मुंबई, १५ डिसेंबर २०२३: बेंगळुरू-स्थित ओसी अकॅडमी या वैद्यकीय व्यावसायिकांसाठी आघाडीच्या अपस्किलिंग ऑनलाइन प्लॅटफॉर्मने भारतात ऑनलाइन पोस्टग्रॅज्युएट डिप्लोमा प्रोग्राम्स लाँच करण्यासाठी क्वीन मेरी युनिव्हर्सिटी ऑफ लंडन, यूके येथील फॅकल्टी ऑफ मेडिसीन अॅण्ड डेण्टिस्ट्रीसोबत सहयोग केला आहे. या सहयोगामधून जागतिक दर्जाचे आरोग्यसेवा शिक्षण मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्याप्रती त्यांची संयुक्त कटिबद्धता दिसून येते.
ओसी अकॅडमी अंतर्गत आरोग्यसेवा व्यावसायिकांच्या सर्वात मोठ्या नेटवर्कसह हा सहयोग क्वीन मेरीला तिची प्रतिष्ठा वाढवण्याची, अत्याधुनिक डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून भारतातील स्थापित संबंधांचा फायदा घेण्याची अद्वितीय संधी देतो. यूकेमध्ये शिक्षण घेत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी टॉप रसेल ग्रुप युनिव्हर्सिटी गंतव्य असलेल्या क्वीन मेरीच्या प्रबळ पायामुळे हा सहयोग करण्यात आला आहे.
मुंबईमध्ये नुकतेच यूके-इंडिया हेल्थकेअर ट्रेड मिशन येथे करारावर अंतिम स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. याप्रसंगी महामहिम ट्रेड कमिशनर (साऊथ एशिया) व वेस्टर्न इंडियाचे ब्रिटीश उप उच्चायुक्त हरजिंदर कांग आणि एनएचएस इंग्लंडसाठी नॅशनल मेडिकल डायरेक्टर प्रोफेसर सर स्टिफन पोविस यांच्यासह ग्लोबल एंगेजमेंटसाठी डीन प्रोफेसर रिचर्ड ग्रोस व क्वीन मेरी युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमधील डिजिटल एज्युकेशनसाठी डीन प्रोफेसर ची अदाची आणि ओसी अकॅडमीचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. बाळू रामचंद्रन यांनी उपस्थिती दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
ओसी अकॅडमीचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) श्री. बाळू रामचंद्रन म्हणाले, “आमचे डॉक्टरांना दर्जेदार शिक्षणासह सक्षम करण्याचे मिशन आहे, ज्यामुळे त्यांची कौशल्ये व ज्ञान अधिक निपुण होईल, परिणामत: रूग्ण केअरमध्ये सुधारणा होईल. आम्हाला विश्वास आहे की, आमचे व्यासपीठ क्वीन मेरीसोबत सहयोगाने जागतिक मानकांची पूर्तता करण्यासाठी भारतातील आरोग्यसेवा शिक्षणामध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणेल.”
महामहिम ट्रेड कमिशनर (साऊथ एशिया) व वेस्टर्न इंडियाचे ब्रिटीश उप उच्चायुक्त हरजिंदर कांग म्हणाले, “मला क्यूएमयूएल आणि ओसी अकॅडमी यांचे हा महत्त्वाकांक्षी व उच्च दर्जाचा पदव्युत्तर डिप्लोमा प्रोग्राम तयार करण्याप्रती प्रयत्न पाहून आनंद होत आहे. हा नवीन प्रोग्राम अनेक भारतीय डॉक्टरांना व परिचारीकांना यूकेप्रमाणे सर्वोत्तमता व सर्वोत्तम पद्धतींचे शिक्षण व प्रशिक्षण देण्यामध्ये साह्यभूत ठरेल.”