maharashtraprimenews
ठळक बातम्या
सार्वजनिक स्वारस्य

टीईजीसीकडून भारतातील ईस्‍पोर्ट्स गेमर्ससाठी वंडरलँडची निर्मिती; अल्टिमेट चॅम्पियनशीपसाठी अत्‍यंत लक्षवेधक व स्‍मार्ट गेमिंग गॅझेट्स सादर

मुंबई, २९ नोव्‍हेंबर २०२२ – प्रखर आणि रोमहर्षक हे दोन शब्‍द आहेत, जे भारतातील सर्वात लोकप्रिय व मेगा ईस्‍पोर्ट्स स्‍पर्धा – तैवान एक्‍सलन्‍स गेमिंग कप (टीईजीसी) च्‍या ९व्‍या पर्वाच्‍या ग्रॅण्‍ड फिनालेला सर्वोत्तमरित्‍या वर्णन करू शकतात. २६ नोव्‍हेंबर रोजी मुंबईतील इन्फिनिटी मॉल, मालाड येथे दोन वर्षांनंतर भौतिकरित्‍या हा इव्‍हेण्‍ट आयोजित करण्‍यात आला. वॅलोरण्‍ट, डब्‍ल्‍यूसीसी३, पोकेमॉन युनायट आणि सीएस गो या चार टायटल्‍समध्‍ये आयोजित करण्‍यात आलेल्‍या गेमिंग स्‍पर्धेने २३,७२५ नोंदणींसह मागील सर्व रेकॉर्ड्स मोडून काढले.

२६ सप्‍टेंबर ते १३ नोव्‍हेंबरपर्यंत आयोजित पात्रता फेऱ्यांमधून आम्‍हाला अव्‍वल स्‍पर्धक मिळाले. विजेत्‍या टीम्‍स पोकेमॉन युनायटसाठी गॉड्स रीन (विजेते) व रेवेनण्‍ट ईस्‍पोर्ट्स (प्रथम उपविजेते), सीएस:गो साठी टीम्‍स फायर्डअप गेमिंग (विजेते) व किंगपिन्‍स (प्रथम उपविजेते), वॅलोरण्‍असाठी टीम वेलोर (विजेते) आणि डबल्‍यूसीसी३ साठी भोई तेजसकुकार हसमुखभाई (विजेते) यांच्‍यामध्‍ये १२ लाख रूपये बक्षीसाची रक्‍कम विभागण्‍यात आली. लोकप्रिय ईस्‍पोर्ट्स अॅथलीट्स व प्रभावक सिद जोशी, अमन जैन व यश सोनी यांनी देखील या भव्‍य ईव्‍हेण्‍टमध्‍ये सहभाग घेतला.

ऑन-ग्राऊण्‍ड इव्‍हेण्‍टमधील उत्‍साह अभूतपूर्व होता, देशभरातील गेमिंग उत्‍साही बॅटलफिल्‍डचा अनुभव घेण्‍यासाठी एकत्र आले. अनेकांनी पहिल्‍यांदाच गेमिंग एक्स्ट्राव्हॅन्झा पाहण्‍याचा प्रत्‍यक्ष अनुभव घेतला. त्‍यांनी तैवानी ब्रॅण्‍ड्ससोबत संवाद साधला आणि सर्वात प्रगत गेमिंग गॅझेट्स, कन्‍सोल्‍स व अॅक्‍सेसरीजचा प्रत्‍यक्ष अनुभव घेतला. हे ब्रॅण्‍ड्स होते एआयएपुए, एओआरयूएस, कूलर मास्‍टर, सायबरपॉवर, डी-लिंक, आयपेवो, एमएसआय, ऑप्‍टोमा, प्रीडेटर, रिपब्लिक ऑफ गेमर्स, थर्मलटेक, टोकूयो, एक्‍सपीजी, झोवी व झायक्‍सेल. त्‍यांनी फिनालेमध्‍ये त्‍यांची जागतिक दर्जाची तंत्रज्ञान उत्‍पादने व गेमिंग डिवाईसेस दाखवली आणि आपले प्रभुत्‍व सादर करण्‍यामध्‍ये कोणतीच कसर सोडली नाही. प्रेक्षक सहभाग व परस्‍परसंवाद वाढवण्‍यासाठी अनेक सहभागात्‍मक कृती देखील आयोजित करण्‍यात आल्‍या. गेमिंग कपचे फेसबुक, यूट्यूब, लोको व रूटरवर देखील लाइव्‍हस्ट्रिम करण्‍यात आले.

मागील पर्वांच्‍या तुलनेत यावेळी प्रेक्षक असो, सहभागी असो किंवा त्‍यांचे समर्थक असो फॅड खूप होते. टीईजीसीने अभूतपूर्व स्‍टेटमेंट केली.

आज, ईस्‍पोर्ट्स भारतातील फक्‍त शहरी गेमर्स राहिले नसून जीवनशैली निवड बनले आहे. गेमर्स खेळण्‍यासोबत व्‍यावसायिक गेमर्स म्‍हणून करिअर घडवण्‍याची महत्त्वाकांक्षा देखील बाळगतात. ते ईस्‍पोर्ट्स संदर्भात होणाऱ्या परिवर्तनाबाबत अद्ययावत राहू पाहतात. फिक्‍की-ईवाय मीडिया अॅण्‍ड एंटरटेन्‍मेंट रिपोर्ट २०२२ च्‍या मते ईस्‍पोर्ट्स खेळाडूंची संख्‍या २०२० मध्‍ये ३००,००० वरून २०२१ मध्‍ये ६००,००० पर्यंत वाढली आणि महसूल २०२० मध्‍ये ७.५ बिलियन रूपयांच्‍या तुलनेत २९ टक्‍क्‍यांच्‍या वाढीसह २०२१ मध्‍ये ९.७ बिलियन रूपयांपर्यंत वाढला. ही वाढ पुढे देखील सुरू राहण्‍याची त्‍यांना अपेक्षा आहे, जेथे २०२२ मध्‍ये ईस्‍पोर्ट्स खेळाडूंची संख्‍या एक दशलक्षापर्यंत पोहोचण्‍याची अपक्षा आहे. ही वाढ पाहता प्रमुख तंत्रज्ञान ब्रॅण्‍ड्स प्रगत तंत्रज्ञान घेऊन येत आहेत आणि या उत्‍साहींच्‍या आशा व महत्त्वाकांक्षांना पाठिंबा देण्‍यास सज्‍ज आहेत.
टीईजीसी भारतातील ईस्‍पोर्ट्स गेमर्सच्‍या गरजांची पूर्तता करताना उत्‍प्रेरक म्‍हणून देखील कार्य करते. त्‍यांच्‍या मोहिमेला १० सप्‍टेंबर रोजी टीईजीसीच्‍या ९व्‍या पर्वाची घोषणा आणि टीई एक्‍स्‍पेरिअन्‍स ट्रकच्‍या लॉन्‍चसह अधिकृतरित्‍या सुरूवात झाली.

अभ्यागतांसाठी, द टीई एक्‍स्‍पेरिअन्‍स ट्रक हे टेलर-मेड मोबाइल शोरूम होते, ज्याचा अभ्यागतांना आयसीटी व गेमिंगमधील काही स्टायलिश, स्मार्ट आणि अत्यंत इंटेलिजण्‍ट तंत्रज्ञानाचा अनुभव घेण्याची संधी देण्‍याचा उद्देश आहे. गेमिंग इव्‍हेण्‍ट, विविध फेस्ट आणि मॉल्स यासह शहरांमधील प्रमुख इव्‍हेण्‍ट्सना या ट्रकने भेट दिली, ज्‍यामुळे लोकांना सर्वोत्तम तैवानी ब्रँडद्वारे ऑफर केलेल्या तंत्रज्ञानाचा अनुभव मिळाला.

या मोहिमेबाबत बोलताना तैपेई वर्ल्ड ट्रेड सेंटर (टीडब्‍लयूटीसी) च्या मुंबईतील संपर्क कार्यालयाचे संचालक एडिसन पो-यी हसू म्हणाले, “गेल्या काही वर्षांपासून आमच्‍या ट्रेण्‍डमध्ये आणि गेमिंग कपच्‍या नोंदणीच्या संख्येत वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे, ज्‍यामधून या स्‍पर्धेची लोकप्रियता दिसून येते. भारतातील ईस्‍पोर्ट्स विशेषत: तरूण पिढीसाठी जीवनशैली बनले आहे. ते गेमिंग विश्‍वामध्‍ये स्‍वत:चे नाव स्‍थापित करत आहेत. या वाढीचा भाग असल्‍याने मी स्‍वत:ला भाग्‍यवान मानतो. माझ्या मते, टीईजीसीने भारतात ईस्‍पोर्ट्स लोकप्रिय करण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आम्ही या देशातील गेमर्सना मदत करत राहू.”

Related posts

गोदावरी मराठी क्रेडीट लिस्ट

Shivani Shetty

पुणेकरांना अनुभवता येणार प्रख्यात संगीत उस्तादांच्या संगीतमय आवाजाचा नजराणा

Shivani Shetty

‘कुलस्वामिनी’ पहा: 11 नोव्हेंबरपासून तुमच्या जवळच्या सिनेमागृहात कोल्हापूरच्या महालक्ष्मीला समर्पित भक्तीपट

Shivani Shetty

Leave a Comment