maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

९१ वर्षीय वयस्क रुग्ण आणि ७० वर्षीय महिलेवर अपोलोत पहिल्यांदा टीएव्हीआय प्रक्रिया केली दोन वरिष्ठ रुग्णांच्या हृदयावर ‘टीएव्हीआय’ प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली

नवी मुंबई, १७ एप्रिल २०२४ : अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई ( एएचएनएम) येथे दोन वरिष्ठ रुग्णांवर जटिल टीएव्हीआय प्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आली. जटिल मेडिकल उपचारांच्या दरम्यान एका ९१ वर्षे वयाच्या पुरुषावर शस्त्रक्रिया करण्यात येणार होती, तर दुसरीकडे एक ७० वर्षे वयाच्या महिलेला हृदयक्रिया बंद पडल्याने अनेक अंगे निकामी होण्याच्या अतिशय आणीबाणीच्या परिस्थितीला सामोरे जावे लागले होते. अपोलोच्या आरोग्य सेवा टीम्सच्या दृढनिश्चयी कामांमुळे दोघाही रुग्णांना जणू नवीन जन्म मिळाला. अतिशय जटिल अशा ट्रांस कॅथीटर एओर्टिक व्हॉल्व इम्प्लांटेशन (टीएव्हीआय) प्रक्रियेमध्ये दोघाही रुग्णांच्या हृदयातील व्हॉल्व बदलले गेले. टीएव्हीआय ची शस्त्रक्रिया पहिल्यांदा अशा रुग्णावर करण्यात आली ज्याला त्याचवेळी सीपीआर देण्यात येत होते, यामुळे हृदयरोगांसाठी उपचाराचे नवीन मानक अपोलोने स्थापित केले.

डॉ. राहुल गुप्ता, कार्डिओलॉजी-वरिष्ठ सल्लागार, अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई यांनी सांगितले,”नवी मुंबई येथे अशा प्रकारच्या पहिल्याच प्रकरणामध्ये डोंबिवलीच्या ७० वर्षे वयाच्या महिलेला ईआर मध्ये आणले गेले जिला श्वास घेण्यात खूप त्रास होत होता, रक्तदाब फार कमी होता, ऑक्सीजन सॅच्युरेशन फार कमी होते, शरीरातील अनेक अंगे निकामी होत होती, तिची हृदयक्रिया बंद पडत होती ज्यामुळे तिला सीपीआर आणि डीफिब्रिलेशनची गरज होती. चाचण्यांमध्ये कळले की तिचा एओर्टिक स्टेनोसिस फार गंभीर होता. रुग्णाच्या अशा गंभीर परिस्थितीमुळे आणि पारंपारिक ओपन-हार्ट शस्त्रक्रिया करणे योग्य नसल्यामुळे तिचा जीव वाचवण्यासाठी आणीबाणीमध्ये ट्रांसकॅथीटर एओर्टिक व्हॉल्व इम्प्लांटेशन (टीएव्हीआय) प्रक्रिया करण्यात आली. ही प्रक्रिया करत असताना रुग्णाला इनट्यूबेशन करून वाऱ्याचा प्रवाह सुरू ठेवला गेला, तसेच हृदयक्रिया बंद पडलेली असल्यामुळे सतत सीपीआर देणे सुरू होतेच. कोरोनरी धमनीमध्ये अडथळा येऊन गुंतागुंतीत भर पडण्याचा धोका असल्यामुळे आम्ही टीएव्हीआय प्रक्रिया करत असताना चिमनी स्टेंटिंग नावाच्या एका विशेष तंत्राचा वापर केला (धमन्यांमध्ये रक्ताचा प्रवाह सुरू ठेवण्यासाठी).”

               

डॉ. महेश घोगरे, कार्डिओलॉजी-सल्लागार, अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई यांनी सांगितले,“वाशी येथे राहणारे ९१ वर्षांचे श्री.गोविंद गाडेकर यांना अपोलो हॉस्पिटल्सच्या आपत्कालीन कक्षात (ईआर) आणण्यात आले होते. तपासणीत उघड झाले की, त्यांना गंभीर महाधमनी (एओर्टिक) स्टेनोसिस आहे. त्याचे वय लक्षात घेता, पारंपारिक हृदयाची शस्त्रक्रिया करणे शक्य नव्हते म्हणून लक्षणांच्या गंभीरतेमुळे त्यांच्यासाठी टीएव्हीआय करण्याचा सल्ला दिला गेला. ७० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या अनेक रुग्णांना एओर्टिक स्टेनोसिस हा आजार असतो, पण याचे निदान झालेले नसते. वरिष्ठ रुग्णांमध्ये श्वास घेण्यास एकसारखा त्रास होणे, चक्कर येणे, छातीत अस्वस्थ वाटणे, छातीत दुखणे आणि पाय सुजणे ही वय वाढल्याची लक्षणे मानली जातात. लोकांना हे कळले पाहिजे की जर ही लक्षणे सारखी येत असली, तर रुग्णाची नियमितपणे आणि संपूर्ण तपासणी हृदयविकारांसाठी झाली पाहिजे. अशा प्रकरणांमध्ये 2डी एको तपासणी फार महत्त्वाची असते कारण फक्त हृदयातील रक्तवाहिन्यांमधील ब्लॉक नाही, तर हृदयाच्या व्हॉल्वमधील ब्लॉक पाहणेसुद्धा महत्त्वाचे आहे. नव्वदीतील रुग्णाच्या यशस्वी टीएव्हीआय प्रक्रियेच्या प्रकरणी, हा रुग्ण ही प्रक्रिया करून घेणारा मुंबईतील सर्वात वयस्कर रुग्ण आहे, त्यांचे वय हेच जोखमीचे मोठे कारण असूनसुद्धा रुग्णाने चांगला प्रतिसाद दिला आणि त्यांची तब्येतही सुधारली. शहरी भागांमध्ये सीव्हीडी हा मोठ्या चिंतेचा विषय आहे त्यामुळे ४० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सर्वच लोकांनी नियमितपणे तपासण्या करून स्वतःच्या हृदयाचे आरोग्य समजून घेतले पाहिजे.”

श्री.गोविंद गाडेकर (रुग्ण) यांनी नमूद केले, “या प्रवासला चमत्काराशिवाय दुसरे नाव देता येणार नाही. हृदयक्रिया बंद पडल्याच्या अंधार कोठडीतून नवीन आशेचे किरण दाखवण्यासाठी मी अतिशय कुशल आणि कनवाळू असलेल्या अपोलो हॉस्पिटल्सच्या अविश्वसनीय अशा टीमचा नेहमी आभारी राहीन. माझ्या हृदयाचा प्रत्येक ठोका मला आठवण करून देतो की आयुष्य किती बहुमोल आहे आणि चिकाटीची ताकद किती आहे.”

Related posts

इन्शुरन्सदेखोची सीरिज बी फंडिंगमध्ये ६० दशलक्ष डॉलर्सची उभारणी

Shivani Shetty

आयडीपी एज्‍युकेशनचे बोरीवली येथे भारतातील त्‍यांच्‍या ७७व्‍या कार्यालयाचे उद्घाटन

Shivani Shetty

ऑडी इंडियाकडून आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्‍ये ३३ टक्‍के वाढीची नोंद

Shivani Shetty

Leave a Comment