maharashtraprimenews
ठळक बातम्या
बॉलीवूड

पठाण’चे छायाचित्रीकरण तसेच भव्य अॅक्शन प्रसंगांसाठी 8 देशांत भ्रमंती!’ : आपल्या प्रेक्षकांनी कधीही न अनुभवलेल्या अद्भूत दृश्यांसाठी पठाणच्या टीमने घेतलेल्या मेहनतीवर सिद्धार्थ आनंद यांचा खुलासा

आदित्य चोप्रा आणि सुप्रसिद्ध दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी प्रेक्षकांसाठी भारताची सर्वात मोठी साहसी कलाकृती पठाण’च्या स्वरूपात साकरण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली! यश राज फिल्म्स’चा भव्य साहसपट, पठाण हा त्यातील डोळे दिपवून टाकणाऱ्या प्रसंगांमुळे अद्वितीय ठरणार आहे. हा आदित्य चोप्रा यांच्या महत्त्वाकांक्षी हेरगिरी विश्वाचा भाग आहे. त्यात देशातील मातब्बर सुपरस्टार शाह रूख खान, दीपिका पदूकोण आणि जॉन अब्राहम झळकणार आहेत. धमन्यांतील रक्त गोठविणाऱ्या प्रसंगांनी संपन्न असलेला हा सिनेमा जगातील 8 देशांत चित्रित करण्यात आला असून मोठ्या पडद्यावर यापूर्वी कधीही न अनुभवलेली भव्यता त्यात अनुभवता येणार आहे. जगभरातील भारतीयांसाठी या सिनेमाच्या निमित्ताने एक इव्हेंट फिल्म तयार झाली आहे. सिनेमाच्या टीमने डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या अॅक्शन दृश्यांचे चित्रीकरण करण्यासाठी स्पेन, युएई, तुर्की, रशिया आणि सैबेरिया, इटली, फ्रान्स, भारत आणि अफगाणिस्तानची भ्रमंती केली.

सिद्धार्थ सांगतो, “माझ्या सिनेमांमध्ये लोकेशन फार मोठी भूमिका बजावतात आणि पठाणकरिता तर हे अतिशय महत्त्वपूर्ण ठरते आहे, कारण प्रेक्षकांनी यापूर्वी कधीही न घेतलेला भव्य अनुभव साकरण्याचं आमचे उद्दिष्ट होते. दृश्यांची ती उंची आणि वैविध्य साकारता यावं म्हणून आम्ही 8 देशांत सिनेमा त्याचप्रमाणे भव्य साहसी प्रसंगांचं चित्रीकरण केले!”

तो पुढे सांगतो, “पठाणमधील प्रत्येक दृश्य श्वास रोखून धरणारं असावे हे आम्ही पक्कं ठरवलं होतं आणि हे नियोजन गाठण्यासाठी आम्ही सावध पावलं उचलत होतो. पठाणच्या प्री-प्रॉडक्शनला साधारणपणे दोन वर्षे लागल्याचे मला आठवते, कारण भारतात आम्हाला अद्वितीय साहस अनुभवाची उंची विस्तारायची होती.”

सिद्धार्थ म्हणतो, “आम्ही जगातील काही दुर्गम आणि अतिशय उत्कृष्ट ठिकाणी चित्रीकरण केलं. जिथे आम्हाला थक्क करणारा परदेशी दृश्य अनुभव मिळाला. 25 जानेवारी रोजी जेव्हा पठाण चित्रपटगृहात प्रदर्शित होईल, त्यावेळी हा सिनेमॅटीक माईलस्टोन साकरण्याच्या आमच्या प्रयत्नावर प्रेक्षक नक्कीच प्रेम करतील.”

पठाण 25 जानेवारी 2023 रोजी हिंदी, तमीळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.

Related posts

अजित पवारांची फडणवीसांसोबत चर्चा; तर निरोपासाठी आलेल्या नार्वेकरांना शरद पवारांनी गाडीत बसवलं!

cradmin

अंगणवाडी सेविका प्रलंबित मागण्यांसाठी आक्रमक, मुख्यंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांना इशारा

cradmin

विकी कौशलचा सहभाग असलेला व्हायआरएफ’चा द ग्रेट इंडियन फॅमिली 22 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार!

Shivani Shetty

Leave a Comment