गुरूग्राम आणि हैदराबाद, भारत, एप्रिल २५, २०२४: नेस्ले इंडिया लिमिटेड (बीएसई: ५००७९०, एनएसई: NESTLEIND) (यापुढे उल्लेख ‘नेस्ले इंडिया’) आणि डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेड (बीएसई: ५००१२४, एनएसई: DRREDDY, NYSE: RDY, NSEIFSC: DRREDDY) (सर्व उपकंपन्यांसह यापुढे उल्लेख ‘डॉ. रेड्डीज’ केला जाईल) (तसेच दोघांचा एकत्रित उल्लेख ‘जेव्ही पार्टनर्स’ असा केला जाईल) या दोन्ही कंपन्यांनी मिळून जॉइंट व्हेंचर (‘जेव्ही कंपनी’) काढण्यासाठी एका निश्चित करारात प्रवेश केल्याची घोषणा आज केली. भारतातील तसेच सहमतीने निश्चित झालेल्या अन्य प्रदेशांतील ग्राहकांसाठी नवोन्मेष्कारी न्युट्रास्युटिकल ब्रॅण्ड बाजारात आणण्याच्या उद्दिष्टाने ही जेव्ही कंपनी स्थापन केली जात आहे. या भागीदारीमुळे नेस्ले हेल्थ सायन्सेसच्या, (एनएचएससी) पोषण आरोग्य उत्पादनांच्या आणि जीवनसत्त्वे, क्षार, हर्बल्स व पूरके यांच्या जागतिक स्तरावर सुप्रसिद्ध श्रेणीला डॉ. रेड्डीजच्या भारतातील भक्कम व सुस्थापित व्यावसायिक बलस्थानांची जोड मिळणार आहे. जेव्ही पार्टनर्सना त्यांची बलस्थाने एकत्र आणण्यासाठी आणि मेटाबॉलिक, हॉस्पिटल न्युट्रिशन, जनरल वेलनेस, स्त्रियांचे आरोग्य व मुलांचे पोषण अशा प्रवर्गांमध्ये पूरक न्युट्रास्युटिकल्सचा पोर्टफोलिओ भारतभरातील ग्राहकांना डोळ्यापुढे ठेवून वाढवण्यासाठी हे जॉइंट व्हेंचर उपयुक्त ठरणार आहे.
या जेव्ही कंपनीचे मुख्यालय हैदराबाद येथे असेल. नेस्ले समूह आणि डॉ. रेड्डीज या दोघांच्या क्षमतांचा तसेच सेवांचा लाभ ही जेव्ही कंपनी घेईल.
जेव्ही पार्टर्नसद्वारे जेव्ही कंपनीला निवडक ब्रॅण्ड्सचा परवाना दिला जाईल. नेस्ले समूह नेचर्स बाउंटी, ऑस्टिओ बाय–फ्लेक्स, ईस्टर–सी, रिसोर्स हाय प्रोटीन, ऑप्टिफास्ट, रिसोर्स डायबेटिक, पेप्टामेन, रिसोर्स रेनल आणि रिसोर्स डायलिसिस या ब्रॅण्ड्सचा परवाना जेव्ही कंपनीला देईल. डॉ. रेड्डीजतर्फे पोषण प्रवर्गातील रिबॅलन्झ, सेलेविडा, अँटॉक्सिड, किडरिच–डी3, बेकोझिंक या ब्रॅण्ड्सचा तसेच ओटीसी विभागाचा परवाना जेव्ही कंपनीला दिला जाईल. ही जेव्ही कंपनी आर्थिक वर्ष २५च्या दुसऱ्या तिमाहीत कार्यात्मक होणे अपेक्षित आहे.
नेस्ले इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. सुरेश नारायणन या जॉइंट व्हेंचरबद्दल म्हणाले, “डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेडसोबत आम्ही जॉइंट व्हेंचर करत आहोत, हे सांगताना मला खूप आनंद होत आहे. प्रभावी ब्रॅण्ड्स आणि उत्पादनांच्या माध्यमातून ग्राहकांच्या आयुष्यामध्ये मूल्यवर्धनाचा प्रयत्न करण्याचा प्रवास आम्ही सुरू केला आहे. हे जॉइंट व्हेंचर हे त्याच दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. त्यामुळे आम्ही देशातील अधिकाधिक ग्राहकांपर्यंत विज्ञानाधारित पोषण उत्पादने पोहचवू शकू. डॉ. रेड्डीज हे औषधनिर्माण क्षेत्रातील विश्वासार्ह नाव आहे. ग्राहकांना उच्च दर्जाची उत्पादने पुरवण्याप्रती जी बांधिलकी आम्ही मानतो, तीच बांधिलकी डॉ. रेड्डीजही मानते. हे जॉइंट व्हेंचर आम्हाला एक ठोस रिटेल व वितरण जाळे तयार करण्याची क्षमता देईल. त्यामुळे आमचे ब्रॅण्ड्स ग्राहकांपर्यंत अधिक प्रमाणात पोहोचतील आणि त्यांच्या आयुष्याचा दर्जा सुधारण्याच्या दृष्टीने अर्थपूर्ण बदल घडवून आणतील.”
डॉ. रेड्डीजच्या ब्रॅण्डेड मार्केट्स (भारत व उदयोन्मुख बाजारपेठा) विभागाचे सीईओ एम. व्ही. रमणा म्हणाले, “चांगले आरोग्य हे सामाईक उद्दिष्ट घेऊन काम करणाऱ्या दोन कंपन्यांचा नावीन्यपूर्ण प्रकल्प म्हणजे हे जॉइंट व्हेंचर आहे. नेस्ले हेल्थ सायन्सेसच्या जागतिक पोर्टफोलिओतील नवोन्मेष भारतातील ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने नेस्ले इंडियासोबत भागीदारी करत असल्याचा आम्हाला आनंद वाटतो. दोन्ही पालक कंपन्यांची परस्परपूरक बलस्थाने उपयोगात आणणाऱ्या या नावीन्यपूर्ण प्रकल्पामुळे ग्राहकांना उत्पादने अधिक चांगल्या पद्धतीने तसेच परवडण्याजोग्या दरात उपलब्ध करून देण्याची मुभा आम्हाला मिळणार आहे.”
For more information – Nestlé India
Ambereen Ali Shah, ambereen.shah@in.nestle.com, +91 9717022731
Amit Kumar Roy, amitkumar.roy@in.nestle.com, +91 8447737626
Nestlé India Limited, Head Office: Nestlé House, Jacaranda Marg, M Block, DLF City Phase – II, Gurugram 122 002 (Haryana)
Registered Office: 100 / 101, World Trade Centre, Barakhamba Lane, New Delhi – 110001,
Corporate Identity Number: L15202DL1959PLC003786
Email ID: ambereen.shah@in.Nestle.com / amitkumar.roy@in.Nestle.com (with a CC to media.india@in.Nestle.com); investor@in.Nestle.com,
Website: www.Nestle.in