maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

क्रिप्टो गुंतवणूकदारांनो असा भरा क्रिप्टो कर किंवा क्रिप्टो कर भरण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शिका

अनेक गुंतवणूकदारांच्या बाबतीत क्रिप्टोने त्यांचा महत्त्वाचा स्वारस्याचा विषय या पासून त्यांची लक्षणीय आर्थिक संपत्ती असे  स्थित्यंतर केले आहे. परंतु, त्याच्या वाढत्या लोकप्रियतेबरोबरच कर अधिकरणाकडून वाढत्या प्रमाणात पडताळणी देखील होते. क्रिप्टो व्यवहारांवर कर आकारणीसाठी भारत सरकारने स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे निर्दिष्ट केली आहेत. आर्थिक वर्ष २०२३-२४ (मूल्यांकन वर्ष २०२४-२५) साठी आयकर परतावा फाईल करण्याची अंतिम तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसे क्रिप्टो गुंतवणूकदारांनी कर फाइल करण्याच्या प्रक्रियेसाठी व्यवस्थित तयार असणे अत्यावश्यक आहे. क्रिप्टो कर भरणा करण्यासाठी आवश्यक बाबींची विस्तृत माहिती वझीरएक्सचे उपाध्यक्ष राजगोपाल मेननयांनी दिली आहे.

कर फॉर्म्स बद्दल समजून घेणे: पहिली पायरी म्हणजे, फाइल करण्यासाठी योग्य आय कर परतावा म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) कोणता हे ठरवणे गरजेचे आहे. क्रिप्टोकरन्सीज आणि व्हर्च्युअल डिजिटल असेट्स (व्हीडीए) यांच्या हस्तांतराद्वारे मिळालेले उत्पन्न घोषित करण्यासाठी व्यक्तींनी आयटीआर-२ किंवा आयटीआर-३ वापरला पाहिजे.  या फॉर्म्स मध्ये शेड्युल व्हर्च्युअल डिजिटल असेट्स (शेड्युल व्हीडीए) नावाचा एक, केवळ त्यासाठीच बनवलेला विभाग असतो ज्यात क्रिप्टो व्यवहारांचे तपशील देणे आवश्यक असते.

  • आयटीआर-२: हा व्हीडीए मधून कमावलेला भांडवली नफा आणि कोणतेही व्यावसायिक उत्पन्न नसलेल्या व्यक्तींसाठी योग्य आहे.
  • आयटीआर-३: हा उद्योग किंवा व्यावसायिक उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींसाठी तयार करण्यात आला आहे ज्यात व्हीडीए किंवा इतर कोणत्याही उद्योगातील उत्पन्न सामिल आहे.

शेड्युल व्हर्च्युअल डिजिटल असेट्स (शेड्युल व्हीडीए): या शेड्युलमध्ये सर्व व्हीडीए व्यवहारांची माहिती देणे अनिवार्य आहे ज्यात अधिग्रहण दिनांक, विक्री दिनांक, विक्री मूल्य, अधिग्रहण खर्च आणि नफा व तोट्याच्या रक्कमा समाविष्ट आहेत. नफ्यावरील कर दायित्व निश्चित करणे व कर नियमनांचे पालन करण्यासाठी शेड्युल व्हीडीए मध्ये अचूक माहिती भरणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

कर दायित्वाची गणना: क्रिप्टो नफ्यावरील कर दायित्वाची गणना हे साधे अंकगणित आहे: विक्री मूल्यातून अधिग्रहणाचा खर्च वजा करा. यातून मिळणाऱ्या नफ्यावर ३०% थेट कर लावला जातो. नफा किंवा तोटा यांची अचूक गणना आणि कर दायित्व निश्चित करण्यासाठी व्यवहारांची तपशीलवार नोंद महत्त्वाची आहे.

विविध व्यवहारांसाठी विशिष्ट कर परिणाम: क्रिप्टो व्यवहारांच्या विविध प्रकारांवर विशिष्ट कर प्रावधाने लागू होतात.

  • ती भारतीय रुपयांत केली जाते तेव्हा क्रिप्टोकरन्सीजची खरेदी सामान्यत: कर-मुक्त असते . परंतु, व्यावसायिक-ते-व्यावसायिक किंवा विदेशी विनिमयांद्वारे ती केली तर १% टीडीएस (स्त्रोतावर कर वजावाट) लागू होतो.
  • क्रिप्टोकरन्सीजच्या विक्रीतील नफ्यावर ३०% कर आणि व्यवहारावर १% टीडीएस लागू होतात.
  • मालकी अबाधित राहिली तर वॉलेट हस्तांतरणे कर-मुक्त असतात कारण हा वाणिज्य व्यवहार नाही.
  • एअरड्रॉप्स व फोर्क्स प्राप्तकर्त्याच्या हाती ३०% करास पात्र असतात.
  • लगेच जवळच्या कुटुंब सदस्यांकडून प्राप्त किंवा रु ५०,००० पेक्षा कमी (त्याच आर्थिक वर्षादरम्यान)  मूल्याच्या क्रिप्टो भेटी कर-मुक्त आहेत. ही मर्यादा ओलांडणाऱ्या धनराशी प्राप्तकर्त्याच्या हाती आयकरास पात्र ठरतात.
  • मायनिंग व स्टेकिंग रिवॉर्ड्सवर लागू दरांनुसार कर आकारला जातो व रिवॉर्ड्स विकण्यावर किंवा वापरण्यावर ३०% कर आकारणी केली जाते.

क्रिप्टो तोट्याची हाताळणी: व्हीडीएच्या हस्तांतराद्वारे होणारा तोटा कोणत्याही उत्पन्नाच्या बदल्यात सेट ऑफ करता येत नाही ज्यामुळे त्यांची नोंदणी शून्य म्हणून करावी लागते. याचा अर्थ असा की जरी एक बिटकॉइन विकताना नफा व दुसरे विकताना तोटा झाला तरीही केवळ एका टोकनवर झालेल्या नफ्यावर सरकारला ३०% कर देय होतो.

रिपोर्टिंग व अनुपालन: व्यवहारांची अचूक नोंद ठेवणे, क्रिप्टोसंपत्तीचे वर्गिकरण ठरवणे आणि सतत बदलत्या कर नियमनांबद्दल अद्ययावत माहिती ठेवणे या बाबी कर रिपोर्टिंग व अनुपालनासाठी आवश्यक आहेत. आय कर विभागाकडून दंड टाळण्यासाठी भांडवली नफा अचूकपणे घोषित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

क्रिप्टो कर फायलिंगसाठी आवश्यक रिपोर्ट्स/अहवाल:करदात्यांसाठी आवश्यक असणारे तीन रिपोर्ट्स आहेत.

  • संपूर्ण व्यापार रिपोर्ट/कंप्लीट ट्रेडिंग रिपोर्ट: हा रिपोर्ट सर्व क्रिप्टो खरेदी व विक्रीचा सर्वसमावेशक एकंदर सारांश देतो.
  • नफा व तोटा रिपोर्ट: हा रिपोर्ट क्रिप्टो संपत्तीच्या व्यवहारांतून मिळालेला नफा व तोटा रिपोर्ट करण्यासाठी विशेषत: तयार करण्यात आला आहे.
  • इतर लाभ रिपोर्ट हा रिपोर्ट क्रिप्टो अवकाशातील डेरिव्हेटिव्ह्ज आणि नफा-व-तोटा मिळवणारी उत्पादने यांच्यासाठी हा रिपोर्ट वापरला जातो.

क्रिप्टो कर फायलिंग चेकलिस्ट:

  • योग्य आयटीआर फॉर्म निवडा: आयटीआर-२ किंवा आयटीआर-३ निवडा
  • व्यवहारांचे तपशील गोळा करासंबंधित अधिग्रहण दिनांक, विक्री दिनांक, विक्री मूल्य आणि अधिग्राह्ण खर्च यांचे सर्वसमावेशक तपशील मिळवा.
  • संपूर्ण शेड्युल व्हीडीए: निवडलेल्या आयटीआर फॉर्मच्या शेड्युल व्हीडीए मध्ये क्रिप्टो व्यवहार अचूकपणे रिपोर्ट करा.
  • कर दायित्वाची गणना करा: नफा किंवा तोट्याचा हिशेब करा आणि क्रिप्टो नफ्यावर ३०% दर थेट लागू करा
  • टीडीएस वजावट तपासा: तुमच्या क्रिप्टो व्यापारावरील टीडीएस तपासा आणि फॉर्म २६ एएस मध्ये ती वजावट दिसते याची खात्री करा. अंतिम कर दायित्व निश्चित करताना टीडीएस कपातीवर अचूक दावा करा.

Related posts

पुणेस्थित डिजिकोअर स्टुडिओजने घडवला इतिहास

Shivani Shetty

हिरो मोटोकॉर्पच्‍या करिझ्मा एक्‍सएमआरला मिळाला १३,६८८ बुकिंग्‍जचा प्रतिसाद

Shivani Shetty

५ कारणे किया सोनेट एचटीके+ यादीत अव्वल आहे

Shivani Shetty

Leave a Comment