maharashtraprimenews
ठळक बातम्या
पब्लिक इंटरेस्टप्रदर्शनमहाराष्ट्रमुंबई

महालक्ष्मी सरस 2026’ नागरिकांसाठी विशेष मोफत बस सेवा सुरू* *

मुंबई :** बहुचर्चित ‘महालक्ष्मी सरस प्रदर्शन २०२६’ ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, प्रदर्शनस्थळी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी विशेष मोफत बससेवा सुरू करण्यात आली आहे. ही सेवा ९ मे ते १७ मे २०२६ या कालावधीत उपलब्ध राहणार असून, दररोज दुपारी १२ ते रात्री १२ वाजेपर्यंत नागरिकांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

महालक्ष्मी सरस प्रदर्शन २ मेपासून सुरू झाले असून, १७ मेपर्यंत बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानावर हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी तयार केलेली हस्तकला, पारंपरिक वस्तू, खाद्यपदार्थ आणि विविध उत्पादने पाहण्यासाठी मुंबईकर मोठ्या संख्येने प्रदर्शनाला भेट देत आहेत.

नागरिकांची वाढती गर्दी लक्षात घेता, आयोजकांकडून दोन विशेष मार्गांवर मोफत बससेवा उपलब्ध करण्यात आली आहे.

**बससेवेचे मार्ग पुढीलप्रमाणे :**

**मार्ग क्रमांक १ : बांद्रा पूर्व रेल्वे स्थानक ते महालक्ष्मी सरस प्रदर्शन, बीकेसी एमएमआरडीए मैदान**

**मार्ग क्रमांक २ : कुर्ला रेल्वे स्थानक ते महालक्ष्मी सरस प्रदर्शन, बीकेसी एमएमआरडीए मैदान**

दोन्ही मार्गांवर प्रत्येकी दोन बस दिवसभर फेऱ्या मारणार असून, नागरिकांना ये-जा करण्यासाठी ही सेवा पूर्णपणे मोफत उपलब्ध असेल.

या उपक्रमामुळे नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होणार असून, प्रवास खर्चातही बचत होणार आहे. विशेषतः कार्यालयीन वेळेनंतर किंवा रात्रीच्या वेळेतही नागरिकांना प्रदर्शनाला सहज भेट देता यावी, हा या सेवेमागील प्रमुख उद्देश आहे.

महालक्ष्मी सरस प्रदर्शन हे ग्रामीण महिलांच्या कौशल्याला आणि उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणारे महत्त्वाचे व्यासपीठ ठरत आहे. प्रदर्शनातील विविध स्टॉल्स, पारंपरिक संस्कृतीची झलक आणि दर्जेदार ग्रामीण उत्पादने यामुळे हे प्रदर्शन मुंबईकरांसाठी विशेष आकर्षणाचे केंद्र बनले आहे.

अधिकाधिक नागरिकांनी या मोफत बससेवेचा लाभ घेत महालक्ष्मी सरस प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Related posts

Analiza ponude i iskustva na Superbet platformi

cradmin

अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट? उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर अपक्ष उमेदवाराचा गंभीर आरोप

cradmin

अपग्रॅड चार शहरांमध्ये विस्तार करणार

Shivani Shetty

Leave a Comment