maharashtraprimenews
ठळक बातम्या
रिअल इस्टेट

गोदरेज प्रॉपर्टीजतर्फे मुंबईतील कांदिवली येथे १८ एकर जमीनीचे संपादन

मुंबई, २ डिसेंबर २०२२: भारतातील आघाडीच्या बांधकाम व्यवसाय विकसकांपैकी एक असलेल्या गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड (GPL), (BSE scrip id: GODREJPROP) ने आऊटराइट तत्वावर मुंबईतील कांदिवली येथे १८.६ एकर जमीन विकत घेतली असल्याचे आज जाहीर केले. प्रकल्पाची अंदाजे ३.७२ दशलक्ष चौरस फूट एवढी विकसन क्षमता असून साधारण ७,००० कोटी* रुपयांच्या महसूल क्षमतेचा अंदाज आहे.

 

विकासामध्ये प्रामुख्याने प्रीमियम निवासी अपार्टमेंट्सचा समावेश असणार असून जोडीला रिटेल जागाही असतील. हा जीपीएलच्या सर्वात मोठ्या निवासी विकास प्रकल्पांपैकी एक असून त्यामुळे मुंबईच्या पश्चिम उपनगरातील त्यांचे स्थान लक्षणीयरीत्या मजबूत करेल.

 

आर्थिक वर्ष २३ मधील जीपीएलसाठी ही ८ वी प्रकल्प जोडणी आहे आणि पूर्ण वर्षभराच्या प्रकल्प जोडणीच्या १५,००० कोटी रुपयांच्या अपेक्षित बुकिंग मूल्याच्या समोर आर्थिक वर्ष २३ मध्ये भर पडलेल्या प्रकल्पांमधून एकत्रित अपेक्षित बुकिंग मूल्य अंदाजे १६,५०० कोटी रुपये आहे.

 

गोदरेज प्रॉपर्टीजचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मोहित मल्होत्रा ​​म्हणाले, “मुंबईतील या मोठ्या आणि धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या प्रकल्पाची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. या प्रकल्पामुळे आम्हाला पुढील काही वर्षांत मुंबईतील आमचा बाजारपेठीय हिस्सा लक्षणीयरीत्या वाढवता येईल. प्रमुख रिअल इस्टेट मायक्रो बाजारपेठेमध्ये आमचे स्थान आणखी मजबूत करण्याच्या आमच्या धोरणाशी हे सुसंगत आहे. आम्ही एक उत्कृष्ट निवासी समुदाय तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवू जे तेथील रहिवाशांसाठी दीर्घकालीन मूल्य निर्माण करेल.”

 

वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, मेट्रो आणि उपनगरीय रेल्वे स्थानकांपर्यंत उत्कृष्ट अॅक्सेससह ही जमीन अत्यंत महत्वाच्या ठिकाणी स्थित आहे. या ठिकाणाहून अनेक शाळा, आरोग्य सुविधा, रिटेल मॉल्स आणि मनोरंजन आउटलेट्ससह सु-विकसित सामाजिक आणि नागरी पायाभूत सुविधांमध्ये सहजी जाणे येणे शक्य आहे.

Related posts

अंबरनाथ: व्यवसायवाढ आणि उत्तम नागरी जीवनाचा परिपूर्ण मिलाफ*

Shivani Shetty

हावरे प्रॉपर्टीजचा बोरिवलीमध्ये अभिनव आणि परवडणारा’ प्रकल्प सुरू .

Shivani Shetty

Leave a Comment