण्याची वृत्ती विकसित होण्यास मदत करेल.”
रिसर्चर्स वर्ल्ड उपक्रमाची आता २० देशांमध्ये यशस्वीरित्या अंमलबजावणी करण्यात आली आहे आणि भारतात या उपक्रमाचे लाँच या जागतिक उपक्रमासाठी उत्साहवर्धक विस्तारीकरण आहे. एप्रिल २०११ मध्ये हेंकेलच्या डसलडॉर्फ मुख्यालयामध्ये या उपक्रमाचे उद्घाटन केल्यापासून जगभरातील १००,००० हून अधिक मुलांनी हेंकेलच्या रिसर्चर्स वर्ल्ड उपक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे. या उपक्रमाचा दैनंदिन जीवनामध्ये महत्त्वपूर्ण परीक्षण, विश्लेषण, डेटा, विज्ञान व सर्जनशीलतेचे स्पष्टीकरण अशा वैज्ञानिक पद्धतींचा अवलंब करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा मनसुबा आहे.
हेंकेलच्या भारतातील सीएसआर प्रयत्नांनी वंचित पार्श्वभूमींमधील विद्यार्थ्यांना मदतीचा हात पुढे करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे, जेथे अशा समर्पित लॅब्सच्या माध्यमातून आवश्यक अध्ययन संधी दिल्या जात आहेत. तसेच, हेंकेलने अॅस्ट्रॉनॉमी लॅब, शाश्वत शिक्षण, करिअर मार्गदर्शन, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध उपक्रमांसाठी शारदाश्रम स्कूलसोबत सहयोग केला आहे.