maharashtraprimenews
ठळक बातम्या
महाराष्ट्र

एआय परिवर्तनामुळे २०२८ पर्यंत २.७३ दशलक्ष टेक रोजगार निर्माण होण्‍यासह भारतातील कर्मचाऱ्यांची आकडेवारी ३३.९ दशलक्षपर्यंत पोहोचणार: सर्विसनाऊ एआय स्किल्‍स अँड जॉब्‍स रिपोर्ट

भारत, १३ नोव्‍हेंबर, २०२४: व्‍यवसाय परिवर्तनासाठी एआय प्‍लॅटफॉर्म सर्विसनाऊने केलेल्‍या नवीन संशोधनाच्‍या मते, उदयोन्‍मुख तंत्रज्ञान भारतातील प्रमुख विकास क्षेत्रांमधील टॅलेंटमध्‍ये आमूलाग्र बदल घडवून आणेल, तसेच २०२८ पर्यंत २.७३ दशलक्ष नवीन टेक रोजगार निर्माण होतील. जगातील झपाट्याने विकसित होत असलेल्‍या प्रमुख अर्थव्‍यवस्‍थांपैकी एक भारत देश आपल्‍या कर्मचाऱ्यांची संख्‍या २०२३ मधील ४२३.७३ दशलक्षवरून २०२८ पर्यंत ४५७.६२ दशलक्षपर्यंत वाढवण्‍याच्‍या दिशेने वाटचाल करत आहे, ज्‍यामध्‍ये ३३.८९ दशलक्ष कर्मचाऱ्यांची भर होण्‍याचे दिसून येत आहे.

 

जगातील आघाडीची लर्निंग कंपनी पीअरसनने केलेल्‍या संशोधनामधून निदर्शनास येते की, रिटेल क्षेत्र रोजगार वाढीचे नेतृत्‍व करण्‍यास सज्‍ज आहे, जेथे त्‍यांच्‍या विस्‍तारीकरणासाठी अतिरिक्‍त ६.९६ दशलक्ष कर्मचाऱ्यांची आवश्‍यकता आहे. ही वाढ रिटेल व्‍यावसायिकांना सॉफ्टवेअर अॅप्‍लीकेशन डेव्‍हलपमेंट आणि डेटा इंजिनीअरिंग अशा क्षेत्रांमध्‍ये अपस्किल करण्‍याची बहुमूल्‍य संधी देते, तसेच त्‍यांना टेक-संचालित लँडस्‍केपसाठी सुसज्‍ज करते. यानंतर उत्‍पादन (१.५० दशलक्ष रोजगार), शिक्षण (०.८४ दशलक्ष रोजगार) आणि आरोग्‍यसेवा (०.८० दलशक्ष रोजगार) यांचा क्रमांक येतो, ज्‍यांना अपेक्षित आर्थिक वाढ आणि टेक परिवर्तनाचे पाठबळ मिळाले आहे.

 

सर्विसनाऊ इंडिया टेक्‍नॉलॉजी अँड बिझनेस सेंटरचे वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष आणि व्‍यवस्‍थापकीय संचालक सुमीत माथूर म्‍हणाले, “एआय भारतातील विकास गाथांमध्‍ये रोजगार निर्मितीसाठी, विशेषत: प्रगत टेक्निकल कौशल्‍यांमध्‍ये आवश्‍यक असलेली पदे निर्माण करण्‍यासाठी प्रमुख उत्‍प्रेरक ठरेल. या धोरणात्‍मक पुढाकारामुळे व्‍यावसायिकांसाठी अधिक महत्त्वपूर्ण संधी निर्माण होईल, तसेच ते सर्वोत्तम डिजिटल करिअर घडवण्‍यामध्‍ये सक्षम होतील. ‘राइजअप विथ सर्विसनाऊ’ सारखे उपक्रम आणि स्‍थानिक युनिव्‍हर्सिटीज व सरकारी उपक्रमांसोबत धोरणात्‍मक सहयोगांच्‍या माध्‍यमातून आम्‍ही कौशल्‍यामधील तफावत दूर करत आहोत, तसेच भारतातील कर्मचारीवर्गाला यशस्‍वी होण्‍यासाठी आवश्‍यक असलेल्‍या साधनांसह सक्षम करत आहोत. टॅलेंटला या आवश्‍यक कौशल्‍यांसह सुसज्‍ज करत आपण खात्री घेऊ शकतो की, भारत जागतिक टेक अर्थव्‍यवस्‍थेमध्‍ये लीडर राहिल.”

 

उद्योगामधील परिवर्तनादरम्‍यान टेक रोजगारप्रती मागणी वाढली

उद्योगांमध्‍ये टेक-संबंधित रोजगार वाढत आहे, जेथे क्षेत्रांमधील प्रोफेशनल, सायण्टिफिक व टेक्निकल सर्विसेस, मॅन्‍युफॅक्‍चुरिंग आणि टेलिकम्‍युनिकेशन्‍स विस्‍तारीकरणासाठी सज्‍ज आहेत. या ट्रेण्‍डमध्‍ये अग्रस्थानी आहे सॉफ्टवेअर अॅप्‍लीकेशन डेव्‍हलपर्स, जेथे १०९,७०० पदांची वाढ होण्‍याची अपेक्षा आहे. इतर उल्लेखनीय पदांमध्‍ये सिस्‍टम्‍स सॉफ्टवेअर डेव्‍हलपर्स (४८,८०० नवीन रोजगार) आणि डेटा इंजिनीअर्स (४८,५०० नवीन रोजगार) यांचा समावेश आहे. वेब डेव्‍हलपर्स, डेटा अॅनालिस्‍ट्स आणि सॉफ्टवेअर टेस्‍टर्स यांची अनुक्रमे ४८,५००, ४७,८०० व ४५,००० पदांच्‍या अपेक्षित भरसह मागणी वाढली आहे. तसेच, डेटा इंटीग्रेशन स्‍पेशालिस्‍ट्स, डेटाबेस आर्किटेक्‍ट्स, डेटा सायण्टिस्‍ट्स आणि कम्‍प्‍युटर अँड इम्‍फर्मेशन सिस्‍टम्‍स मॅनेजर्स अशा पदांमध्‍ये ४२,७०० ते ४३,३०० पदांपर्यंत वाढ दिसण्‍याची अपेक्षा आहे. ऊर्जा, सरकारी सेवा व युटिलिटीज अशा उद्योगांमध्‍ये देखील उदयोन्‍मुख तंत्रज्ञानाचा प्रभाव दिसून येईल, ज्‍यामुळे तंत्रज्ञान-संचालित सुधारणांदरम्‍यान कर्मचारीवर्गामध्‍ये वाढ होण्‍याला गती मिळेल.

 

जेन एआय आयटीमधील टेक पदांना नवीन आकार देत आहे

उदयोन्‍मुख तंत्रज्ञानाचा प्रभाव मुख्‍य टेक पदांना कशाप्रकारे वेगवेगळे करतो याचा शोध घेण्‍यासाठी टास्‍क पातळीवर या पदांचे मूल्‍यांकन करण्‍यात आले. यापैकी सिस्‍टम्‍स अॅडमिनिस्‍ट्रेटर्स पदामध्‍ये मोठा बदल दिसून येईल, जेथे त्‍यांचे ६.९ तासांचे साप्‍ताहिक काम उदयोन्‍मुख तंत्रज्ञानांमुळे ऑटोमेटेड होतील किंवा त्‍यामध्‍ये सुधारणा होईल. एआय सिस्‍टम्‍स इंजीनिअर्सला देखील जेन एआयमधून मोठा फायदा होईल, जेथे या पदावरील एकूणपैकी अर्धा टेक प्रभाव प्रत्‍यक्ष एआय तंत्रज्ञानांमधून येतो. तसेच, इम्‍प्‍लीमेन्‍टेशन कन्‍सल्‍टण्‍ट्सला जनरेटिव्‍ह एआयच्‍या एकीकरणामधून मोठा फायदा मिळेल, जेथे एआय वारंवार टास्‍क्‍सवर देखरेख ठेवण्‍यासह दर आठवड्याला १.९ तास कामाची बचत होते, ज्‍यामुळे त्‍यांना अधिक धोरणात्‍मक प्रकल्‍पांवर लक्ष केंद्रित करता येईल. कमी प्रभावित पद प्‍लॅटफॉर्म ओनर्स देखील दर आठवड्याला जवळपास अर्धा तासाची बचत करू शकतील. उदयोन्‍मुख तंत्रज्ञान टेक इकोसिस्‍टम्‍मधील पदांमध्‍ये क्रांती घडवून आणतील, ज्‍यामुळे व्‍यावसायिक अधिक स्‍मार्टपणे व जलदपणे काम करण्‍यास सक्षम होतील.

 

सुमीत माथूर पुढे म्‍हणाले, “सर्विसनाऊ जेन एआयच्‍या अंमलबजावणीच्‍या पहिल्‍या १२० दिवसांमध्‍ये आम्‍ही किमान टेक्निकल प्रयत्‍नासह ५ दशलक्ष डॉलर्सहून अधिक वार्षिक खर्च टेकआऊट आणि सर्विसनाऊमधील उत्‍पादकतेमध्‍ये ४ दशलक्ष डॉलर्सहून अधिक वार्षिक खर्च टेकआऊट संपादित केले आहे. आज, सर्विसनाऊच्‍या एकूण एआय मूल्‍यापैकी ३० टक्‍के मूल्‍य नाऊ असिस्‍टमधून प्राप्‍त होते. आम्‍हाला साप्‍ताहिक उत्‍पादकता तासांमध्‍ये १० टक्‍के वाढ आणि कोड स्‍वीकृती दरामध्‍ये ४८ टक्‍क्‍यांची वाढ दिसण्‍यात आली आहे. तसेच, आम्‍हाला कर्मचारी सेवांसह मोठा प्रभाव निदर्शनास आला आहे, जेथे आम्‍ही फक्‍त सर्चमध्‍ये ६२ हजार तासांची बचत केली आहे आणि कर्मचारी डिफ्लेक्‍शन दरामध्‍ये १४ टक्‍के वाढ केली आहे. सर्विसनाऊमध्‍ये एआय आम्‍हाला अधिक उत्‍पादनक्षम असण्‍यास आणि आमच्‍या ग्राहकांना त्‍यांची उत्‍पादकता ध्‍येये संपादित करण्‍यास मदतीचा हात पुढे करण्‍यास साह्य करत आहे.”

 

भारतात रोजगार-सक्षम टॅलेंट पाइपलाइनची निर्मिती

या गतीशी संलग्‍न राहण्‍यासाठी कंपन्‍या आणि धोरणकर्त्‍यांनी एकत्रित प्रयत्‍न करत कर्मचाऱ्यांना अपस्किल केले पाहिजे आणि तंत्रज्ञान-सक्षम कर्मचारीवर्ग घडवण्‍याची खात्री घेतली पाहिजे. ‘राइजअप विथ सर्विसनाऊ’ प्रोग्राम जागतिक उपक्रम आहे, जो तरूण इंजीनिअर्सना व्‍यावहारिक, रोजगार-सुसज्‍ज कौशल्‍यांसह सक्षम करण्‍यावर लक्ष केंद्रित करतो. या उपक्रमाचा २०२४ पर्यंत जगभरातील उच्‍च मागणी असलेल्‍या डिजिटल क्षमतांमध्‍ये एक लाख व्‍यक्‍तींना प्रशिक्षण देण्‍याचा मनसुबा आहे. ९७,६९५ भारतीयांनी गेल्‍या १२ महिन्‍यांमध्‍ये कंपनीच्‍या एआय प्‍लॅटफॉर्मवर कौशल्‍ये अवगत केली आहेत. सर्विसनाऊने १६ राज्‍यांमधील २० युनिव्‍हर्सिटीजसोबत सहयोग करत, तसेच सरकारी संस्‍था फ्यूचरस्किल्‍स प्राइम बाय नॅसकॉम आणि एआयसीटीई यांच्‍यासोबत भागीदारी करत आपला युनिव्‍हर्सिटी अकॅडेमिक प्रोग्राम देखील लाँच केला आहे. या प्रयत्‍नांच्‍या माध्‍यमातून त्‍यांनी हजारो विद्यार्थ्‍यांना प्रशिक्षित केले आहे, तसेच टेक उद्योगासाठी रोजगार-सुसज्‍ज टॅलेंटची पाइपलाइन तयार करत आहे.

 

संशोधन कार्यपद्धती:

फॅथेम बाय पीअरसनचे लेबर मार्केट इनसाइट्स (एलएमआय) मॉडेलिंग उदयोन्‍मुख तंत्रज्ञान व आर्थिक ट्रेण्‍ड्सच्‍या परिणामाचा विचार करत, पुरेसे तंत्रज्ञान अवलंब व अपेक्षित भावी आर्थिक ट्रेण्‍ड्ससह लोकसंख्‍या वाढीचा अंदाज करत रोजगार व उद्योगामध्‍ये पुढील १ ते १५ वर्षांमध्‍ये होणाऱ्या परिवर्तनाबाबत अंदाज व्‍यक्‍त करते. भारतासाठी, देशातील कर्मचारीवर्ग बाजारपेठेचा बेसलाइन जनगणना आणि कर्मचारीवर्ग सर्वेक्षण डेटामधून मिळवण्‍यात येतो, तर आर्थिक विकासासंदर्भातील अंदाज इंटरनॅशनल मोनेटरी फंड (आयएमएफ) मधून प्राप्‍त केली जाते.

 

रोजगारांमधील कामावर व्‍यतित करण्‍यात आलेल्‍या विद्यमान वेळेचे विश्‍लेषण करत मॉडेल उदयोन्‍मुख तंत्रज्ञान कशाप्रकारे या टास्‍क्‍सना साह्य किंवा पूर्ण करू शकतात या बाबीला ओळखते, ज्‍यामुळे कर्मचाऱ्यांना अधिक महत्त्वपूर्ण असलेल्‍या टास्‍क्‍सवर लक्ष केंद्रित करता येते. पीअरसनच्‍या ऑन्‍टोलॉजीमधील प्रत्‍येक ८०,००० टास्‍क्‍ससाठी त्‍यावर प्रभाव करणारे सर्वात संभाव्‍य उदयोन्‍मुख तंत्रज्ञान नियुक्‍त करण्‍यात आले आहे, जेथे पद, उद्योग आणि देशानुसार प्रभावाचे प्रमाण बदलते. या घटकांना ए‍कत्रित करत मॉडेल टास्‍क, रोजगार व उद्योग पातळ्यांवरील परिवर्तनाबाबत माहिती देते, तसेच अर्थव्‍यवस्‍थेचे सर्वसमावेशक दृश्‍य देते.

Related posts

उन्‍हाळ्याकरिता द बॉडी शॉपचे व्हिटॅमिन सी कलेक्‍शन

Shivani Shetty

कोका-इंडिया आणि अंजू बॉबी स्‍पोर्ट्स फाऊंडेशन यांच्‍यामधील दीर्घकालीन सहयोग महिला अॅथलीट्सना सक्षम करत आहे ~ कोका-कोला इंडिया सरावासाठी मोठे मैदान आणि दर्जात्‍म‍क

Shivani Shetty

कलावती’ चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न…

Shivani Shetty

Leave a Comment