मुंबई, ७ डिसेंबर २०२३- जागतिक आरोग्यसेवा कंपनी अॅबॉट मेनोपॉज या विषयावरील समाजात असलेली उदासीनता दूर करण्यासाठी विविध मार्ग शोधण्याच्या दृष्टीने दि नेक्स्ट चॅप्टर मोहिमेला सुरूवात करणार आहे. या वर्षी मेनोपॉजबाबत अर्थपूर्ण संवाद साधणे शक्य होण्यासाठी कंपनीने एक सोपा आणि सहभागात्मक संवाद स्टार्टर ‘रियल, मेडअप ऑर माइनॽ’ हा मुंबई येथे आयोजित एका कार्यक्रमात आणला. मागच्या वर्षीच्या मोहिमेच्या उद्घाटनाचा भाग असलेल्या माजी मिस युनिव्हर्स, अभिनेत्री आणि उद्योजिका लारा दत्ता यांनी चर्चेत सहभाग घेतला आणि मेनोपॉजबाबतच्या मतांना बदलण्यास आणि खुल्या चर्चेला पाठिंबा दिला.
हा कार्यक्रम अॅबॉटच्या दि नेक्स्ट चॅप्टर (The Next Chapter) या २०२२ मधील भारत, चीन, ब्राझील आणि मेक्सिकोमधील मेनोपॉजमधून जाणाऱ्या महिलांच्या खऱ्या अनुभवांवर आधारित कथांच्या कलेक्शनपासून एक पाऊल पुढे जाणारा आहे. नात्यांवर आणि करियरवर हार्मोनल बदलांच्या परिणामापासून ते आरोग्य आणि स्वप्रतिमेवरील होणाऱ्या प्रभावापर्यंत प्रत्येक महिलेची कथा ही जास्तीत जास्त महिलांना आपल्या अनुभवांबाबत चर्चा करण्यासाठी,अधिक मुक्तपणे मेनोपॉजवर बोलण्यासाठी आणि कुटुंब तसेच मित्रांकडून मदत मिळवण्यासाठी प्रोत्साहित करणारी आहे.
अॅबॉटच्या मेडिकल अफेअर्स प्रमुख डॉ. रोहिता शेट्टी म्हणाल्या की,“एक स्त्री मेनोपॉजदरम्यान ज्या अत्यंत कठीण आणि मोठ्या बदलांमधून जात असते ते पाहता त्यांना तसेच त्यांच्या आजुबाजूच्या लोकांना या टप्प्याचे व्यवस्थापन चांगल्या रितीने कसे करायचे हे समजून घेण्यास मदत करणे महत्त्वाचे आहे. आमच्या मते मेनोपॉजबाबत चर्चा करणे आणि विश्वासार्ह माहितीची देवाणघेवाण हे महिलेसाठी आयुष्याच्या या टप्प्यात अधिक पूर्णपणे जगण्यासाठी आवश्यक ती मदत मिळवण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल आहे.”
‘रियल, मेड अप ऑर माइनॽ’ चा हेतू दोन प्रकारच्या कार्डांचा वापर करून संवाद सुरू करण्याचा आहेः परिस्थिती दर्शवणारे कार्ड चर्चा सुरू करण्याच्या दृष्टीने असून नेक्स्ट चॅप्टर या संपादित केलेल्या सत्यकथांवर आधारित आहे. तर स्टोरी कार्ड हे मेनोपॉज आणि एकूणच आरोग्याबाबत संवाद सुरू करण्याच्या दृष्टीने खुल्या प्रश्नांसह असेल. थोडक्यात कार्ड दाखवून माहिती सांगितल्यानंतर काही वक्ते आणि काही प्रेक्षक सदस्य मेनोपॉज आणि त्याचा आपल्या आयुष्यातील विविध बाबींवर कसा परिणाम होतो याबाबत माहितीपूर्ण आणि स्वारस्यपूर्ण चर्चा करतील.
लारा दत्ता म्हणाल्या की, “मी अत्यंत सक्षम महिलांच्या कुटुंबात वाढलेली आहे. तिथे विविध प्रश्न आणि कठीण विषयांवर खुली चर्चा होत असे आणि त्यावर उपाय काढले जात असत. मला आशा वाटते की, अॅबॉटच्या नेक्स्ट चॅप्टर उपक्रमासोबत फक्त महिलाच नाही तर त्यांचे मित्र आणि कुटुंब यांनादेखील मेनोपॉजबाबत अगदी सहजपणे चर्चा करता येईल. हा संवाद होणे ही महिलांसाठी त्यांच्या आरोग्यावर नियंत्रण प्राप्त करण्यासाठी आवश्यक ती माहिती आणि आत्मविश्वास मिळवण्याचा एक मार्ग आहे.”
लारा दत्ता, पी. डी. हिंदुजा आणि ब्रीचकँडी हॉस्पिटल्समधील सल्लागार प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ आणि फेडरेशन ऑफ ऑबस्टेट्रिक अँड गायनॅकोलॉजिकल सोसायटीज ऑफ इंडिया (फॉगसी)च्या माजी सचिव डॉ. नोझेर शेरियर, सूर्या ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स मुंबईच्या सल्लागार प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ आणि फेडरेशन ऑफ ऑबस्टेट्रिक अँड गायनॅकोलॉजिकल सोसायटीज ऑफ इंडिया (फॉगसी)च्या माजी अध्यक्ष डॉ. सुचित्रा पंडित, आणिअॅबॉट इंडियाच्या मेडिकल अफेअर्स विभागप्रमुख डॉ. रोहिता शेट्टीयांनी महिलांच्या मेनोपॉजच्या अनुभवांबाबत, लोकांमध्ये जागरूकतेची स्थिती आणि सामाजिक सहाय्याची आवश्यकता या विषयांवरील चर्चा पुढे नेली. या चर्चासत्राचे संयोजन शीदपीपलच्या संस्थापक शैली चोप्रा यांनी केले.
भारतीय महिलांचा मेनोपॉज सामान्यतः वयाच्या ४६व्या वर्षी येतो. हा पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत किमान पाच वर्षे आधी आहे.[ii]मेनोपॉजचा त्यांच्या कुटुंब आणि सामाजिक आयुष्यावर, काम,रोजची कार्ये तसेच इतर बाबींवर विविध प्रकारचा परिणाम होतो.अॅबॉट आणि इप्सोस सर्वेक्षणातून हे दिसून आले की, जवळपास ८० टक्के महिलांच्या मते मेनोपॉज त्यांच्या वैयक्तिक आरोग्यावर मोठा परिणाम करतो[iii]. मेनोपॉजचा महिलेच्या मानसिक आरोग्य आणि समजूतदारपणावरही परिणाम होतो. त्यांना नैराश्य, चिंता किंवा चिडचिड, एकाग्रता कमी होणे, झोप कमी होणे आणि स्मरणशक्तीच्या समस्या अशा गोष्टी जाणवतात[iv].
मोठ्या प्रमाणावर जागरूकता निर्माण झाल्यास जास्तीत जास्त महिला आपला खरा अनुभव व्यक्त करू शकतात. पण त्याचवेळी कुटुंबातील सदस्य, मित्र आणि सहकाऱ्यांना संवादात सहभागी होण्यास प्रोत्साहित करणेदेखील तेवढेच महत्त्वाचे आहे. ते महिलांसाठी जवळचे वातावरण आहेत आणि त्यांना माहितीने सुसज्ज केल्यास त्यांना आधार मिळेल आणि संवाद साधणे शक्य होईल. अॅबॉटच्या सर्वेक्षणातून हेही दिसून आले आहे की, ९१ टक्के पतीना जास्तीत जास्त महिलांनी मेनोपॉजबद्दल बोलले पाहिजे असे वाटते, जेणेकरून जागरूकता निर्माण होऊ शकेल[v].
लक्षणांबाबत बोलायचे झाल्यास अनेक महिलांना सामान्यतः असलेली लक्षणे माहीत असतात. परंतु त्या तात्काळ डॉक्टरशी संवाद साधू इच्छित नाहीत. ज्या महिलांनी स्त्रीरोगतज्ञांना भेट दिलेली आहे त्यातील सुमारे ९३ टक्के महिलांनी लक्षणे दिसल्यानंतर साधारण तीन महिने किंवा जास्त काळाने डॉक्टरला भेट दिली आहे[vi]. महिलांना मेनोपॉजची लक्षणे समजून घेऊन त्यांचे व्यवस्थापन उत्तमरित्या करता येण्यासाठी अॅबॉटने मेनोपॉज रेटिंग स्केलदेखील आणली आहे. या साधनामुळे महिलांना मेनोपॉजची चिन्हे समजून घेणे आणि त्यांचे व्यवस्थापन चांगल्या रितीने करणे शक्य होईल. तसेच डॉक्टरांना उपचारांबाबत निर्णय घेऊन महिलांना मेनोपॉज आणि त्यानंतरच्या आयुष्यातील बदलांना सामोरे जाण्यासाठी जीवनशैलीतील बदल सांगणे शक्य होऊ शकेल.
अॅबॉटचा डिजिटल संवाद स्टार्टर आणि अतिरिक्त मेनोपॉज स्त्रोत त्यांच्या वेबसाइटवर म्हणजे The Next Chapter – Womenfirstउपलब्ध असेल. महिलांना आपली लक्षणे मेनोपॉज रेटिंग स्केलवरदेखील तपासता येतील: Menopause Rating Scale.