maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

वझीरएक्सचे १ अब्ज पेक्षा जास्त वापरकर्त्यांसह २०२३ वर्षाचे समापन

मुंबई, २१ डिसेंबर २०२३: भारतातील आघाडीचा क्रिप्टो एक्स्चेंज वझीरएक्सने २०२३ साठीचा वार्षिक व्यापार कार्याचा रिपोर्ट सादर केल्याची घोषणा केली, ज्यामध्ये वापरकर्त्यांची वाढ, डिजिटल मालमत्ता मालकी आणि क्रिप्टोकरन्सी मार्केटला आकार देणाऱ्या विविध प्रमुख जागतिक घडामोडींचे चिंतन करणारी जिज्ञासावर्धक अंतर्दृष्टी प्रकट होते. वझीरएक्सने त्याच्या क्रिप्टो एक्सचेंज प्लॅटफॉर्मवर अंदाजे सहा लाख नवीन वापरकर्त्यांची प्रभावी भर घातली असून १ अब्ज पेक्षा जास्त वापरकर्त्यांसह २०२३ वर्षाचे समापन केले आहे.

वझीरएक्सचे उपाध्यक्ष राजगोपाल मेनन म्हणाले, “विकेंद्रित प्रणाली आणि परिपक्व होत असलेल्या ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या आगमनाने, क्रिप्टोकरन्सी अनिश्चित मालमत्तेच्या पलीकडे विकसित होत आहेत, सप्लाय चेन मॅनेजमेंट, आरोग्यसेवा आणि डिजिटल ओळख यांमध्ये एकीकरण होत आहे. जगभरात, डिजिटल फिएट चलनांची ओळख वाढत आहे आणि सीबीसीडीज लक्षणीय लक्ष वेधण्यासाठी आणि अंगिकारले जाण्यासाठी सज्ज आहेत. मालमत्ता टोकनायझेशन महत्त्वाचा कल बनण्यास सज्ज आजे आणि आपण वास्तव जगातील मालमत्ता व कला ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म्स मध्ये स्थित्यंतर करतान पाहत आहोत, ते अधिक व्यापक प्रेक्षकांसाठी आंशिक मालकी आणि गुंतवणूक संधींच्या लोकशाहीकरणाकडे वाटचाल करत करत आहेत. २०२४ मध्ये वेब३ तंत्रज्ञानातील वापरकर्त्यांचे अनुभव क्रांती पाहतील आणि बिटकॉइन निम्मे होणे आगामी काळात बुल मार्केटचे संकेत देते.”

क्रिप्टो मार्केट सारांश: वापरकर्त्याच्या वर्तणुकीच्या विश्लेषणानंतर असे दिसून आले की वझीरएक्सच्या एक्सचेंजवर व्यापार केलेली सर्वोच्च टोकन्स बिटकॉइन (बीटीसी), शिबा इनु (शिब), रिप्पल (एक्सआरपी), इथेरियम (ईटीएच) व पॉलीगोन (मॅटिक) होती. नजरेस आलेले मागील वर्षांचे कल आणि प्रकार शिबा इनू बद्दल वापरकर्त्यांची आत्मीयता दर्शवितात, जे बिटकॉइनसह, वझीरएक्स च्या एक्सचेंजवर उत्कृष्ट कामगिरी करणारे टोकन म्हणून उदयास आले. रिपोर्टमध्ये असेही नमूद केले आहे की तुलनेने कमी सक्रिय बाजार वातावरण असूनही, वापरकर्ते सतत टोकन्समध्ये गुंतून राहतात. जागतिक क्रिप्टो एक्सचेंजेसच्या त्यांच्या प्लॅटफॉर्मवरील व्यापारांबद्दल हा रिपोर्ट सूचित करतो की क्रिप्टो बाजारातील व्यवहारांना आकार देण्यात बाजाराची भीती, अनिश्चितता, शंका आणि सोशल मीडिया महत्त्वाची भूमिका बजावतात.

वापरकर्ता अंतर्दृष्टी: अहवालातील अंतर्दृष्टीत असे दिसून आले की उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात आणि हरियाणा ही भारतीय राज्ये सर्वाधिक व्यापारी असणारी आहेत, तर सर्वाधिक व्यापाराचा आकार असलेली राज्ये तामिळनाडू, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि हरियाणा आहेत. एक्सचेंजवरील सर्वोच्च टोकनचे, सर्वाधिक व्यापारी २६-४० वयोगटातील होते. प्लॅटफॉर्मवरील एकूण व्यापाराच्या आकारापैकी २२% महिला आहेत आणि २१-४० वर्षे वयोगटातील महिला, सर्व महिला वापरकर्त्यांनी केलेल्या एकूण व्यापाराच्या ८३% आहेत. पुरुषांच्या बाबतीत, प्लॅटफॉर्मवरील सर्व पुरुष वापरकर्त्यांपैकी २१-४० वर्षे वयोगटातील ७६% सदस्य आहेत. विशेष म्हणजे, हरियाणा आणि पश्चिम बंगालमधील एकूण व्यवहारांमध्ये महिलांनी पुरुषांना मागे टाकले आहे.

२०२३ पासून मार्केटच्या ठळक बाबी: वझीरएक्स च्या वार्षिक अहवालात गाला, पॉलीगॉन, गिफटो, रिप्पल यासारख्या लोकप्रिय टोकन्सवरील अंतर्दृष्टीसह, जागतिक क्रिप्टो मार्केटच्या सद्य हालचालींचा खुलासा करण्यात आला आहे. ड्वेन जॉन्सन आणि मार्क वाहलबर्ग यांच्यासोबत भागीदारी घोषणांसह, मोठे खर्च कमी करण्यासाठी टोकनॉमिक्सच्या पुनरावृत्तीसह, गाला जानेवारी महिन्यासाठी आकारमानाच्या दृष्टीने ४ था सर्वात मोठा टोकन म्हणून उदयास आला. पॉलिगॉन फेब्रुवारीमध्ये सर्वात मोठा वापरकर्ता पाया असलेले दुसरे टोकन म्हणून पुढे गेले आणि गिफ्टोमध्ये रातोरात २६००% वाढ झाली ज्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ आणि उत्साह निर्माण झाला. या अहवालात उर्वरित महिन्यांतील चालू घडामोडींचा तपशील देण्यात आला आहे, इथरियम फ्यूचर्स ईटीएफ, बिटकॉइन ईटीएफ ऍप्लिकेशन, रिपलचा एसईसीवर विजय, क्रिप्टो उद्योगावर एलोन मस्कचा प्रभाव आणि बरेच काही या सारख्या लोकप्रिय टोकन्सशी संबंधित विशिष्ट घटना यात वर्णन केलेल्या आहेत.

Related posts

नीरज पांडे आणि मनोज वाजपेयी वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरीसह परत एकदा चाहत्यांची आवडती फ्रँचायजी ‘सीक्रेटस’ सोबत एकत्र येणार: ‘सीक्रेटस ऑफ द बुद्धा रेलिक्स’

Shivani Shetty

मेलोराकडून नवीन लाइटवेट ज्‍वेलरीचे अनावरण

Shivani Shetty

एरिओवेदासह लाइफसेलचा स्किनकेअर क्षेत्रात प्रवेश

Shivani Shetty

Leave a Comment