मुंबई, २९ एप्रिल २०२४: इझमायट्रिप डॉटकॉम या भारतातील आघाडीच्या ट्रॅव्हल टेक प्लॅटफॉर्मने आपल्या व्यासपीठावरून प्रत्यक्ष शुल्क मुक्त शॉपिंगचा अनुभव देण्यासाठी अदानी डिजिटल लॅब्स (एडीएल) सोबत धोरणात्मक सहयोग केला आहे. यामुळे पर्यटकांना त्यांच्या ट्रॅव्हल नियोजनाचा भाग म्हणून सोईस्कर व लक्झरीअस अनुभव मिळेल. ग्राहक इझमायट्रिप.अदानीवन.कॉम या लिंकच्या द्वारे इझमायट्रिपच्या वेबसाइटवरील एअरपोर्ट सर्विसेस पेजच्या माध्यमातून प्रत्यक्ष प्री-ऑर्डर करत या सेवेचा लाभ घेऊ शकतात.
सध्या भारतातील अमृतसर, अहमदाबाद, जयपूर, लखनौ, मंगळुरू, मुंबई आणि तिरूवनंतपुरूम येथील सात प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळांवर उपलब्ध असलेली ही सेवा उत्पादनांच्या विशेष श्रेणीसह अतिरिक्त सूट देते, ज्यामुळे एकूण प्रवास अनुभव उत्साहित होतो.
इझमायट्रिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. निशांत पिट्टी म्हणाले, ”इझमायट्रिपमध्ये आमचे ग्राहकांच्या गरजांना प्राधान्य देण्याचे आणि त्यांचा प्रवास अनुभव अधिक उत्साहित करण्याचे मुलभूत तत्त्व राहिले आहे. हा सहयोग आमची कटिबद्धता अधिक दृढ करण्याच्या दिशेने प्रयत्न आहे, जेथे आमचा देशातील प्रवासाची सर्वात मोठी फॅसिलिटेटर असण्याचा मनसुबा आहे. आमच्या प्लॅटफॉर्ममध्ये विविध विमानतळांवरील शुल्क मुक्त शॉपिंगच्या सोयीसुविधेला एकत्र करत आम्ही शॉपिंग अनुभव सुलभ करण्यासोबत भारतीय प्रवाशांना स्मार्टर, अधिक रिवॉर्डिंग सोल्यूशन्ससह सक्षम देखील करत आहोत.”
अदानी डिजिटल लॅब्सचे प्रवक्ता म्हणाले, ”या सहयोगामधून प्रवाशांना सर्व टचपॉइण्ट्सवर विनासायास अनुभव देण्याप्रती आमचा दृष्टिकोन दिसून येतो. इझमायट्रिपच्या प्लॅटफॉर्मवर समाविष्ट करण्यात आलेली ही आधुनिक शुल्क-मुक्त सेवा भारतीय प्रवाशांना अधिक सोयीसुविधा देईल. आम्ही उद्योगामध्ये विकास व नाविन्यतेला गती देण्यासाठी या धोरणात्मक सहयोगाचा फायदा घेत डिजिटल युगात ट्रॅव्हल कॉमर्सचे भविष्य घडवण्यास सज्ज आहोत.”