गुरूग्राम, भारत- जानेवारी, २०२५- गेल्या दहा वर्षांहून अधिक काळापासून जगभरातील लोकांनी गॅलॅक्झी स्मार्टफोन्सचा वापर करून त्यांची उत्पादनक्षमता व सर्जनशीलता सातत्याने वाढवली आहे. प्रामुख्याने आमच्या गॅलॅक्झी नोट सीरिजच्या नवोन्मेषावर आधारित गॅलॅक्झी एस अल्ट्रा सीरिज ही असीम सर्जनशीलतेचे दुसरे नाव झाली आहे. असंख्य गॅलॅक्झी चाहत्यांना ही उत्पादने खूप आवडत आहेत.
अविश्वसनीय पॉवर, विस्तृत स्क्रीन आणि वैशिष्ट्यपूर्ण एस पेन यांच्या माध्यमातून लोकांना त्यांच्या प्रेरणांचा पाठपुरावा करण्यात तसेच कोणत्याही वेळी, कोठूनही, अगदी फोन अनलॉकही न करता आणि टिपणे घेण्याचे अॅप उघडूनही न बघता, कल्पना टिपण्यात लोकांना उपयोगी पडणारा म्हणून गॅलॅक्झी एस अल्ट्रा प्रसिद्ध आहे.
अभूतपूर्व सर्जनशीलता
गेल्या वर्षी सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने मोबाइल अनुभवांच्या नवीन युगाची ग्वाही देणारे गॅलॅक्झी एआय बाजारात आणले. या चाकोरीबाह्य तंत्रज्ञानाच्या मदतीने गॅलॅक्झी एस अल्ट्रा मालिकेची उत्क्रांती सर्जनशील स्वातंत्र्य कमाल स्तरावर नेणाऱ्या आणखी मोलाच्या साधनात झाली. आणि आता, तुमची सर्जनशीलता आणखी उंची गाठण्यासाठी सज्ज आहे.
ड्रॉइंग असिस्टमध्ये एकात्मीकरण करण्यात आलेले स्केच टू इमेज आता उत्क्रांत होत आहे. एस पेनने किंवा बोटाने रेखाटन करण्यासारख्या एकाहून अधिक साधनांचा उपयोग करण्यापासून एका बहुमार्गीय अनुभवाकडे हे साधन जात आहे. आता वापरकर्ते त्यांच्या कल्पनांचे रेखाटन करून त्या जिवंत करू शकतात, मजकूरासोबत त्यांना जी प्रतिमा हवी असेल, तिचे वर्णन करू शकतात किंवा काय काढायचे आहे याच्या सूचना गॅलॅक्झी स्मार्टफोनला व्हॉइस कमांड्सचा (ध्वनी सूचना) वापर करून देऊ शकतात. हे सगळे डोळ्यापुढे आणले जाऊ शकत असेल, तर गॅलॅक्झी एआय त्याची निर्मिती करू शकते.
उदाहरणार्थ, तुम्हाला तुमच्या कल्पनाशक्तीला खरोखर मुक्त सोडायचे आहे. गॅलॅक्झी एआयच्या बहुमार्गीय क्षमतांच्या माध्यमातून, तुम्ही ए पेन वापरून एका मांजरीचे चित्र काढू शकता आणि मग ‘स्पेससुट’ असा शब्द टाइप करून त्या मांजरीला त्या अवकाश पोशाखात टाकू शकता आणि तिला बाहेरील अवकाशात पाठवू शकता. एस पेन वापरून तुम्ही दर्शनी भागाचे चित्र झटपट काढू शकता. मात्र, तुमचे स्वप्नातील घर नेमके कुठे हवे आहे हे तुम्हाला कदाचित नक्की माहीत नसेल. त्यावेळी तुम्ही फक्त काही संभाव्य स्थळे टाइप करू शकता, उदाहरणार्थ, ‘समुद्रकिनारी’ किंवा ‘उंच पर्वतांवर’. मग ड्रॉइंग असिस्ट तुम्हाला तुमचे भविष्यकाळातील घर एका नवीन पद्धतीने बघण्यात तुम्हाला मदत करू शकेल.
नोटपासून अल्ट्रापर्यंत आणि त्याहीपलीकडे
स्मार्टफोनवर सर्जनशीलरित्या काय शक्य आहे याची व्याख्या नव्याने करण्याच्या उद्देशाने २०११ मध्ये आम्ही सुरू झालेल्या गॅलॅक्झी नोटच्या नवोन्मेषाच्या पायावरच सर्जनशील स्वातंत्र्याचा हा स्तर उभा करण्यात आला आहे. नवोन्मेषाची ही शक्ती व चैतन्य गॅलॅक्झी एस अल्ट्रा मालिकेच्या माध्यमातून जिवंत आहे आणि गॅलॅक्झी एआयच्या माध्यमातून ते अधिक उत्क्रांत होत आहे.
वन यूआय 7 या सॅमसंगच्या पहिल्या एकात्मिक एआय प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून गॅलॅक्झी स्मार्टफोन्स मजकूर, भाषा व प्रतिमा यांच्यामार्फत नैसर्गिक भाषा समजू शकणारे खरेखुरे एआय सोबती होणार आहेत. अभूतपूर्व सर्जनशीलता देणाऱ्या बहुमार्गीय मोबाइल एआयच्या क्षेत्रात ते नवीन मापदंड स्थापन करणार आहेत. अर्थात ही फक्त झलक आहे- पुढची गॅलॅक्झी एस मालिका कशा पद्धतीने खरोखर सर्जनशीलता खुली करू शकते हे जाणून घेण्यासाठी २२ जानेवारीला ‘गॅलॅक्झी अनपॅक्ड’ नक्की बघा.